By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 09:15 IST
1 / 12ज्योतिषशास्त्रातील सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे मानले जाणारे ग्रह गोचर मार्च महिन्यात होत आहे. २९ मार्च रोजी नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि ग्रह स्वराशीतून म्हणजेच कुंभ राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करत आहे. एका राशीत शनि सुमारे अडीच वर्षे विराजमान राहत असल्यामुळे शनि गोचर अतिशय महत्त्वाचे मानले जाते. 2 / 12शनि ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर मकर राशीची साडेसाती संपुष्टात येणार आहे. तर मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे. केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर शनि गोचराचा मोठा प्रभाव पडणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी सन २०२५ मधील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास प्रकारातील असणार आहे. शनि गोचर आणि सूर्यग्रहण यांचा योग विशेष महत्त्वाचा आणि अतिशय प्रभावी मानला जात आहे.3 / 12शनि ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर अनेक योग जुळून येत आहेत. आताच्या घडीला मीन राशीत सूर्य, बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन ग्रह विराजमान आहेत. या सर्व ग्रहांशी शनिचा युती योग जुळून येणार आहे. तसेच याच दिवशी चंद्रही मीन राशीत असणार आहे. केतु कन्या राशीत विराजमान असल्यामुळे समसप्तक योग जुळून येणार आहे. एकूणच ग्रहस्थितीचा ७ राशींवर अत्यंत शुभ प्रभाव पडणार असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...4 / 12वृषभ: उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यांना व्यवसाय वाढवायचा आहे, त्यांना नवीन डील आणि मोठे क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. बराच काळ दिलेले पैसे परत मिळण्याची आशा आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढती आणि सन्मानातही वाढ होईल. कामात भाग्याची साथ मिळेल. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरतील. नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल.5 / 12मिथुन: काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता प्रबळ असेल. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता असेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काही विशेष संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढेल. आर्थिक लाभामुळे व्यापारी वर्ग नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रात यश मिळेल. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना मोठ्या कंपनीत चांगली संधी मिळू शकते.6 / 12कर्क: कामात भाग्याची साथ मिळू शकते. देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. व्यवसाय वाढवायचा आहे त्यांना नवीन डील आणि मोठे क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक संबंध अधिक मजबूत होतील. नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. वाद मिटविण्यासाठी हा अनुकूल काळ असेल.7 / 12कन्या: जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. यश मिळू शकते. जे लोक एखाद्यासोबत भागीदारीत काम करतात त्यांना या काळात त्यांच्या भागीदारांच्या मदतीने मोठे फायदे मिळू शकतात. या काळात आवड गाणी ऐकण्यात अधिक असू शकते.8 / 12धनु: नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कारकिर्दीत प्रगती करण्यासाठी काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या भविष्यात खूप फायदेशीर ठरतील. नवीन लोकांशी संपर्क साधाल जे वाढीस मदत करतील. कायदेशीर बाबींमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल.9 / 12कुंभ: शुभ आणि फलदायी ठरू शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. लोक प्रभावित होतील. कठोर परिश्रमाने अनेक कामे पूर्ण कराल. इच्छा पूर्ण होतील. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. कौटुंबिक बाबींमध्ये मदत आणि पाठिंबा मिळेल. मानसिक शांतता मिळेल. आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. जुने प्रलंबित काम आता पूर्ण होईल. धार्मिक कार्यात रस वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे वर्ष सुवर्णसंधीचे ठरू शकेल.10 / 12मीन: शनि गोचर आणि सूर्यग्रहण अनुकूल ठरू शकेल. आत्मविश्वास वाढेल. समाजात आदर वाढेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील. यासोबतच कौटुंबिक शांतता राहू शकेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. त्याच वेळी, उत्पन्न वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. सामाजिक संबंध अधिक मजबूत होतील आणि नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल.11 / 12ज्योतिषशास्त्रातील काही मान्यतांनुसार, सूर्य आणि शनि हे एकमेकांचे शत्रू ग्रह मानले गेले आहे. तसेच पिता-पुत्रही मानले गेले आहेत. त्यामुळे हे दोन ग्रह एकाच राशीत विराजमान असणे विशेष मानले जात आहे. दरम्यान, २०२५ मधील पहिले सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याने वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जात आहे.12 / 12- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.