पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ८ राशीचे लोक अखंडित कृपेचे धनी; धनलाभ, भरभराट-सुबत्ता-कल्याण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 07:07 IST
1 / 16Pitru Paksha Sankashti Chaturthi 2025: गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी संकष्ट चतुर्थी आहे. लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर येणाऱ्या भाद्रपद महिन्यातील संकष्ट चतुर्थी येते. पितृपक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला पुन्हा एकदा बाप्पाची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. 2 / 16भाद्रपद संकष्ट चतुर्थी सुरू होतानाच मृत्यू पंचक समाप्त होणार आहे. बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ०८ वाजून ३४ मिनिटांनी चंद्रोदय आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. 3 / 16सप्टेंबर २०२५ च्या पितृपक्षातील संकष्ट चतुर्थीला अनेक शुभ योग जुळून येत आहेत. दोन समसप्तक योग, बुधादित्य राजयोग जुळून येत आहे. एकूणच ग्रहमान पाहता पितृपक्षातील भाद्रपद संकष्ट चतुर्थीला कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? कोणत्या राशींना हा कालावधी संमिश्र ठरू शकेल? जाणून घेऊया...4 / 16मेष: आरोग्याच्या तक्रारी हळूहळू दूर होतील. सुरुवातीला आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, अनावश्यक खर्च करण्याकडे कल राहील. त्यावर थोडे नियंत्रण ठेवा. अचाट साहस करणे टाळा. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. बढाईखोरपणा करण्याची सवय असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. नाही तर अडचणीत याल. कुणाला जामीन राहू नका.5 / 16वृषभ: पैशाचे व्यवहार जपून करा. कार्यक्षेत्रात एखादी मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. त्यामुळे कामाचा ताण राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र, कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. काही लोक तुम्हाला पैशाच्या व्यवहारात गोड बोलून फसवू शकतात. गुरुवार, शुक्रवार नियमानुसार कामे करा. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. शनिवारी अडचणी दूर होतील. मात्र, कुणी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. त्या दृष्टीने थोडे सावध राहा.6 / 16मिथुन: सावधपणे कामे करा . सामाजिक कार्यात लोक तुमच्या चुकांकडे बोट दाखवतील. काही लोक उघडपणे तुमच्या विरोधात कारवाया करतील. नोकरीत स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. गुरुवार, शुक्रवार धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एखादे महत्त्वाचे काम हातावेगळे कराल. शनिवारी कायदेशीर कटकटींना तोंड द्यावे लागेल. संयमाने वागण्याची गरज आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.7 / 16कर्क: प्रगती होईल. काही अडचणी येतील. घाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. एखाद्या व्यवहारात धनहानी होऊ शकते. साधकबाधक विचार करून निर्णय घ्यावा. सामाजिक कार्यात लोकांकडून कटू अनुभव येतील. शुक्रवारपासून नोकरीत नवीन संधी मिळेल. प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो.8 / 16सिंह: थोडी दगदग होईल. आरोग्याच्या किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी असतील. स्वतःची काळजी घ्यावी. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. झेपतील तेवढीच कामे करा. गुरुवारपासून परिस्थिती नियंत्रणात येईल. सामाजिक मान-सन्मान प्राप्त होईल. महत्त्वाच्या घटना-घडामोडी घडतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. नोकरीत अचानक नवीन संधी मिळेल. त्यादृष्टीने शुक्रवार, शनिवार चांगले दिवस ठरतील.9 / 16कन्या: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. चंद्राचे षष्ठ ते अष्टम स्थानातून होणारे भ्रमण दगदग वाढवू शकते. कायद्याची बंधने पाळा. कुणाला आश्वासने देऊ नका. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आपली माहिती गोपनीय ठेवा. वाहने जपून चालवा. प्रवासात सतर्क राहा. महत्त्वाची कागदपत्रे, मूल्यवान वस्तू सांभाळा. शुक्रवार, शनिवार अनुकूल परिस्थिती राहील. अनेक अडचणी दूर होतील.10 / 16तूळ: लोकांच्या भरवशावर विसंबून राहू नका. काही लोक मोठमोठी आश्वासने देतील. मात्र, ऐनवेळी कच खातील. त्यामुळे योजना कागदावरच राहतील. त्यामुळे स्वबळावरच कामे करण्याची तयारी ठेवा. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. मात्र कामाचा ताण सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. गुरुवार, शुक्रवार तरुण वर्गासाठी आशादायक काळ राहील. शनिवारी अचानक धनलाभ होऊ शकतो. मात्र वाहने हळू चालवा.11 / 16वृश्चिक: सतत कशात ना कशात व्यस्त राहाल. विविध आघाड्यांवर झटावे लागेल. नोकरीत सुरुवातीला एखादी नवीन संधी मिळेल. त्यामुळे महत्त्व वाढेल; पण कामाचा ताण राहील. घरात किरकोळ कारणावरून वाद होऊ शकतात. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. मुलांशी संवाद ठेवा. त्यांच्या संगतीकडे लक्ष द्यावे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळा. प्रेमात फसगत होण्याची शक्यता आहे.12 / 16धनु: प्रयत्नांना यश मिळेल. सर्वसामान्य परिस्थिती राहील. व्यवसायात दगदग होईल. प्रवास घडून येईल. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. गुरुवार, शुक्रवार एखाद्या चांगल्या बातमीमुळे मन आनंदून जाईल. मुलांची प्रगती होईल. शनिवारी सावधपणे वागण्याची गरज आहे. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.13 / 16मकर: चंद्राचे धनस्थानापासून ते पंचमस्थानापर्यंत होणारे भ्रमण अनेक क्षेत्रांत यश देणारे ठरेल. मात्र, तेवढीच मेहनत पण करावी लागेल. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामात काही अडचणी येतील. शिळे अन्नपदार्थ खाणे टाळा. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. थोडे विचारपूर्वक व सावधपणे निर्णय घ्यावे. भावंडांशी वाद व गैरसमज होऊ शकतात. प्रवासात सतर्क राहा. नोकरीत नवीन संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे.14 / 16कुंभ: काही अडचणी जाणवतील. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. जीवनसाथीशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. जमिनीच्या व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्यावा. कोणत्याही कागदपत्रांवर नीट वाचूनच सही करा. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. व्यवसायात भरभराट होईल. मात्र आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय जपून घ्यावे. काहींना जवळच्या प्रवासाचे योग येतील. नोकरीत नवीन संधी मिळेल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.15 / 16मीन: मनात काळजीचे विचार राहतील. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. थोडा सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. जीवनसाथीशी गैरसमज होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जवळचे लोक दुखावले जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. मुलांशी मधुर संबंध राहतील.16 / 16- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.