Kamika Ekadashi 2024: आज कामिका एकादशीनिमित्त घरी आणा मोरपीस; वैवाहिक जीवन होईल सुखी-आनंदी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 09:46 IST
1 / 8कामिका एकादशीला कृष्णैका एकादशी असेही म्हणतात. आजच्या तिथीला विष्णूंच्या कृष्ण रूपाची पूजा केली जाते. कृष्णाला मोरपीस प्रिय आहे, म्हणून आज वास्तू शास्त्रात दिलेला उपाय केला जातो. श्रीकृष्णाने मोरपिसाला आपल्या मुकुटात मानाचे स्थान दिले आहे. तसेच माता सरस्वती, इंद्रदेव, कार्तिकेय आणि गणपती बाप्पालाही अतिशय प्रिय आहे. असे मोरपीस आपल्या घरात सुख, समृद्धी, शांतता आणि आनंद घेऊन येते, म्हणून वास्तूशास्त्रात त्याला अतिशय मानाचे स्थान आहे. चला तर, आपणही त्याचे लाभ जाणून घेऊ. 2 / 8>> काही जण आपल्या पुस्तकात, वहीत किंवा भिंतीवर मोरपीस लावणे पसंत करतात. ही केवळ शोभेची वस्तू नाही, तर वास्तू दोष दूर करणारी वस्तू आहे. वास्तुशात्र सांगते!3 / 8>> शनी दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तीन मोरपिसे काळ्या धाग्यात गुंडाळून, सुपारीचे काही तुकडे घेऊन त्यावर पाणी शिंपडावे आणि 'ओम शनैश्वर नमः' हा मंत्र २१ वेळा जपावा. 4 / 8>> आठ मोरपिसे पांढऱ्या धाग्यात गुंडाळून 'ओम नमो सोमाय नमः' हा मंत्र म्हणून बेडरूमच्या भिंतीवर टांगून ठेवा. यामुळे दाम्पत्य जीवनात काही कुरबुरी असतील, तर त्या दूर होऊन नवरा बायको मध्ये प्रेम निर्माण होते. 5 / 8>> धन वृद्धीसाठी आपल्या तिजोरीत मोरपीस ठेवावे. घरातल्या मुख्य खोलीत अर्थात हॉलमध्ये मोराचे, मोरपंखाचे किंवा कृष्णाचे चित्र लावावे. प्रसन्न वाटते. 6 / 8>> घराच्या मुख्य दरवाजावर मोरपीस लावल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. 7 / 8>> मोरपिसांचा उपयोग औषध निर्मितीसाठीदेखील केला जातो. ते सतत डोळ्यासमोर असले, तरी मन प्रसन्न राहते आणि मन प्रसन्न राहिल्याने स्वास्थ्य चांगले राहते. 8 / 8>> एकाग्रता वाढवण्यासाठी मोरपिसाचा वापर केला जातो. मोरपीस पाहून मन शांत होते.