शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 07:07 IST

1 / 10
नवग्रहांचा राजकुमार आणि बुद्धिमत्ता, व्यवसायाचा कारक मानला गेलेला बुध ग्रह ३१ मे रोजी मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत विराजमान आहे. या दोन्ही ग्रहांच्या युती योगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे.
2 / 10
वृषभ राशीत आताच्या घडीला शुक्रासोबत सूर्य आणि गुरु हे दोन ग्रहही विराजमान आहेत. बुध प्रवेशानंतर सूर्याच्या युती योगाने बुधादित्य योग तयार होत आहे. लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य हे दोन्ही योग राजयोगाप्रमाणे फले देतात, अशी मान्यता आहे. काही मान्यतांनुसार, तब्बल १ वर्षांनंतर वृषभ राशीमध्ये लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे, असे सांगितले जाते.
3 / 10
लक्ष्मी नारायण योगाचा काही राशींना चांगला फायदा होऊ शकतो, असे म्हटले जाते. विशेष करून करिअर, नोकरी आणि व्यापार यांमध्ये यश-प्रगतीची संधी प्राप्त होऊ शकेल. धनलाभ योग जुळून येण्याची शक्यता आहे. कोणत्या राशींना लक्ष्मी नारायण योगाचा शुभ लाभ मिळू शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 10
मेष: लक्ष्मी नारायण योग लाभदायक ठरू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. मान-सन्मान वाढेल. घरामध्ये काही शुभ किंवा शुभ कार्य होऊ शकतात. मेहनत आणि समर्पणाचे यथायोग्य फल मिळू शकेल. कामामुळे वरिष्ठ अधिकारी प्रभावित होऊ शकतात. प्रमोशन, इन्क्रीमेंट मिळू शकते. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन शिकायचे असेल तर या काळात शिकणे फायदेशीर ठरू शकते. आत्मविश्वास वाढेल.
5 / 10
कन्या: लक्ष्मी नारायण योग फायदेशीर ठरू शकतो. नशिबाची साथ मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना लाभ मिळू शकतो. यासोबतच पगारवाढीचे योग आहेत. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. भविष्यासाठी बचत करू शकता. लव्ह लाइफबद्दल बोलायचे झाले तर जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. मानसिक तणावातून दिलासा मिळू शकेल.
6 / 10
तूळ: करिअरमध्ये अनपेक्षित लाभ होऊ शकते. सन्मान वाढेल. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची शक्यता आहे. नोकरीत बदल करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. खर्च वाढणार असला तरी चांगल्या कमाईमुळे बचत करणे शक्य होऊ शकेल. व्यवसायात नवीन कल्पनांवर काम केल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. आहाराकडे लक्ष द्यावे.
7 / 10
धनु: आर्थिक बाबतीत यश मिळू शकेल. करिअरमध्ये आणि व्यवसायात प्रगती साध्य करता येऊ शकेल. कुटुंबातील सदस्यांच्या सर्व प्रकारच्या सहकार्यामुळे आत्मविश्वास वाढेल. विवाहेच्छुकांसाठी चांगली स्थळे येऊ शकतात. उत्पन्न चांगले राहील. कुटुंबासोबत कुठेतरी छान सहलीची योजना आखू शकता.
8 / 10
मकर: अनपेक्षित यश मिळू शकेल. ऑफिसमध्ये बॉसशी चांगल्या संबंधांचा फायदा मिळेल. बढतीची शक्यता आहे. पैसे वाचवण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबत सुसंवाद पूर्वीपेक्षा चांगला होईल. जीवनात समाधानी असाल. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हिताचे ठरू शकेल. परंतु तज्ज्ञ व्यक्तींना सल्ला आवर्जून घ्यावा. चांगले परतावा मिळण्याची अपेक्षा ठेवू शकता.
9 / 10
मीन: लक्ष्मी नारायण योग फायदेशीर ठरू शकतो. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. करिअरमध्ये फायदे मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. नोकरीमध्ये अनेक नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे तर अमाप संपत्ती मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेतून किंवा इतरत्र खूप आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. हा राजयोग लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनासाठी फायदेशीर ठरू शकतो.
10 / 10
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य