५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:37 IST
1 / 15Margashirsha Amavasya December 2025 Astrology: मराठी वर्षातील अत्यंत शुभ आणि पवित्र मानल्या गेलेल्या मार्गशीर्ष महिन्याची सांगता होत आहे. शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ०४ वाजून ५९ मिनिटांनी मार्गशीर्ष अमावास्या सुरू होत आहे. १९ डिसेंबर रोजी अहोरात्र अमावास्या असणार आहे. शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०७ वाजून १२ मिनिटांनी अमावास्या संपणार आहे. त्यामुळे अमावास्येचा कालावधी हा मोठा असणार आहे. अनेकार्थाने अमावास्या शुभ मानली जाते. या दिवशी लक्ष्मी देवीचे केलेले पूजन, मंत्रांचे जप, नामस्मरण शुभ तसेच पुण्य फलदायी मानले जाते.2 / 15मार्गशीर्ष अमावास्या कालावधीत शुक्र धनु राशीत प्रवेश करत आहे. धनु राशीत आताच्या घडीला मंगळ, सूर्य विराजमान आहेत. त्यामुळे मंगल आदित्य, शुक्रादित्य असे राजयोग जुळून आलेला आहे. तसेच अमावास्या सांगतेला चंद्र याच राशीत प्रवेश करेल. त्यामुळे धनु राशीत चतुर्ग्रही योग जुळून येईल. तसेच महालक्ष्मी राजयोगाचीही निर्मिती होणार आहे. 3 / 15आताच्या घडीला गुरु ग्रह वक्री चलनाने मिथुन राशीत आहे. गुरु आणि चंद्राचा समसप्तक योग जुळून येत आहे. अशा अत्यंत शुभ योगात मार्गशीर्ष अमावास्या होत आहे. या सगळ्या ग्रहमानाचा विचार केल्यास तुमच्यासाठी हा अमावास्येचा कालावधी कसा असेल, कोणत्या राशींना लक्ष्मी देवीच्या कृपेचा शुभ लाभ प्राप्त होऊ शकेल, ते जाणून घ्या...4 / 15मेष: संमिश्र फळे मिळतील. एखादे प्रलंबित काम यशस्वीपणे पूर्ण कराल. मात्र, कामात गुप्तता बाळगली पाहिजे. भावनेच्या भरात लोकांना काही सांगू नका. इच्छा-आकांक्षा कृतीत उतरतील. विवाहाच्या दृष्टीने हालचाली वेग घेतील. तावूनसुलाखून निर्णय घ्या. संयमाने वागण्याची गरज आहे. दगदग होईल अशी कामे करू नका. शनिवारी समोरील अनेक अडचणी दूर होतील.5 / 15वृषभ: काही अडचर्णीचे निराकरण होईल, तर काही समस्या तुमचा वैताग वाढवतील. एखाद्या चांगल्या बातमीमुळे सुरुवातीला मनात उत्साह राहील. त्या जोरावर वाटचाल सुरू कराल. मात्र, काही लोकांकडून अपेक्षाभंग होईल. परिस्थिती आटोक्यात येईल. नोकरीत संयमाने वागा. अनपेक्षित लाभ होतील. हाती पैसा खेळता राहील. विवाहाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. शनिवारी घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या.6 / 15मिथुन: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. महत्त्वाची कामे या काळात आटोपून घ्या. नोकरीत एखादा बदल होऊ शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना संधी मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगले अनुभव येतील. संयमाची परीक्षा पाहिली जाईल. कामे शांतचित्ताने करीत राहा. आरोग्याची काळजी घ्या. शनिवारी अडचणी मिटतील, व्यवसायात सफलता मिळेल.7 / 15कर्क: दिवस चांगले जातील. नोकरी-व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. काहींना प्रवासाचा योग येईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. नवीन नोकरीसाठी अर्ज केलेला असेल, तर मुलाखतीचे बोलावणे येईल, स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सफलता मिळेल, सामाजिक मान-सन्मान मिळेल. संततीचे यश सुखावून जाईल. आरोग्याची काळजी घ्या.8 / 15सिंह: अनेक अडचणी दूर होतील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. उत्साहवर्धक वातावरण राहील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. काहींना प्रवास करावा लागेल. आर्थिक गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्या. घाईघाईत निर्णय घेऊ नका. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. पगारवाढ व उच्च पद मिळू शकते. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरातील कामांसाठी वेळ द्यावा लागेल. घरातील वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्या. 9 / 15कन्या: चंद्राचे भ्रमण चांगले जाईल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात भरभराट होईल. त्यादृष्टीने अनुकूलता अनुभवायला मिळेल. भावंडांशी सख्य राहील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. जवळच्या सहलीला जाऊन याल. मात्र, शेवटच्या टप्प्यात नातलगांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण मध्यस्थी करणे टाळा. मालमत्तेची कामे होतील.10 / 15तूळ: नोकरीत अनेक प्रकारचे लाभ होतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एखादा मोठा खर्च करून ठेवू नका. नाही तर मिळालेला पैसा त्यात खर्च होईल आणि हाती काही उरणार नाही. थोडी सबुरी ठेवली तर अनेक अडचणी सुटण्यास सुरुवात होईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. शनिवारी आर्थिक अंदाज चुकू शकतात. जवळच्या प्रवासात सतर्क राहा.11 / 15वृश्चिक: जीवनसाथीची साथ राहील. संयमाने वागण्याची गरज आहे. कुणाच्या सांगण्यावरून हुरळून जाऊन चटकन मोठे निर्णय घेऊ नका. आर्थिक फटका बसू शकतो. कायद्याची बंधने पाळा. परिस्थितीवर नियंत्रण येईल, विवाह ठरेल. मात्र, नीट चौकशी केली पाहिजे. भपकेबाजीला भुलून जाऊ नका. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. त्यांचा सल्ला निश्चितच उपयोगी पडेल.12 / 15धनु: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. त्यामुळे कामे झटपट आटोपून घ्या. दगदग होईल, अशी कामे करू नका. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र, उत्तरार्धात खर्च करण्याकडे कल राहील. चैनीवर अतिरिक्त खर्च होईल. प्रवासात सतर्कता बाळगली पाहिजे. कुणाच्या बोलण्याला भुलू नका. मोहापासून दूर राहा. फोनवरून बोलताना खासगी माहिती गुप्त ठेवा. सायबर भामट्यांपासून सावध राहा.13 / 15मकर: चंद्राचे भ्रमण अनेकविध लाभ देणारे ठरेल. एखादी आनंदवार्ता कानावर पडेल. सभा संमेलने गाजवाल. मुलांची प्रगती होईल. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. भेटीगाठी सफल होतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. शनिवारी थोडे संयमाने वागण्याची गरज आहे.14 / 15कुंभ: काही अडचणी असतील. त्यातून लवकरच बाहेर याल. फक्त घाईघाईत कामे करू नका. सगळ्या अडचणी दूर होतील. प्रगतीचा रथ वेगाने धावू लागेल. चांगल्या घटना घडतील. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. नोकरीत नवनवीन संधी मिळतील. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्या निमित्ताने लोकांची ये-जा चालू राहील.15 / 15मीन: मौजमजा कराल. सतत कशात ना कशात व्यस्त राहाल. परंतु, थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या काळात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. इतरांच्या भानगडीत पडू नका. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण राहील. प्रवास घडून येईल. एखाद्या सार्वजनिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.