1 / 11जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह स्वराशीत म्हणजेच मिथुन राशीत प्रवेश करत आहे. ०६ जून २०२५ रोजी बुध मिथुन राशीत विराजमान होत असून, २२ जून २०२५ पर्यंत याच राशीत असेल. यानंतर बुध कर्क राशीत प्रवेश करणार आहे.2 / 11मिथुन राशीत नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह विराजमान आहे. बुध ग्रहाचा मिथुन राशीत प्रवेश झाल्यानंतर या दोन्ही ग्रहांची युती होणार आहे. हे दोन्ही ग्रह शुभ ग्रह मानले जातात. त्यामुळे सुमारे १६ दिवस काही राशींना उत्तम लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.3 / 11तसेच १० जून २०२५ रोजी बुधाचा मिथुन राशीत उदय होत आहे. कोणत्या राशींवर शुभ प्रभाव असू शकेल? कोणत्या राशींना कल्याणकारी लाभ प्राप्त होऊ शकतील? यश, प्रगती, सुख, समृद्धी, धन-धान्याने भरभराट होऊ शकेल? तुमची रास आहे का यात? जाणून घेऊया...4 / 11वृषभ: व्यक्तिमत्व सुधारेल. आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतील. कुटुंबात आनंद राहील. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. तसेच, या काळात उत्पन्नात वाढ दिसून येऊ शकेल.5 / 11मिथुन: कुटुंबाशी संबंध चांगले राहतील. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील. करिअरमध्ये यश, प्रगतीची संधी मिळू शकेल. मानसिक ताणतणावापासून दिलासा मिळू शकेल. भागीदारीच्या कामात फायदा मिळू शकतो. नवीन लोकांशी संबंध निर्माण होतील. याचा भविष्यात फायदा होईल.6 / 11सिंह: नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाचे कौतुक होईल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होऊ शकतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. आर्थिक स्थिती मजबूत राहू शकेल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. इच्छा पूर्ण होतील.7 / 11कन्या: काम आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते. तसेच नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ शक्य आहे. त्याचबरोबर व्यावसायिकांना एखाद्या मोठ्या प्रकल्पाचा किंवा क्लायंटचा फायदा होऊ शकतो. या काळात वडिलांशी चांगले संबंध राहतील. सुखसोयी आणि सुविधा वाढतील. कामाच्या ठिकाणी आदर वाढू शकेल.8 / 11वृश्चिक: अनपेक्षित लाभ होऊ शकतो. अनपेक्षित पैसा मिळू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. यश मिळू शकते. हुशारीने काम केले तर तुम्ही स्पर्धात्मक गोष्टींमध्ये जिंकू शकता. सामाजिक सन्मान वाढू शकतो. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. विविध फायदे प्राप्त होऊ शकतात.9 / 11मकर: शुभ, कल्याणाकारी गोष्टींचा आलेख वाढू शकतो. अधिक मेहनत करावी लागेल. कामात चांगले यश मिळू शकेल. चांगले परिणाम मिळू शकतात. स्पर्धात्मक कामांमध्ये चांगली कामगिरी करू शकाल. आदर वाढण्याची शक्यता आहे. कला किंवा साहित्याशी संबंधित लोकांना चांगला लाभ प्राप्त होण्याची शक्यता आहे.10 / 11मीन: सुखसोयी आणि सुविधा वाढू शकतील. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. सासू-सासऱ्यांशी असलेले नाते अधिक दृढ होऊ शकेल. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट, प्रॉपर्टी, जमिनी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना लाभ मिळू शकतो. एखाद्याला काही पद मिळू शकते.11 / 11- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.