शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Margashirsha Guruvar 2023: मार्गशीर्ष अर्थात केशव मासानिमित्त रोज म्हणा 'हे' पाच श्लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 11:58 AM

1 / 6
केशव मासात अधिक पुण्यफल प्राप्तीसाठी पूजा-पाठ, यज्ञ-याग, दान-धर्म केले जातात. धार्मिक अनुष्ठाने केली जातात. तीर्थक्षेत्री जाऊन देवदर्शन घेतले जाते. तीर्थक्षेत्री जाता आले नाही तरी घरी बसून केलेल्या मानसपूजेला कोणत्या मंत्राची जोड देता येईल, ते पाहूया. जेणेकरून नाम:स्मरणाचे फळ अधिक मिळेल.
2 / 6
अर्थ : क्षीरसागरात शेषशय्येवर भगवान महाविष्णू पहुडले आहेत. ते विश्वाचा आधार आहेत आणि सर्व विश्वावर लक्ष ठेवून आहेत. ते लक्ष्मीपती आहेत, आपल्या कमल नयनांनी विश्वाकडे कारुण्याने, ममत्वतेने पाहत आहेत. त्यांचा रंग सावळा आहे, परंतु, त्या रंगात अखिल विश्व सामावले आहे. अशा महाविष्णूंना माझा नमस्कार असो.
3 / 6
भगवान महाविष्णूंनी समस्त जीवांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तरी सुद्धा आपण देवावर भार टाकून मोकळे होत नाहै, त्यावर भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला उपदेश करतात, जो अनन्यभावे मला शरण येतो, त्याच्या हाकेला मी नेहमी धावून जातो आणि त्याचा योगक्षेम म्हणजेच अन्न, पाणी, रोजगार मी पुरवतो।.
4 / 6
आरतीच्या शेवटी, घालीन लोटांगण म्हणून झाल्यावर आपण हा श्लोक म्हणतो. मात्र, त्याच्या अर्थाकडे आपले लक्ष जात नाही. विष्णूंची उपासना करण्याच्या निमित्ताने त्याचा अर्थ समजून घेऊया. काया, वाचा, मन, इंद्रिये, बुद्धी, आत्मा या सर्वांचा मेळ होऊन आमच्याकडून कळत-नकळत जे जे काही कार्य घडते, ते आम्ही नारायणाला अनन्यभावे समर्पित करतो.
5 / 6
याला 'विष्णू गायत्री' असे म्हणतात. अनेकांना 'ओम तत्सवितु: वरेण्यम' हा एकच सूर्य गायत्री मंत्र माहीत असतो. परंतु, अशा एकूण २४ गायत्री आहेत. पैकी एक, विष्णू गायत्री, जिचा जप आपण विष्णू उपासना म्हणून करू शकतो.
6 / 6
सरतेशेवटी एक मंत्र, जो सहज, सोपा आणि अतिशय परिणामकारक आहे. केशव मासात, जपाची एक वेळ ठरवून रोज त्याचवेळी नित्य उपासना केली, तर ती अधिक फलदायी ठरते. 'श्रीराम जय राम जय जय राम', 'ओम नम: शिवाय' या मंत्रांप्रमाणे महिनाभर सदर मंत्राचा १०८ वेळा जप करण्याचा संकल्प आपण सोडू शकतो.