शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

२०२३ मध्ये केतु बदलणार रास: ‘या’ ४ राशींना अपार लाभ; सुख-समृद्धी, पद-प्रतिष्ठेत होणार वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 15:20 IST

1 / 9
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास सन २०२३ अतिशय महत्त्वाचे मानले जात आहेत. सन २०२३ मध्ये शनी, गुरु, राहु, केतु हे मोठे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. पैकी शनीचा होणारा कुंभ प्रवेश अतिशय विशेष मानला जात आहे. (ketu vakri in 2023)
2 / 9
शनीच्या कुंभ प्रवेशाने साडेसातीचे चक्र बदलणार आहे. धनु राशीची साडेसाती समाप्त होणार असून, मीन राशीची साडेसाती सुरू होणार आहे. यासह राहु आणि केतु यांचेही राशीपरिवर्तन अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. राहु आणि केतु हे दोन्ही ग्रह कायम वक्री चलनानेच राशीपरिवर्तन करतात. (ketu retrograde in 2023)
3 / 9
आताच्या घडीला राहु आणि केतु अनुक्रमे मेष आणि तूळ राशीत विराजमान आहेत. तर, सन २०२३ मध्ये राहु आणि केतु अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत प्रवेश करतील. पैकी केतुचा कन्या राशीतील प्रवेश काही राशीच्या व्यक्तींना शुभ लाभदायक असल्याचे सांगितले जात आहे.
4 / 9
राहु आणि केतु हे दोन्ही ग्रह एखाद्या राशीत सुमारे १८ महिन्यापर्यंत विराजमान असतात. दुसरे म्हणजे हे ग्रह कायम एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात. हे दोन्ही ग्रह क्रूर आणि मायावी मानले गेलेले आहेत. मात्र, हे दोन्ही ग्रह शुभ स्थानी असतील, तर सर्वोत्तम फले देतात आणि अनेकविध लाभ यामुळे होऊ शकतात, असे मानले जाते.
5 / 9
सन २०२३ मध्ये होणाऱ्या केतुच्या कन्या प्रवेशाने काही राशींना चांगला लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे. नोकरी, करिअर, व्यवसाय, आर्थिक आघाडीवर सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. नेमक्या कोणत्या राशींना केतु राशीपरिवर्तनाचा फायदा होऊ शकेल? ते जाणून घेऊया...
6 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना केतुचे राशीपरिवर्तनाचा खूप फायदा होईल. तुमची मेहनत फळाला येईल. भरपूर पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कामात सुधारणा दिसून येईल. कामे यशस्वी होतील. जोखीम पत्करून कामे करू शकता. व्यावसायिक किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
7 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना केतुच्या प्रभावामुळे सन २०२३ चे वर्ष चांगले राहण्याची अपेक्षा आहे. अपेक्षेप्रमाणे अधिक यश मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी इच्छित परिणाम मिळू शकतात. खोळंबलेली कामे पूर्ण होऊ शकतात. अति काम आणि ताणामुळे शारीरिक त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
8 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना केतुचे राशीपरिवर्तन सुखमय ठरू शकेल. तुम्ही एखादे वाहन किंवा जमीन खरेदी करू शकता. तुमच्या भौतिक सुखसोयी वाढतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमची कीर्ती वाढेल. तुम्हाला माफक आर्थिक नफा होईल.
9 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना केतुचे राशीपरिवर्तन लाभदायक ठरू शकेल. आत्मविश्वास वाढू शकेल. मंगल कार्याचे आयोजन करता येऊ शकेल. एवढेच नाही तर तुम्ही परदेशातही प्रवास करू शकाल. परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. काही चांगल्या कामांसाठी पैसे खर्च होऊ शकतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य