शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बुधादित्य राजयोग: ४ राशींना शुभ-फलदायी, ८ राशींसाठी संमिश्र काळ; नेमके काय करू नये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 07:10 IST

1 / 15
नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध वृषभ राशीत विराजमान झाला आहे. अवघ्या काही दिवसांनी म्हणजेच २४ जून रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. आताच्या घडीला वृषभ राशीत सूर्य विराजमान आहे. यामुळे बुध आणि सूर्याचा शुभ मानला गेलेला बुधादित्य राजयोग जुळून आला आहे.
2 / 15
वृषभ राशीत हा राजयोग अवघ्या काही दिवसांसाठी असणार आहे. सूर्याने मिथुन राशीत प्रवेश केल्यावर बुधादित्य राजयोगाचा प्रभाव समाप्त होईल. मात्र, असे असले तरी बुधादित्य राजयोगाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांनी सूर्य आणि बुध पुन्हा एकदा मिथुन राशीत युतीत असणार आहेत.
3 / 15
वृषभ राशीतील बुधादित्य योग काही राशींसाठी अतिशय उत्तम, शुभ, लाभदायक ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. तर काही राशींसाठी हा काळ सावधगिरी बाळगण्याचा, संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. मेष ते मीन या सर्व राशींवर बुधादित्य योगाचा प्रभाव कसा असेल, ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. कामावर नीट लक्ष केंद्रित करू शकणार नाही. व्यापारी वर्गाला नफा मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. खर्चात वाढ होऊ शकते. अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी. बजेटही लक्षात ठेवून त्यानुसार खर्च करावा.
5 / 15
वृषभ राशीत बुधादित्य राजयोग जुळून आला आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग लाभदायक ठरू शकेल. नोकरीत चांगल्या संधी मिळू शकतील. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होऊ शकेल. युक्ती, चातुर्याने केलेले काम यशस्वी होऊ शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. अडकलेले पैसे मिळू शकतात. बचतीच्या योजना यशस्वी होऊ शकतात.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी सर्व काही सामान्य असे. कोणताही व्यवसाय संबंधित मोठा, महत्त्वाचा निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्यावा लागेल. मोठी गुंतवणूक वाढवण्यावर फेरविचार करावा. जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात. वाद होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग काहीसा संमिश्र ठरू शकतो. करिअरमध्ये सावधगिरी बाळगायची गरज आहे. वरिष्ठांची नाराजी ओढवेल, अशा चुका टाळणे हिताचे ठरू शकेल. मेहनत केली तर यश मिळू शकेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायिकांना सुज्ञपणे घेतलेल्या निर्णयांचा फायदा होऊ शकेल. प्रेम जीवनात परस्पर समंजसपणा वाढू शकेल. जोडीदारासोबतचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होऊ शकेल.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. कोणताही मोठा निर्णय घेणे टाळणे हिताचे ठरू शकेल. नोकरदारांना कष्ट करूनही अपेक्षित यश मिळेलच असे नाही. बजेटची काळजी घेणे आवश्यक आहे. पैसे खर्च होऊ शकतात. कोणतीही मोठी गुंतवणूक करताना फेरविचार करावा. जोडीदारासोबत सामंजस्याने वागा. त्यांचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग लाभदायक ठरू शकेल. हा काळ अनुकूल ठरू शकतो. करिअरच्या दृष्टीने या काळात उत्कृष्ट परिणाम मिळतील. नोकरीमध्ये काही संधी मिळू शकतील, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. व्यवसायिकांना फायदा होऊ शकेल. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. विरोधक पराभूत होऊ शकतील. अडकलेले पैसे मिळू शकतील. प्रेमप्रकरणात जोडीदारासोबत सुसंवाद राहू शकेल. सुट्टीचे नियोजन केले जाऊ शकते.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. आर्थिक स्थितीत अनेक चढ-उतार येऊ शकतील. व्यावसायिकांनी गुंतवणुकीची काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी विरोधकांची संख्या वाढू शकते. पैशाच्या व्यवहारात अत्यंत सतर्क राहा. अपेक्षित उत्पन्न मिळू शकेल असे नाही.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग संमिश्र अशा दोन्ही स्वरुपाचा ठरू शकेल. खर्च वाढू शकतील. सहकाऱ्यांशी संबंध फारसे चांगले राहू शकणार नाहीत. अधिक कष्ट करावे लागतील. आर्थिक बाबतीतही फारसा फायदा होईल असे नाही. जोडीदारासोबत मतभेद वाढू शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. व्यापार्‍यांना काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकेल. कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. नफा कमी होऊ शकेल. पैशांची बचत करणे शक्य होईलच असे नाही. अनावश्यक खर्च टाळावेत.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग शानदार ठरू शकेल. अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतील. धनलाभाचे शुभ योग जुळून येऊ शकतात. ज्या प्रकारची नोकरी शोधत आहात ती मिळू शकते. रखडलेले पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारू शकते. जुन्या गुंतवणुकीतूनही नफा मिळू शकतो. करिअरमधील प्रगतीबद्दल तुम्ही समाधानी राहू शकाल.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. जमीन किंवा इतर कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करताना दोनदा विचार करणे उपयुक्त ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. ऑफिसमध्ये कामाचा दबाव असू शकेल. विरोधकांकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायातही चढ-उतार होऊ शकतात. अधिकाऱ्यांशी वाद वाढू शकतात. आर्थिक बाबतीत नफा आणि खर्च या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ ठेवावा लागेल. करिअरमध्ये प्रगती आणि समाधान दोन्ही मिळेल.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग शुभ ठरू शकेल. करिअरमध्ये अपेक्षित संधी मिळू शकतील. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती दिसू शकेल. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगली संधी मिळू शकते. ती अनुकूल ठरू शकेल. आर्थिक लाभासोबतच खर्च वाढू शकेल. जोडीदारासोबत चांगले संबंध राहू शकतील. आरोग्याची काळजी घ्यावी. एकूणच हे संक्रमण शुभ मानले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य