आदित्य मंगल योग: ५ राशी लकी, मंगळ गोचराने होईल मंगल; यश-प्रगतीच्या सर्वोत्तम संधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 14:45 IST
1 / 9सन २०२३ च्या वर्षाची सांगता होताना काही महत्त्वाचे ग्रह गोचर करणार आहेत. यामुळे राजयोगाप्रमाणे शुभ फले देणारे उत्तम योग जुळून येत आहेत. या ग्रह गोचराचा सकारात्मक प्रभाव काही राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करत आहे. 2 / 9धनु राशीत नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य विराजमान आहे. २७ डिसेंबर रोजी मंगळ ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या धनु प्रवेशानंतर सूर्य आणि मंगळ युतीने आदित्य मंगल योग जुळून येत आहे. हा एक राजयोग मानला गेला आहे. 3 / 9आदित्य मंगल राजयोगाचा अत्यंत शुभ प्रभाव पाच राशींवर पाहायला मिळू शकतो. मंगळाचा धनु प्रवेश आणि आदित्य मंगळ राजयोगामुळे आर्थिक आघाडी, नोकरी, करिअर तसेच जीवनातील अन्य क्षेत्रांमध्ये उत्तम लाभाचा ठरू शकतो. जाणून घ्या...4 / 9मिथुन राशीच्या व्यक्तींना मंगळाचे गोचर करिअरमध्ये खूप चांगले पर्याय घेऊन येणार आहे. आगामी काळ खूप अनुकूल ठरणार आहे. भरपूर ऊर्जा दिसेल. आत्मविश्वास वाढू शकेल. आर्थिक स्थितीत अचानक वाढ होऊ शकते.5 / 9सिंह राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अतिशय अनुकूल असणार आहे. जे तांत्रिक किंवा अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांना पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मोठी भावंडे पूर्ण सहकार्य करतील. चांगला नफा मिळेल. मंगळाचे गोचर आर्थिक जीवनाच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरणार आहे. अनावश्यक खर्चावरही नियंत्रण ठेवू शकाल.6 / 9तूळ राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे गोचर चांगले राहील. भावंडांशी असेलेल संबंध खूप चांगले राहतील. नात्यात गोडवा येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले ठरणार आहे. वडील आणि गुरू यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.7 / 9धनु राशीच्या व्यक्तींना मंगळ गोचराचा काळ चांगला ठरू शकेल. काही चांगली बातमी मिळेल. एवढेच नाही तर कौटुंबिक जीवनाबद्दल थोडेसे सकारात्मक राहू शकता. अभियांत्रिकी आणि तांत्रिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी काळ खूप चांगला जाणार आहे.8 / 9मीन राशीच्या व्यक्तींना मंगळाचे गोचर करिअरच्या दृष्टीने खूप चांगले सिद्ध होऊ शकेल. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना यश मिळू शकते. इच्छित ठिकाणी बदली मिळवू शकता. लांबच्या प्रवासाला जावे लागेल. कारकिर्दीतील यशामुळे एक वेगळा आत्मविश्वास दिसून येईल. मालमत्तेच्या बाबतीतही मंगळाचे गोचर भाग्यवान ठरू शकेल.9 / 9- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.