शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नास्त्रेदामसची भविष्यवाणी: २०२५ या पाच राशींना मोठा लाभ देऊन जाणार, मालामाल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:56 IST

1 / 8
नास्त्रेदामस या प्रसिद्ध भविष्यवेत्त्याने आतापर्यंत केलेल्या बहुतांश भविष्यवाण्या खऱ्या ठरत आल्या आहेत. ब्रिटनला नवा राजा मिळाला आहे, दोन मोठी युद्धेही लढली गेली आहेत. नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या वर्षासाठीही या महान व्यक्तीने काही भविष्यवाणी केली आहे. तसेच काही राशींना देखील हे वर्ष कसे फलदायी ठरेल हे देखील लिहून ठेवले आहे.
2 / 8
२०२५ मध्ये नास्त्रेदामसनुसार पाच राशींना खूप चांगले आणि भाग्योदयाचे दिवस येणार आहेत. नास्त्रेदामसनुसार या राशीच्या लोकांना श्रीमं बनण्याचे योग आहेत. हे लोक करोडोंच्या संपत्तीचे मालक होणार आहेत, असे म्हटले आहे.
3 / 8
फक्त पैसाच नाही तर या लोकांना मानसन्मान, चांगला नेता आणि गुंतवणुकीतून मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. या कोणत्या राशी आहेत, हे जाणून घेऊया...
4 / 8
चालू वर्षात मेष राशी वाल्यांची जी काही मोठी इच्छा असेल ती पूर्ण होऊ शकणार आहे. तसेच मोठा आर्थिक फायदा होण्याचे योग आहेत. मेहनत सोडू नये, असे सांगण्यात आले आहे.
5 / 8
वृषभ राशीलाही मोठा लाभ सांगितलेला आहे. २०२५ मध्ये या राशीच्या लोकांना अपार धनदौलत मिळण्याचे योग आहेत. ग्रहांच्या अनुकुल स्थितीचा त्यांना लाभ होणार आहे. मोठ्या पदावर नोकरी, व्यवसायात मोठी प्रगती, प्रतिष्ठीत लोकांत उठणे-बसणे आणि गुंतवणूक लाभ असे सांगितले आहे.
6 / 8
कन्या राशीचे लोक या वर्षात त्यांच्या क्षेत्रात सर्वात मोठ्या उंचीवर जाणार आहेत. त्यांची बुद्धीमत्ता त्यांच्या धनात मोठी वाढ करणारी ठरणार आहे. विचारपूर्वक केलेली गुंतवणूक त्यांना यथोचित लक्ष्यप्राप्ती करविणार आहे.
7 / 8
वृश्चिक राशीच्या लोकांना या वर्षी लक्झरी लाईफ मिळणार आहे. त्यांच्या आयुष्यात सुख सुविधा वाढतील. व्यावसायिकांना मोठा लाभ होणार आहे. अडकलेला पैसा मिळणार आहे. कर्जापासूनही दिलासा मिळणार असल्याचे नास्त्रेदामसने म्हटले आहे.
8 / 8
मकर राशीसाठीही चांगली बातमी आहे. हे वर्ष त्यांच्या संघर्षाचा चाललेला दीर्घ प्रवास संपवू शकते. शनीची साडेसाती मार्चमध्ये संपणार आहे. यामुळे पुढे आर्थिक समृद्धी मिळविण्यासाठीचा काळ असणार आहे. संपत्ती वाढेल आणि नवीन व्यवसायही सुरु केला जाऊ शकेल.
टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिषyearly horoscope 2025वार्षिक राशीभविष्य २०२५