By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 09:50 IST
1 / 9नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी नक्षत्र गोचर करत आहे. शनी धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करत आहे. धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. मंगळ ग्रह आताच्या घडीला तूळ राशीत विराजमान असून, शनी आणि मंगळ एकमेकांपासून नवम पंचम स्थानी आहेत. शनी आणि मंगळाचा नवम पंचम योग जुळून येत आहे. 2 / 9शनी २४ नोव्हेंबरपर्यंत धनिष्ठा नक्षत्रात असेल. शनी आणि मंगळ यांची युती फारशी अनुकूल मानली जात नाही. आताच्या घडीला कुंभ राशीत असलेला शनी वक्री आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शनी कुंभ राशीत मार्गी होईल. शनीचे धनिष्ठा नक्षत्रातील गोचर काही राशींना अतिशय शुभ परिणामकारक मानले जात आहे. 3 / 9नवरात्रातील शनी धनिष्ठा गोचराचा ४ राशींना उत्तम लाभ मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. देवी दुर्गेच्या आशीर्वादाने आणि शनिदेवाच्या कृपेने त्यांना नोकरी-व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल आणि त्यांचे कौटुंबिक जीवनही आनंदी राहील, असे म्हटले जात आहे. ४ भाग्यवान राशी कोणत्या, ते जाणून घेऊया...4 / 9मेष राशीच्या व्यक्तींना शनीचे नक्षत्र गोचर मालामाल करणारे ठरू शकेल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक बाबतीत विशेष लाभ होतील. कुटुंबातील सदस्यांशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले राहतील. जीवनात सकारात्मक बदल होतील. पैसे मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे मन प्रसन्न आणि आनंद राहील.5 / 9वृषभ राशीच्या व्यक्तींना शनीचे नक्षत्र गोचर यशकारक ठरू शकेल. व्यवसायात प्रगतीची शुभ शक्यता आहे. पदोन्नती किंवा पगारवाढ यासारखे शुभ परिणाम मिळू शकतात. नोकरीत यश मिळण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर असेल. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्याची शुभ शक्यता आहे. जोडीदाराशी संबंध खूप सौहार्दपूर्ण असतील. एकमेकांच्या सल्ल्याने चांगले काम करू शकाल.6 / 9मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीचे नक्षत्र गोचर सकारात्मक ठरू शकेल. शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. धार्मिक कार्यात रुची वाढेल. शुभ प्रभाव जीवनावर दिसून येईल. भाग्यवृद्धीमुळे कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही. नोकरीशी संबंधित काही नवीन प्रस्ताव मिळू शकतात. देवी दुर्गेच्या आशीर्वादाने नवरात्रीच्या काळात काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी मिळू शकते. भौतिक सुखसोयी वाढतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.7 / 9मकर राशीच्या व्यक्तींना शनीचे नक्षत्र गोचर लाभदायक ठरू शकेल. प्रगती होईल. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायातील अडथळे संपतील. जे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. त्यांच्या जीवनात लाभ आणि प्रगतीची शक्यता असते. व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर यावेळी नवीन प्रस्ताव येऊ शकतात.8 / 9आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन या राशींची साडेसाती सुरू आहे. मकर राशीचा शेवटचा टप्पा, कुंभ राशीचा मधला टप्पा तर मीन राशीचा पहिला टप्पा सुरू आहे. २०२५ मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करेल, तेव्हा मकर राशीची साडेसाती संपेल आणि मेष राशीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल.9 / 9ऑक्टोबर महिन्यात तूळ राशीत चतुर्ग्रही योग जुळून येणार आहे. तूळ राशीत मंगळ आणि केतु ग्रह असून, नवरात्रात सूर्य आणि बुध ग्रह प्रवेश करणार आहेत. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.