शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१८ वर्षांनी महालक्ष्मी नवमपंचम राजयोग: ११ राशींची भरभराट, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ; शुभ काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:46 IST

1 / 15
नवग्रहांचा राजकुमार मानल्या गेलेल्या बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. पुढील काही दिवस बुध कर्क राशीत असेल. बुधाने कर्क राशीत प्रवेश केल्यामुळे मीन राशीत असलेल्या शनि ग्रहासोबत नवमपंचम योग जुळून येत आहे. या योगाचे शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात.
2 / 15
आताच्या घडीला नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीत विराजमान आहे. २९ जून २०२५ रोजी चंद्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करत आहे. यामुळे महालक्ष्मी राजयोग जुळून आला आहे. असे योग १८ वर्षांनी जुळून आल्याचा दावा केला जात आहे. हा एक अतिशय शुभ योग मानला गेला आहे.
3 / 15
या दोन योगांसह मीन राशीतील शनि आणि सिंह राशीतील मंगळ आणि केतु यांचा षडाष्टक योग जुळून आला आहे. हा योग काही प्रमाणात प्रतिकूल मानला गेला आहे. असे असले तरी या योगाचा अनेक राशींवर सकारात्मक आणि शुभ प्रभाव पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. या सर्व योगांचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: बुधाचे परिवर्तन लाभदायक ठरू शकेल. अनेक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगले फायदे मिळू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी चांगले संबंध असू शकतात. स्थावर मालमत्ता, मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये यश मिळू शकते. घर आणि कुटुंबाशी संबंधित अनेक बाबींमध्ये यशस्वी होऊ शकता.
5 / 15
वृषभ: नवमपंचम व महालक्ष्मी राजयोग सकारात्मक ठरू शकतो. या काळात भौतिक सुख मिळू शकते. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. कुटुंबातही आनंद राहील. काही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकेल. पदोन्नती किंवा पगारवाढीच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात असलेल्यांना अचानक चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
6 / 15
मिथुन: महालक्ष्मी राजयोग सकारात्मक ठरू शकतो. आत्मविश्वास वाढू शकतो. कामात चांगली कामगिरी कराल. फायदे मिळू शकतात. मानसिक ताण थोडा कमी होऊ शकतो. कुटुंब किंवा मित्रांसोबत प्रवास करण्याची योजना आखू शकता. भावंडांशी चांगले संबंध असू शकतात. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. व्यवसायात मेहनतीचे फळ मिळू शकते.
7 / 15
कर्क: महालक्ष्मी राजयोग अनुकूल ठरू शकतो. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यक्तिमत्व सुधारेल. धैर्य आणि शौर्य वाढेल. शेअर बाजार, संशोधन किंवा ऑनलाइन गेमिंग सारख्या स्रोतांमधून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा हा काळ आहे. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात.
8 / 15
कन्या: बुधाचे परिवर्तन आनंददायी ठरू शकेल. अनेक क्षेत्रात शुभ परिणाम मिळू शकतात. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. समाजात ओळख निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकता. रिअल इस्टेट आणि मालमत्तेशी संबंधित क्षेत्रात फायदे मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना आदर मिळेल. कामाचे कौतुक होईल. प्रतिष्ठा मिळेल. भावंडांशी चांगले संबंध निर्माण करू शकता. मेहनतीचे फळ मिळू शकते. कामाच्या ताणतणावात असाल तर आता त्यातून आराम मिळू शकतो.
9 / 15
तूळ: महालक्ष्मी व नवमपंचम राजयोगाने विविध क्षेत्रांत यश मिळवू शकता. आर्थिक स्थिती चांगली ठरू शकेल. पैशाच्या टंचाईपासून मुक्तता मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी फायदे मिळू शकतील. स्पर्धकांना कडक स्पर्धा देऊ शकाल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. ताण थोडा कमी होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
10 / 15
वृश्चिक: महालक्ष्मी राजयोग फायदेशीर ठरू शकतो. या काळात काम आणि व्यवसायात चांगली प्रगती मिळू शकते. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. शेअर बाजार किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरतील. परदेश प्रवासाच्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.
11 / 15
धनु: अनुकूल परिणाम दिसून येतील. अडकलेले काम पुन्हा सुरू करू शकता. मेहनतीचे चांगले परिणाम मिळू शकतात. पद आणि प्रतिष्ठा मिळेल. समाजात एक वेगळी प्रतिमा निर्माण करू शकाल. कामाच्या ठिकाणी चांगले प्रदर्शन करू शकाल. चांगली वाढ मिळू शकते.
12 / 15
मकर: शनि आणि मंगळ यांचा षडाष्टक योग आणि मंगळ केतु यांचा युती योग फायदेशीर ठरू शकतो. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. धैर्य आणि शौर्य वाढू शकते. करिअर नवीन उंची गाठेल. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम फळाला येतील. कामाचे कौतुक होऊ शकेल. निर्णय योग्य ठरतील. उच्च अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल. भूतकाळात केलेली गुंतवणूक फायदा मिळवून देऊ शकते.
13 / 15
कुंभ: नवमपंचम योगाने नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. नशिबाची साथ मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. सुखसोयी वाढतील. पद आणि प्रतिष्ठेचा लाभ मिळेल. सामाजिक वर्तुळ विस्तारेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता वाढेल. इच्छा पूर्ण होऊ शकतील.
14 / 15
मीन: महालक्ष्मी राजयोगाने अनेक क्षेत्रात यश मिळू शकेल. मेहनतीचे फळ मिळू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. आदर आणि सन्मान वाढू शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
15 / 15
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक