वास्तुदोष दूर करण्यासाठी कापराचे 'हे' उपाय ठरतील अत्यंत उपयुक्त; वाचा

By देवेश फडके | Published: January 21, 2021 08:00 PM2021-01-21T20:00:20+5:302021-01-21T20:08:17+5:30

आरतीमध्ये कापूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. घरात सकारात्मकता आणण्यासाठी कापूरयुक्त धूप करण्याचा सल्ला दिला जातो. वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध झाले आहे की, कापराच्या सुगंधाने जिवाणू, विषाणू आदी नष्ट होतात. अनेक उपयोग असलेला कापूर वास्तुदोषावरही परिणामकारक असल्याचे म्हटले जाते. जाणून घेऊया...

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडली, ग्रह-नक्षत्र यांचा अभ्यास करून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, गुण-वैशिष्ट्य, व्यक्तिमत्त्व याचा अंदाज बांधला जाऊ शकतो, त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात घर, घराची रचना, घराचे गुण-दोष यांवरून काही अंदाज बांधता येतात, असे म्हटले जाते. आपले घर म्हणजे वास्तू कशी असावी, कशी नसावी, वास्तुदोष असल्यास काय करावे, याबाबत सखोल आणि विस्तृत विवेचन या शास्त्रात केल्याचे पाहायला मिळते.

घरी पूजा असली धूप आणि कापूर आवर्जुन आणले जाते. आरतीमध्ये कापूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. कापराचा सुगंध अनेकांना आवडतो. कापूर प्रज्वलित केला ही त्यातून दरवळणारा मंद सुगंध वातावरण प्रसन्न करतो. घरात सकारात्मकता आणण्यासाठी कापूरयुक्त धूप करण्याचा सल्ला दिला जातो.

ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव राहत नाही, अशी मान्यता आहे. कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते, असे म्हटले जाते. वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध झाले आहे की, कापराच्या सुगंधाने जिवाणू, विषाणू आदी नष्ट होतात. यामुळे वातावरण शुद्ध होते. यामुळे आजार दूर राहतात. त्यामुळेच पूजा, आरती आणि धार्मिक विधींमध्ये कापराला विशेष महत्त्व आहे.

कापराचे आरोग्यदायी फायदेही अनेक असल्याचे सांगितले जाते. एखादी जखम झाली असेल, तर कापरामध्ये पाणी मिश्रित लावणे उपयुक्त मानले जाते. वेदनेवरही कापूर रामबाण मानला गेला आहे. केसातील कोंड्यावरही कापूर उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. असा अनेक उपयोग असलेला कापूर वास्तुदोषावरही परिणामकारक असल्याचे म्हटले जाते.

घरात एखाद्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण झाला असेल, तेथे कापराच्या दोन वड्या ठेवाव्यात. कापराच्या वड्या विरघळल्या की, पुन्हा दोन वड्या ठेवाव्यात. असे नियमितपणे करत राहावे. असे केल्याने काही कालावधीनंतर वास्तुदोष नाहीसा होऊ शकतो, असे मानले जाते.

कापरामुळे राहु, केतु आणि शनीचे दोष दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच दररोज स्वयंपाक घरातील कामे उरकल्यानंतर लवंग आणि कापूर एकत्र प्रज्वलित करणे उपयुक्त ठरते. असे नियमितपणे करणे भाग्यकारक ठरते. यामुळे घरात धन, धान्य यांची कमतरता राहत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.