By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 08:50 IST
1 / 10नववर्ष सुरू झाले आहे. १४ जानेवारी रोजी सन २०२५ चा पहिला मोठा सण मकरसंक्रांती असणार आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. यंदाच्या वर्षी मकरसंक्रांतीला पुष्य नक्षत्राचा योग असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढल्याचे सांगितले जात आहे. मकरसंक्रांतीपासून पुन्हा शुभ कार्यांची सुरुवात केली जाते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. 2 / 10या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना दिले जाते. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण केल्या जातात. संक्रांतीचा आधीचा दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगूळाचे विशेष महत्त्व असते.3 / 10मकरसंक्रांतीचा सण अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जातो. पतंग उडवणे या दिवसाचे विशेष मानले जाते. सूर्याचे मकर राशीतील गोचर आणि मकरसंक्रांतीला जुळून येणारे शुभ योग काही राशींसाठी उत्तम मानले गेले आहे. धनलाभासह भरभराटीचा हा काळ ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...4 / 10मेष: मकरसंक्रांती शुभ ठरू शकेल. आर्थिक प्रगती आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. चांगली बातमी मिळू शकते. जीवनात सकारात्मक बदल होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात नफा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. धनलाभ होऊ शकतो. यश-प्रगतीच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतात.5 / 10वृषभ: मकरसंक्रांती काळात उत्पन्न वाढू शकेल. नोकरीत बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी काळ चांगला राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. व्यवसायात प्रगती होऊ शकते.6 / 10कर्क: मकरसंक्रांतीचा काळ चांगला जाऊ शकेल. नवीन वर्षात आर्थिक प्रगती होऊ शकते. जीवनसाथीची साथ मिळू शकेल. व्यवसायात विस्तार संभवतो. एखादी प्रदीर्घ इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरदार लोकांना त्यांच्या आवडीच्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते. भावंडांचे नाते अधिक घट्ट होऊ शकेल. कार्यक्षेत्रात यश मिळू शकेल. उधारी परत मिळण्याची शक्यता आहे.7 / 10सिंह: अच्छे दिनची सुरुवात होऊ शकेल. कामात आत्मविश्वासाने पुढे जाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरीत असलेल्यांना बढती मिळू शकते. नेतृत्व क्षमता वाढेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकेल. परदेशात व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. 8 / 10कन्या: अनेक अनपेक्षित परिणाम प्राप्त होऊ शकतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना चांगल्या यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन कार्यात रस असलेले तुलनेने अधिक यशस्वी होतील. व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे आणि नातेसंबंधांबद्दल जास्त काळजी न करणे चांगले.9 / 10वृश्चिक: नशिबाची साथ लाभू शकेल. सुदैवाने कामात यश मिळू शकते. मान-सन्मानात वाढ होऊ शकेल. बोलण्यातून लोकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हाल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आत्मविश्वास वाढू शकतो. व्यवसायात लाभ होऊ शकतो. आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतील.10 / 10मकर: हा कालावधी शुभ ठरू शकतो. व्यवसायात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि उर्जा असेल. प्रेम जीवनात आनंद राहील. मित्रांसोबत देशाबाहेर कुठेतरी जाण्याचा बेत आखू शकतात. विवाहित जोडप्याचे नाते अधिक घट्ट होऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.