Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येला त्रिवेणी योगामुळे 'या' पाच राशींच्या आयुष्यात घडणार मोठा बदल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:30 IST
1 / 6यंदा मौनी अमावस्या बुधवारी २९ जानेवारी रोजी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी मौनी अमावस्येला त्रिवेणी योगाचा अप्रतिम संगम घडणार आहे. या दिवशी सूर्य, चंद्र आणि बुध मिळून मकर राशीत त्रिग्रही आणि त्रिवेणी योग तयार करणार आहेत. याशिवाय गुरू देखील वृषभ राशीत स्थित असेल. त्यामुळे या योगायोगाचा परिणाम महाकुंभावरही होणार आहे. म्हणून या दिवशी तिसरे शाही स्नान केले जाईल. हा योग पुढील राशींसाठी भाग्यकारक ठरणार असल्याचे भाकीत वर्तवले जात आहे. 2 / 6वृषभ राशीच्या लोकांसाठी मौनी अमावस्या शुभ ठरणार आहे. या दिवशी तयार झालेल्या त्रिवेणी योगाच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. यासोबतच मानसिक तणावातूनही आराम मिळेल. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या व्यक्तीची भेट घडेल. 3 / 6मौनी अमावस्येला घडणारा अद्भुत योगायोग कर्क राशीच्या लोकांसाठीही खास आहे. इतके दिवस अडचणींमुळे थांबलेले काम, प्रकल्प बाप्पाच्या कृपेने माघ मासात सुरु होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. अस्थिर मन शांत होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग सापडून पैशांचा ओघ वाढेल. 4 / 6कन्या राशीच्या लोकांसाठीही मौनी अमावस्या खूप शुभ ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढेल. त्रिवेणी योगाच्या शुभ प्रभावामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ आणि व्यवसायात प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील. मालमत्तेतून नफा मिळेल. नोकरदार लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.5 / 6मौनी अमावस्या तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून परदेश प्रवास करता येईल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. व्यवसायात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. यश मिळू शकते. गुंतवणुकीतून चांगली रक्कम मिळू शकते. तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.6 / 6मकर राशीचे लोक मौनी अमावस्येला भाग्यवान ठरतील. विवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. धार्मिक यात्रा होण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. जमिनीशी संबंधित काम करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. प्रवासातून आर्थिक लाभ होऊ शकतो.