Rahu Mangal Gochar 2025: राहू-मंगळ गोचर; 'या' राशींचे सुरु होणार 'अच्छे दिन', पण बाकीच्या राशींचे काय? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:08 IST
1 / 6ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व प्रमुख ग्रह वेळोवेळी आपली राशी आणि नक्षत्र बदलत असतात. त्याचा सर्व सृष्टीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. येत्या काही दिवसात राहू आणि मंगळाचे संक्रमण होणार आहे. हे दोन ग्रह भिन्न स्वभावाचे आहेत पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्याचा परिणाम खूप चांगला असतो. हा बदल नेमका कधी घडणार आणि कोणत्या राशीला लाभदायक ठरणार ते पाहू. 2 / 6ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, राहू ग्रह सध्या उत्तरा भाद्रपदाच्या द्वितीय स्थानात फिरत आहे. तो १२ जानेवारी २०२५ (रविवार) रोजी रात्री ९.११ मिनिटांनी दुसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर प्रवेश करेल. त्याचवेळी कल्याणकारी ग्रह म्हटला जाणारा मंगळ देखील १२ जानेवारी रोजी रात्री ११.५२ मिनिटांनी पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करेल. त्याच्या प्रभावामुळे पुढील राशींसाठी 'अच्छे दिन' सुरू होणार आहेत. ज्यामुळे संपत्तीत वाढ होईल आणि महत्त्वाच्या कामांमध्ये येणारे अडथळे दूर होतील. 3 / 6राहू मंगळ गोचर तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्य आणि सुबत्ता घेऊन येणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला उत्कृष्ट नफा मिळू शकतो. अचानक आलेल्या पैशामुळे तुम्ही नवीन मालमत्ता किंवा कार खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. बराच काळ खोळंबून राहिलेली तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला हळूहळू दीर्घकाळ सुरु असलेल्या आजारापासून आराम मिळू लागेल, दुखणी कमी होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ लागतील.4 / 6दोन्ही प्रमुख ग्रहांचे नक्षत्र बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतात. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनेक मान सन्मान मिळू शकतात. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ छान जाईल. सहलीला जाण्याचा बेत आखू शकता. करिअरसाठी सुवर्ण काळ सुरू होईल. तुमचा बॉस तुमच्या कामावर खूश असेल आणि तुम्हाला बढती देण्याचा विचार करू शकेल.5 / 6राहू-मंगळाच्या बदलामुळे धनु राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. या संक्रमणामुळे तुमच्या भौतिक सुखात वाढ होऊ शकते. हा बदल नोकरदारांसाठी चांगला असेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल, व्यावसायिकांना नवनव्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचारही करू शकता. 6 / 6राहू आणि मंगळ इतर राशींसाठीही छोट्या मोठ्या शुभ घटना घेऊन येतील. मात्र राहूचा गुणधर्म पाहता इतर राशींना कामाच्या बाबतीत सावध पवित्रा घ्यावा लागेल, जेणेकरून उर्वरित गोष्टीत सगळे काही मंगल होईल. येत्या काळात सर्व राशींनी गणेश उपासना करणे लाभदायी ठरेल. तसेच ज्यांची साडेसाती सुरु आहे त्यांनी नियमित पणे हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र पठण करणे लाभदायी ठरेल.