शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लक्ष्मी भद्र पंचमहापुरुष राजयोग: प्रदोष दिनी २ ग्रहांचे शुभ गोचर, ८ राशींना धनलाभ; उत्तम काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 10:08 IST

1 / 12
जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. या सप्ताहाच्या सुरुवातीलाच प्रदोष व्रत आहे. तर, मंगळवारी ज्येष्ठ पौर्णिमा असून, वटसावित्री व्रत असणार आहे. तसेच शनिवारी संकष्ट चतुर्थी व्रत आहे. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार विविध शुभ योग जुळून येत आहे.
2 / 12
बुध स्वराशीत विराजमान झाला आहे. त्यामुळे भद्र महापुरुष राजयोग जुळून आला आहे. तसेच मिथुन राशीत आधीपासून गुरु ग्रह विराजमान आहे. गुरु आणि बुध ग्रहाचा शुभ योग जुळून येत आहे. या दोन्ही ग्रहांची युती सकारात्मक अनुकूलता देणारी मानली जाते.
3 / 12
शनिवार, ०७ जून २०२५ रोजी शनि भाद्रपद नक्षत्राच्या पुढील चरणात गोचर करत असल्याचे सांगितले जात आहे. शनिचे नक्षत्र गोचर अनेकार्थाने शुभ मानले गेले आहे. एकंदरीत आगामी सप्ताहातील ग्रहमान ८ राशींसाठी सर्वोत्तम, शुभ पुण्य लाभदायी मानले गेले आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घेऊया...
4 / 12
वृषभ: अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. या काळात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे आता पूर्ण होऊ शकतात. नवीन नोकरी, व्यवसाय किंवा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासारख्या नवीन सुरुवातीसाठी हा काळ योग्य आहे. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
5 / 12
मिथुन: आत्मविश्वास वाढेल. योजना यशस्वी होतील. मानसिकदृष्ट्या अधिक शांत आणि संतुलित वाटेल. निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. लोक आकर्षित होतील. विवाहित लोकांचे विवाहित जीवन उत्तम राहील. एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. बऱ्याच काळापासून मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकतात.
6 / 12
कर्क: शुभ आणि उत्साहवर्धक काळ राहू शकेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती किंवा इच्छित ठिकाणी बदलीची खूप दिवसांपासून वाट पाहत होते त्यांच्यासाठी कालावधी फलदायी ठरेल. मेहनतीचे फळ मिळेल. पदोन्नतीची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांचा, मित्रांचा आणि कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आत्मविश्वासाने पुढे जाल. सकारात्मक परिणाम दिसतील. जुन्या गुंतवणुकीतून किंवा व्यवहारातून अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
7 / 12
सिंह: उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे कमवू शकता. आर्थिक स्थिती चांगली असेल. शेअर बाजार, आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर हा काळ अनुकूल आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम आता पूर्ण होऊ शकते. हा काळ नवीन नोकरी, व्यवसाय किंवा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी योग्य आहे.
8 / 12
कन्या: काही नवीन कल्पना सुचू शकतात. व्यवसायात तसेच करिअरमध्ये फायदा होऊ शकतो. मेहनतीचे फळ नक्कीच मिळू शकते. वैवाहिक जीवन, मालमत्ता किंवा मुलांशी संबंधित समस्या संपू शकतात. रखडलेले काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. भौतिक सुख मिळू शकते. शिक्षण क्षेत्रात फायदे मिळू शकतात. करिअरमध्ये मोठी चालना मिळू शकते. नोकरीत पदोन्नती किंवा पगार वाढ शक्य आहे.
9 / 12
वृश्चिक: अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. भावंडांसोबत चांगला वेळ घालवाल. आत्मपरीक्षण कराल. अनेक बदल दिसून येतील. करिअरच्या क्षेत्रात कामाचे आणि मेहनतीचे कौतुक होईल. उच्च अधिकारी खूष होऊन मोठी जबाबदारी सोपवू शकतात. उत्पन्न वाढू शकते. अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसायात बनवलेली रणनीती प्रभावी ठरू शकते. अनेक फायदे प्राप्त होऊ शकतात. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या एखाद्या समस्येतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
10 / 12
मकर: या राशीच्या लोकांना शनि साडेसातीच्या प्रभावापासून मुक्तता मिळाली आहे. जे काम बराच काळ रखडले आहे ते हळूहळू पूर्ण होण्यास सुरुवात होईल. काहीतरी नवीन विचार करू शकतात. करिअरमध्ये विविध संधी प्राप्त होऊ शकतील. येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधू शकाल. व्यवसायात नफा होऊ शकतो. भावंडांसोबत नाते नवीन पद्धतीने सुरू होऊ शकते. हुशारीने काम केले तर यश मिळेल. पैशांची बचत करण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतील.
11 / 12
मीन: भौतिक सुख मिळू शकते. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जुनी गुंतवणूक किंवा अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन गुंतवणूक करण्याची संधी फायदेशीर ठरेल. सासू-सासऱ्यांशी संबंध चांगले राहू शकतील.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिकPuja Vidhiपूजा विधी