Nag Panchami 2024 : नागपंचमीला ५ दुर्लभ योग: ५ राशींना नशिबाची साथ, भागीदारीतून फायदा; बँक बॅलन्स वाढेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 10:34 IST
1 / 9श्रावण महिना सुरू आहे. श्रावणातील पहिला मोठा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी नागपूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, नागपंचमीला मोठे अद्भूत, दुर्मिळ योग जुळून येत आहेत. हे योग राजयोगाप्रमाणे फले देऊ शकतात, असे सांगितले जात आहे. शेकडो वर्षांनी जुळून आलेल्या या दुर्लभ योगांचा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकतो.2 / 9शुक्र आणि बुध सिंह राशीत असून, लक्ष्मी नारायण योग जुळून आला आहे. तसेच शनीचा शश योग जुळून आला आहे. कन्या राशीतील चंद्राचा केतुशी ग्रहण योग तर राहुशी समसप्तक योग जुळून आला आहे. तसेच शुभ, सिद्धी योग जुळून आले आहेत. याशिवाय, साध्य योग, रवि योग जुळून आले आहेत.3 / 9एकूणच शुभ ग्रहस्थितीचा काही राशींना चांगला फायदा मिळू शकतो. कुटुंब, नोकरी, व्यवसाय, आर्थिक आघाडीवर सकारात्मक बदल, अनुकूल प्रभाव पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...4 / 9मिथुन: हा काळ शुभ ठरू शकेल. नशिबाची साथ लाभेल. देश-विदेशातही प्रवास करू शकता. साहस आणि शौर्यामध्ये वाढ पहाल. पैसा, करिअर आणि बँक बॅलन्सच्या बाबतीतही खूप चांगला काळ असणार आहे. बँक बॅलन्स चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.5 / 9सिंह: जीवनसाथीसोबत ताळमेळ चांगला राहू शकेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकेल. लोकप्रिय व्हाल. सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात. एक चांगला प्रस्ताव मिळू शकतो. मनोकामना पूर्ण होतील. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते.6 / 9वृश्चिक: देवी लक्ष्मीच्या कृपेने अडकलेले पैसे मिळू शकतात. संपत्ती वाढेल. व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. नोकरदारांना अधिकाऱ्यांशी चांगल्या संबंधांचा लाभ मिळू शकेल. पगारवाढीबाबत बोलणी होऊ शकतात. वैवाहिक जीवनात विश्वासार्हता वाढेल. मित्रांसोबत वेळ मजेत घालवू शकाल.7 / 9धनु: राजकीय लोकांशी चांगले संबंध निर्माण होऊ शकेल. सामाजिक क्षेत्रात व्याप्ती वाढेल. काही अर्धवेळ काम सुरू केले असेल तर फायदा होऊ शकेल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर वेगाने प्रगती होईल. जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहू शकतील. कौटुंबिक सदस्याकडून चांगली बातमी मिळू शकेल. आर्थिक भार कमी होईल. मन आनंदी राहील. 8 / 9कुंभ: आत्मविश्वास वाढेल. मेहनतीचे यथायोग्य फळ मिळू शकेल. कौतुक होऊ शकेल. चांगला फायदा होऊ शकतो. कार्यशैली सुधारेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले जाऊ शकेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होतील. भागीदारीच्या कामाचा फायदा होऊ शकतो.9 / 9- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.