Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 21:13 IST
1 / 12Indigo Airlines Kundali Prediction: Indigo ही देशातील सर्वांत मोठी एअरलाइन कंपनी आहे. देशात इंडिगो कंपनीची मोठी चलती आहे. इंडिगो कंपनीचे शेअरही चांगली कामगिरी करताना दिसतात. सर्व काही ऑल इज वेल सुरू असताना अचानक इंडिगो व्यवस्थापनात एकच गोंधळ सुरू झाला आणि हवेत असणारी इंडिगो कंपनी अवघ्या काही दिवसांत जमिनीवर आल्याचे पाहायला मिळाले. 2 / 12केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने गेल्या वर्षी नियमात काही बदल करून त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे विमान कंपन्यांना सांगितले होते. हे बदल स्वीकारण्यासाठी विमान कंपन्यांना पुरेशी मुदतही देण्यात आली होती. असे असूनही सरकारच्या बदललेल्या नियमांकडे Indigo कंपनीने कानाडोळा केल्याचा दावा केला जात आहे. 3 / 12Indigo कंपनीला मुदत वाढ देऊनही नियमांची अंमलबजावणी केली नाही. यानंतर इंडिगो कंपनीचे व्यवस्थापन ढासळले आणि हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या ढासळलेल्या व्यवस्थापनामुळे दोन हजारांपेक्षा जास्त विमाने रद्द करण्यात आली. यानंतर केंद्र सरकार आणि इंडिगो कंपनीच्या अधिकाऱ्यांची मोठी बैठक झाली. या बैठकीत इंडिगो कंपनीला महत्त्वाचे निर्देश देण्यात आले. 4 / 12इंडिगो कंपनीच्या उड्डाणांना अचानक ग्रहण कसे लागले, याचा ज्योतिषीय दृष्टिने विचार केल्यास कंपनीच्या सुरू असलेली साडेसाती आणि दोन शत्रू ग्रहांची महादशा यांमुळे गडबड झाली असू शकते, असा दावा काही तज्ज्ञांकडून केला जात आहे. Indigo कंपनीची कुंडली काय सांगते, ते जाणून घेऊया...5 / 12Indigo कंपनीची स्थापना ११ ऑगस्ट २००६ रोजी झाली आहे. गेल्या १९ वर्षांपासून इंडिगो कंपनी विमान उड्डयन क्षेत्रात सेवा देत आहे. हळूहळू प्रगतीचे टप्पे गाठत इंडिगो देशातील आघाडीची विमान कंपनी बनली. आताच्या घडीला इंडिगो कंपनीकडे सर्वाधिक विमाने आहेत. इंडिगो कंपनीची कुंडली वृषभ लग्नाची आहे. कुंडलीच्या तिसऱ्या स्थानी कर्क राशीत चार ग्रहांची युती झालेली आहे. 6 / 12Indigo कंपनीच्या कुंडलीतील तिसऱ्या स्थानी कर्क राशीत शुक्र, बुध, शनि आणि सूर्य असे ग्रह विराजमान आहेत. पैकी शनि आणि सूर्य पिता-पुत्र असले, तरी एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. त्यामुळे अनेकदा दोन्ही ग्रह एकाच राशीत, एकाच स्थानी असणे फारसे शुभ मानले जात नाही. 7 / 12तिसऱ्या स्थानाचा स्वामी चंद्र दहाव्या स्थानी कुंभ राशीत विराजमान आहे. म्हणजेच Indigo कंपनीची चंद्र रास कुंभ आहे. कुंभ राशीचा स्वामी शनि असून, आताच्या घडीला कुंभ राशीचा साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे. सध्या शनि मीन राशीत विराजमान आहे. 8 / 12जोपर्यंत शनि मीन राशीत विराजमान असणार आहे, तोपर्यंत कुंभ राशीची साडेसाती सुरू राहणार आहे. जून २०२७ मध्ये कुंभ राशीची साडेसाती संपणार आहे. तसेच दशमेश शनिच्या स्थानी एक मोठा परिवर्तन योग घडवत असल्याचे पाहायला मिळत आहे, असे म्हटले जात आहे. या योगामुळेच Indigo कंपनीने सर्वांना धोबी पछाड देत देशातील सर्वांत मोठी कंपनी होण्याचा मान कमावला, असे सांगितले जाते. 9 / 12Indigo कंपनीच्या कुंडलीतील अकाव्या स्थानी मीन राशीत राहु तर पाचव्या स्थानी कन्या राशीत केतु विराजमान आहे. तर चौथ्या स्थानी सिंह राशीत मंगळ ग्रह आहे. सहाव्या स्थानी तूळ राशीत गुरू विराजमान आहे. आताच्या घडीला गुरुच्या महादेशत शुक्राची अंतर्दशा सुरू आहे. ही स्थिती संकटे, उलट परिस्थितीचे सूचक असल्याचे म्हटले जाते. गुरू आणि शुक्र हे दोन्ही शुभ ग्रह असले तरी एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात.10 / 12गुरू आणि शुक्र या शत्रू ग्रहांच्या महादशेतील अंतर्दशेची शुभ आणि अशुभ अशी दोन्ही फळे मिळू शकतात, असे सांगितले जाते. गुरू आणि शुक्राची षडाष्टक योगाची स्थितीमुळे सदर वादाला Indigo कंपनीला तोंड द्यावे लागत असल्याचे म्हटले जात आहे. गुरू आणि शुक्राची ही स्थिती २०२६ पर्यंत कायम राहणार आहे. 11 / 12तसेच दुसरीकडे मंगळाची अशुभ दशा सुरू आहे. २०२७ पर्यंत मंगळात राहुची विंशोत्तरी दशा सुरू राहणार आहे. जून २०२७ पर्यंत शनि मीन राशीत असल्यामुळे साडेसातीही कायम राहणार आहे. त्यामुळे आगामी काळ Indigo कंपनीसाठी आव्हानात्मक ठरू शकतो, असा कयास बांधला जात आहे. ग्रहांच्या प्रतिकूल परिस्थिती Indigo कंपनीने सावध पवित्रा घेणेच सर्वोत्तम ठरू शकते, असे मानले जात आहे. 12 / 12सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.