Health and Spirituality: उत्तम आरोग्यासाठी रोज वाजवा शंख; जाणून घ्या मुख्य फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:57 IST
1 / 7हिंदू धर्मात विष्णूंना प्रिय शंख म्हणून देव्हाऱ्यात शंख ठेवला जातो. रोज पूजाही केली जाते. शंख पाण्याने धुवून आतून बाहेरून स्वच्छ केला जातो. त्याला गंध, अक्षता, फुल वाहिले जाते. ज्यांना शंख वादन येते ते शंख फुंकतात, बाकीचे पूजा करून परत देव्हाऱ्यात ठेवून देतात. मात्र शास्त्रानुसार पूजेनंतर रोज तीन वेळा शंख वादन करायला हवे. कारण शंखध्वनीमुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि रोजच्या सरावामुळे आरोग्यही सुधारते. कसे ते सांगताहेत डॉ अमित भोरकर!2 / 7शंख वादन करून आरोग्य सुधारता येते, हे अनेकांना माहीत असते पण ते त्याचा सराव करत नाहीत. मात्र पुढील उपयोग वाचून लोकांमध्ये निश्चितपणे शंखवादन सुरु करतील. वाचा शंख वादनाचे फायदे :3 / 7शंख वादनामुळे मूत्राशय, पोटाचा खालील भाग, डायफ्राम, छाती आणि मानेच्या स्नायूंना उत्तम व्यायाम मिळतो. एवढेच नाही तर गुदाशयाचे स्नायूही बळकट होतात आणि चयापचय यंत्रणा सुरळीत होते. 4 / 7शंख वाजवण्याने प्रोस्टेट ग्रंथींवर दबाव पडतो आणि याने प्रोस्टेट स्वास्थ सुधारतं. हे प्रोस्टेट वृद्धी रोखण्यात मदत करतं. फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी व फुफ्फुसाच्या स्नायूंचा विस्तार होतो आणि श्वास घेण्याची क्षमता वाढते. थायरॉईड ग्रंथीत सुधारणा होते. व्होकल कॉड्स सुरळीत कार्य करतात. बोलण्यात स्पष्टता येते. बोबडे बोलणे सुधारते. अमुक एक वयानंतरही मुलांमध्ये तोतरेपणा जाणवत असेल तर मुलांकडून शंख वादनाचा सराव करून घ्यावा. वाचा सुधारते. 5 / 7चिरतरुण सौंदर्यासाठी शंखवादन करावे. त्यामुळे चेहर्याचे स्नायू खेचले जातात, लवचिक होतात आणि त्वचा उजळते व अकाली सुरुकुत्या येण्याचे कारण दूर होते. तसेच त्वचारोग निवारणासाठीही शंखाचा उपयोग केला जातो. त्यासाठी रात्र भर शंखामध्ये पाणी भरून ठेवावे. सकाळी या पाण्याने शरीरावर मालीश करावी. याने त्वचेसंबंधी रोग दूर होतात.6 / 7शंखाच्या ध्वनीमध्ये सकारात्मकता असते. वातावरण शुद्धी होते. वाईट विचार दूर होतात आणि डोक्यातील विचारांचे चक्र थांबून मेंदूवरील ताण हलका होण्यास मदत होते. शंख वाजवताना त्यातून ऊँकाररुपी ध्वनी बाहेर पडतो, ज्यामुळे मन प्रसन्न होते. तसेच नियमित शंख वाजवणार्यास हार्ट अटॅकचा धोका टळतो. शंख वाजवणे हे श्वास नियंत्रणाचे काम असल्याने सर्व ब्लॉकेज उघडतात. 7 / 7असे हे शंख वादन आरोग्यासाठी लाभदायी आहे, त्यामुळे कोणाच्या नावे शंख करण्यापेक्षा पांढरा शुभ्र शंख रोज तीन वेळा वाजवायला सुरुवात करा. शंख वादन कसे करायचे ते शिकून घ्या. मात्र, त्याचा अतिवापर करू नका.