शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

धनलाभाचा डिसेंबर: ‘या’ ७ राशींना फायदेशीर महिना, होईल भरघोस नफा; गुंतवणूक करेल मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 15:15 IST

1 / 15
इंग्रजी वर्षातील शेवटचा असलेला डिसेंबर महिना ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला गेला आहे. या कालावधीत महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करत आहेत. याचा अनेकविध राशीच्या व्यक्तींना लाभ होऊ शकेल. मात्र, काही राशींना हा काळ काहीसा संमिश्र ठरणारा आहे. (money career horoscope december 2022)
2 / 15
पैसा आणि करिअरच्या दृष्टीने वर्षाचा शेवटचा महिना सुख-समृद्धीकारक ठरू शकेल. बुध ग्रह या महिन्यात दोनदा राशी बदलेल. यामुळे मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांना या महिन्यात धनाच्या बाबतीत विशेष लाभ मिळू शकतो.
3 / 15
अनेक राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रगती होईल, तर काही राशीच्या लोकांना अनावश्यक खर्चाची चिंता असेल. वर्षाचा शेवटचा डिसेंबरचा महिना करिअर आणि आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या आगामी काळ खास ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. विचारपूर्वक आणि अभ्यास करून कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचाल, तेवढे प्रगतीच्या मार्गावर तुम्ही पुढे जाऊ शकाल. आर्थिक लाभाची स्थिती वाढेल. या महिन्याच्या शेवटी नफा अधिक होईल. या महिन्यात चांगली बातमी मिळू शकते. या महिन्यात केलेले प्रवास फायदेशीर ठरू शकतील.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये लाभ, तर आर्थिकदृष्ट्या काहीसा संमिश्र ठरू शकेल. प्रवास लाभदायक ठरू शकतील. लक्षपूर्वक कामे केल्यास चांगले परिणाम मिळू शकतील.कार्यक्षेत्रात प्रगती होईल, परंतु अपेक्षेपेक्षा प्रगतीची कमी असेल. भावनिक कारणांमुळे जास्त खर्च करू शकता. गुंतवणुकीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. आर्थिक दृष्टीकोनातून सकारात्मक काळ असून. आर्थिक लाभ मुबलक प्रमाणात होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अचानक प्रतिकूल होऊ शकते. परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर जात आहे असे वाटेल. शांत राहून आपापली कामे सचोटीने पार पाडावीत. तुम्हाला अशी संधी मिळू शकेल, जी प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना आगामी काळ चांगला ठरू शकेल. या महिन्यात आर्थिक लाभाची शक्यता जास्त आहे. धनलाभामुळे शुभ योगायोग घडतील. कामाच्या ठिकाणी चढ-उतार दिसू शकतील. काही त्रास होऊ शकतो. निष्काळजीपणा केला नाही तर शेवटी चांगली बातमी मिळू शकते.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना आगामी काळ यशकारक ठरू शकतो. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. तुमच्या बाजूने परिस्थिती अनुकूल होण्यास सुरुवात होईल. आर्थिक बाबतीतही काळ सकारात्मक आहे. गुंतवणुकीबाबत मनात शंका असली तरी शेवटी त्या गुंतवणुकीतून शुभ परिणामही समोर येतील. पैशाच्या बाबतीत प्रवास शुभ ठरू शकतील.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ प्रगतीकारक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. तुमचे सहकारीही पुढे होऊन तुम्हाला मदत करताना दिसतील. आर्थिक लाभ चांगला होईल. गुंतवणुकीमुळे आगामी काळात विशेष फायदा होऊ शकतो.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या आगामी काळ चांगला ठरू शकेल. आर्थिक लाभाचे शुभ योग होतील. नवीन गुंतवणुकीद्वारे लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रवास विशेष यशकारक ठरू शकतील. भविष्यात मदत करणारी व्यक्ती आगामी काळात भेटू शकते. मात्र, कामाच्या ठिकाणी काही कामे बिघडू शकतात. न्यायालयीन खटले प्रतिकूल परिणाम आणू शकतात.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. वर्षाचा शेवटचा महिना तुमच्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेण्याचा काळ असेल. कामाच्या ठिकाणी योग्य विचारांती निर्णय घेणे तुमच्या हिताचे असेल. अन्यथा त्रास वाढू शकतो. आर्थिक बाबतीत सुधारणेला वाव मिळेल.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना आगामी काळात शुभवार्ता प्राप्त होऊ शकते. मात्र, कामाच्या ठिकाणी मनात चिंता राहील. काही त्रास अचानक वाढू शकतात. आर्थिक खर्च जास्त होऊ शकेल. खर्चांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे, याप्रमाणे कृती केल्यास प्रगतीची उत्तम संधी मिळू शकेल.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना आगामी काळ संमिश्र ठरू शकतो. नोकरीच्या ठिकाणी वाद वाढू शकतात. कामात अडथळे येऊ शकतात. खर्च वाढू शकतील. अनावश्यक वादविवाद टाळणेच चांगले राहील. शेवटी सुख, समृद्धीकारक योग येऊ शकतील. परंतु, तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असतील.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ आर्थिकदृष्ट्या चांगला जाऊ शकेल. हा कालावधी शुभ असून, धनलाभाचे शुभ संयोग घडत राहतील. नवीन गुंतवणुकीतूनही फायदा होऊ शकेल. भविष्यासाठी काही नियोजन करू शकता. कामाच्या ठिकाणीही चांगले सहकार्य मिळू शकेल. जीवनात प्रगती होईल. कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना आगामी काळ चांगला ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. उत्तम व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीची मदत मिळेल. आर्थिक बाबींसाठी वर्तमानाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्याची योजना करूनच गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे. तरच सुख आणि समृद्धी मिळू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यjobनोकरीMONEYपैसा