By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 13:57 IST
1 / 10ज्योतिषशास्त्रानुसार नियमित कालावधीत ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. सप्टेंबर महिना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, तसाच तो ज्योतिषीयदृष्ट्याही विशेष ठरणारा असल्याचे सांगितले जात आहे. (these 5 planets to change their position in september 2021)2 / 10ज्योतिषीय घटनांनुसार सप्टेंबर महिना चढ-उतारांचा ठरणार असून, या महिन्यात काही महत्त्वाचे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत मार्गी चलनाने प्रवेश करतील. तर, गुरु ग्रह वक्री चलनाने आधीच्या राशीत प्रवेश करणार आहे. 3 / 10महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे ५ सप्टेंबर रोजी भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रह आपले स्वामीत्व असलेल्या तुळ राशीत विराजमान होईल. तर, ६ सप्टेंबर रोजी सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह कन्या राशीत प्रवेश करेल. 4 / 10याच क्रमात पुढे १४ सप्टेंबर रोजी गुरु ग्रह वक्री चलनाने कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. तसेच नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १६ सप्टेंबर रोजी कन्या राशीत विराजमान होईल. सूर्याच्या या कन्या राशीतील संक्रमाणाला कन्या संक्रांत असेही म्हटले जाते. 5 / 10यानंतर २२ सप्टेंबर रोजी बुध तुळ राशीत प्रवेश करेल, तसेच २७ सप्टेंबर रोजी याच राशीत वक्री होईल, असे सांगितले जात आहे. या पाचही ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा कोणत्या ५ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ होईल? ग्रहांचे राशीपरिवर्तन शुभ ठरू शकेल? जाणून घ्या...6 / 10या ५ ग्रहांचे राशीपरिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींना सर्वांत शुभ असल्याचे सांगितले जात आहे. हाती घेतलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील. नवकल्पना स्फुरतील. लाभ मिळवण्याच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. आर्थिक आघाडीवर हा कालावधी चांगला ठरू शकेल. मागील गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.7 / 10या ५ ग्रहांचे राशीपरिवर्तन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम लाभदायक असल्याचे सांगितले जात आहे. या कालावधीत मानसिक ताण कमी होऊ शकेल. प्रगतीच्या चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतील. कौटुंबिक व्यस्तता राहील. सुख-साधनांमध्ये वाढ होऊ शकेल. नातेवाइकांकडून शुभवार्ता मिळू शकेल. आगामी काळ आनंददायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 8 / 10या ५ ग्रहांचे राशीपरिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. सरकार दरबारी लाल फितीत अडकलेली कामे पुढे सरकतील. हाती घेतलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील. आर्थिक आघाडीवर आगामी कालावधी मध्यम ठरू शकेल. खर्च करताना विचारपूर्वक करावा, असे सांगितले जात आहे. 9 / 10या ५ ग्रहांचे राशीपरिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींना यशकारक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. व्यापारी नव्या गुंतवणुकीचा विचार करू शकतात. नोकरदार वर्गाला लाभदायक कालावधी ठरू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा ठरू शकेल. शुभवार्ता मिळतील, असे सांगितले जात आहे. 10 / 10या ५ ग्रहांचे राशीपरिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरेल, असे सांगितले जात आहे. शुभवार्ता प्राप्त होऊ शकतील. मंगलकार्याच्या आयोजनाबाबत चर्चा होऊ शकेल. अडकलेली कामे मार्गी लागू शकतील. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. नातेसंबंध सुधारतील, असे सांगितले जात आहे.