शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 15:19 IST

1 / 7
प्रकृती अस्वास्थ्यामुळे अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला संथारा देण्यात आला आहे. जैन धर्मामध्ये संथारा हा इच्छा मरणासारखाच असतो. संथारा घेतल्यानंतर काही मिनिटांतच या मुलीचा मृत्यू झाला आहे. धार्मिक प्रक्रियेच्या काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला, ही मुलगी जगातील सर्वात कमी वयाची संथारा घेणारी व्यक्ती ठरली आहे.
2 / 7
पियुष आणि वर्षा जैन या इंदोरच्या दाम्पत्याची तीन वर्षांची मुलगी आजारी होती. तिला ब्रेन ट्युमर झाला होता, जानेवारी २०२५ मध्ये ऑपरेशन करून ती ठीकही झाली होती. परंतू, मार्चमध्ये पुन्हा ती आजारी पडली. तिच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. २१ मार्चला जैन मुनी श्री यांच्या सल्ल्यानुसार तिचे आई-वडील संथारा देण्यासाठी तयार झाले.
3 / 7
इतक्या लहान वयात संथारा देण्याची ही पहिलीच घटना आहे. याची नोंदही 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्येही करण्यात आली आहे. काळजावर दगड ठेवून घेतलेल्या या निर्णयाबाबत जैन समाजाकडून पालकांचा सन्मान करण्यात आला आहे.
4 / 7
वियाना ही त्यांची एकुलती एक मुलगी होती, जग सोडून गेली तेव्हा ती अवघे तीन वर्षे आणि ४ महिन्यांची होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांना ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले होते.
5 / 7
तिच्यावर इंदूर आणि नंतर मुंबईत उपचार करण्यात आले. परंतू तिच्या प्रकृतीत काहीही सुधारणा दिसली नाही. दीड महिन्यांपूर्वी ते राजेश मुनी महाराजांकडे मुलीला घेऊन गेले होते. मुनिश्रींनी मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत तिला संथारा सुचविला.
6 / 7
एवढ्या लहान मुलीला संथारा द्यायचा म्हणजे काळजावर दगड ठेवावा लागणार होता. आयटी इंजिनिअर असलेल्या दाम्पत्याने कुटुंबाच्या आधाराने हा निर्णय घेतला. अर्धा तास चाललेल्या या धार्मिक प्रक्रियेनंतर अवघ्या १० मिनिटांतच वियानाने आपले प्राण सोडले.
7 / 7
वियाना खूप खेळकर आणि आनंदी होती, गोठ्यात जाणे, पक्ष्यांना चारा घालणे, गुरुदेवांचे दर्शन घेणे असे ती सुरुवातीपासूनच करत होती. धार्मिक वातावरणामुळे आणि कुटुंबाच्या श्रद्धेमुळे हा कठीण निर्णय शक्य झाल्याचे तिच्या आईवडिलांनी सांगितले.
टॅग्स :Deathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेश