Kedarnath yatra 2023: बाबा केदारनाथचे उघडले द्वार,पण... नियम व अटी लागू; सविस्तर जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 15:39 IST
1 / 5पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, केदारनाथ धामचे दरवाजे उघडताच दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी रावल भीम शंकर लिंग शिवाचार्य यांनी बाबा केदारनाथ धामचे दरवाजे उघडले. दर्शनोत्सुक असलेल्या भाविकांनी बाबा केदारनाथचा जयघोष केला आणि दर्शनासाठी एकच गर्दी केली. 2 / 5मंगळवारी सकाळी ६.२० वाजता बाबा केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले. कडाक्याची थंडी असूनही येथे आठ हजार भाविकांची उपस्थिती होती. कारण तशी पूर्वसूचना भाविकांना मिळाली होती. केदारनाथ धामचे दर्शन घेणे ही शिवभक्तांसाठी पर्वणी असते. मात्र तिथले हवामान पाहता भौगोलिक परिथिती पाहून दर्शनास जावे लागते. याबाबत प्रशासन निर्णय घेते. 3 / 5सद्यस्थितीत बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे राज्य सरकारने केदारनाथ यात्रेकरूंची दर्शनासाठीची नोंदणी ३० तारखेपर्यंत बंद केली आहे. तिथे दर्शनाला जाण्यासाठी नोंदणी आवश्यक असल्याने भाविकांना पुनश्च काही काळ वाट बघावी लागेल. त्याबाबतीत पुढील सूचना राज्य सरकार कडून केल्या जातील. साधारण ९ मे रोजी मंदिर पुन्हा उघडले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 4 / 5सध्या तिथे दर्शनाला आलेल्या भाविकांना ऋषिकेश, गौरीकुंड, गुप्तकाशी आणि सोनप्रयागसह तिथल्या नजीकच्या परिसरात थांबण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने पुन्हा दर्शन खुले केले असता पुढील सहा महिने भाविकांना बाबा केदारनाथचे दर्शन घेता येईल.5 / 5ऋषिकेशपासून 223 किमी (१३९ मैल) ३,५८३ मीटर (११,७५५ फूट) उंचीवर, गंगेची उपनदी मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे मंदिर अज्ञात तारखेची दगडी इमारत आहे. मूळ केदारनाथ मंदिर कोणी व केव्हा बांधले हे निश्चित नाही. 'केदारनाथ' या नावाचा अर्थ 'क्षेत्राचा स्वामी' आहे: त्याच्या दर्शनासाठी जाण्याचा तुम्हीदेखील विचार करत असाल तर केदारनाथच्या सरकारी आणि अधिकृत संकेत स्थळावर लक्ष ठेवून नाव नोंदणी करा.