शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

तुमची साडेसाती सुरु आहे? नेमके काय करु नये?; ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त, शनी शुभच करेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 10:04 IST

1 / 12
सन २०२४ सुरू झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात शनी कुंभ राशीत असेल. २०२५ च्या मध्यावर शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनी हा मंद गतीचा ग्रह असून, एका राशीत सुमारे अडीच वर्ष विराजमान होतो. आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे.
2 / 12
शनी कुंभ राशीत विराजमान असल्यामुळे मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा आहे आणि मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा प्रारंभ आहे. कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीचा ढिय्या प्रभाव सुरू आहे.
3 / 12
साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे. साडेसातीचा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र व गोचरी शनि यांच्याशी निगडित आहे. चंद्रापासून ४५ अंश मागे शनिचे अंशात्मक भ्रमण सुरू होते, तेव्हा साडेसाती सुरू होते व चंद्रापासून ४५ अंशापुढे शनी गेला की साडेसाती संपते.
4 / 12
ज्या राशीची साडेसाती सुरू आहे, त्या राशीच्या व्यक्तींनी काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. आपली साडेसाती सुरू होणार असल्याचे समजते, तेव्हा जणू काही आपणावर संकट ओढावणार आहे, असा आपला समज होतो. प्रत्यक्षात साडेसाती येणे ही एक प्रक्रिया आहे. साडेसाती केव्हा येते, ते पाहणे गरजेचे आहे.
5 / 12
सर्वसाधारण जन्मकुंडलीतील चंद्राच्या बाराव्या राशीत शनिने प्रवेश केला की, साडेसाती सुरू होते. ही पहिली अडीच वर्षे असतात. चंद्रराशीवरून शनिचे भ्रमण सुरू झाले की, दुसरी अडीच वर्षे व चंद्राच्या दुसऱ्या राशीत शनिने प्रवेश केला की, तिसरी अडीच वर्षे सुरू होतात. असा हा सर्व मिळून साडेसात वर्षांचा काळ म्हणून यास साडेसाती असे म्हणतात.
6 / 12
समजा आपली रास कुंभ आहे. तर मकर-कुंभ -मीन राशीतून होणारे शनिचे भ्रमण आपणास साडेसाती आणणारे ठरणार आहे, म्हणजे राशीस बारावा-पहिला-दुसरा शनी असताना साडेसाती असते. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
7 / 12
करावे तसे भरावे या उक्तीनुसार शनी आपल्या कर्माचे फळ देत असतो, असे म्हटले जाते. शनी साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असलेल्यांनी ज्येष्ठ व्यक्तींशी आदराने वागावे. नोकरीच्या ठिकाणीही सहकाऱ्यांशी चांगले वागावे. कोणाचा अनादर करत असाल तर तुम्हाला शनीच्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
8 / 12
शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते. भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत. शनिदेवाचे गुण पाहून महादेवांनी त्यांना नवग्रहांमध्ये न्यायाधीशाचे स्थान दिल्याची मान्यता आहे.
9 / 12
साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. तसेच शनीची उपासना, स्तोत्र पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात.
10 / 12
ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनीधामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे. तसेच पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे.
11 / 12
साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असलेल्या राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक शनिवारी ११ वेळा शनी स्तोत्राचे पठण करावे. असे करणे फायदेशीर ठरू शकेल. तसेच शनिवारी काहीतरी दान करावे. शनी महादशा किंवा अंतर्दशेत दान करणे चांगले मानले जाते.
12 / 12
शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य