By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 10:16 IST
1 / 15गुढीपाडवा आणि श्रीराम नवमीनंतर देशभरात साजरा केला जाणारा मोठा सण म्हणजे हनुमान जयंती. ०६ एप्रिल रोजी यंदा हनुमान जयंती आहे. यावर्षीच्या हनुमान जयंतीला अद्भूत शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगांमध्ये हनुमान जयंतीचे व्रत करणे शुभ मानले जाते. सर्वार्थ सिद्धी योगासह जुळून येणाऱ्या अन्य योगांच्या कालावधीत रामचरित मानस आणि सुंदरकांड पठण करणे लाभदायी मानले गेले आहे. (Hanuman Jayanti 2023) 2 / 15ज्योतिषशास्त्रानुसार, या हनुमान जयंतीला मेष राशीत ग्रहांच्या संयोगाने उत्तम राजयोगही जुळून येत आहेत. मेष राशीत राहु, शुक्र आणि बुधाचा त्रिग्रही योगही जुळून येत आहे. विशेष योगांमध्ये हनुमंतांचे पूजन करणे, नामस्मरण करणे फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नकारात्मकता दूर होते, सकारात्मकता, आत्मविश्वास वाढीस लागतो, असे म्हटले जाते. 3 / 15यातच हनुमंतांची विशेष कृपा आणि मनोवांच्छित इच्छा पूर्ण होण्यासाठी हनुमान जयंतीला राशीनुसार मंत्रांचे पठण केल्यास तसेच हनुमानाच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य अर्पण केल्यास त्याचा लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. यामुळे समस्या, अडचणीतून दिलासा मिळू शकतो. यश, प्रगती साध्य करता येऊ शकते. तुमची रास कोणती? राशीनुसार मंत्र आणि कोणता नैवेद्य अर्पण करावा, ते जाणून घ्या...4 / 15मेष राशीत राहु, शुक्र आणि बुधाचा त्रिग्रही योग जुळून येत आहे. हनुमंतांची विशेष कृपा मिळण्यासाठी या राशीच्या व्यक्तींनी बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा. तसेच मंगलमय जीवनासाठी ॐ अं अंगारकाय नमः या मंत्राचा शक्य असेल तर १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. 5 / 15वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. तसेच ॐ हं हनुमते नमः मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. 6 / 15मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या व्यक्तींनी हनुमंतांचा तुळस अर्पण करावी. तसेच शुभफलप्राप्तीसाठी 'अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्। सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥' या मंत्राचा जप करावा.7 / 15कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीला बजरंगबलीला बेसनाच्या हलव्यांचा नैवेद्य दाखवावा. तसेच ॐ अंजनिसुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो मारुति प्रचोदयात् या मंत्राचा यथाशक्ती जप करावा.8 / 15सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या व्यक्तींनी हनुमंतांना कणकेच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. तसेच ॐ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट या मंत्राचा यथाशक्ती जप करावा.9 / 15कन्या राशीचा स्वामी बुध आहे. हनुमान जयंतीला मारुतीरायाला तुपातील जिलबीचा नैवेद्य दाखवावा. तुळस अर्पण करावी. तसेच 'अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्। सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥' या मंत्राचा जप करावा.10 / 15तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या व्यक्तींनी हनुमानाला मिश्रीचा नैवेद्य दाखवावा. तसेच ॐ हं हनुमते नमः मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.11 / 15वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीरायाला चणे, बुंदीचा नैवेद्य दाखवावा. तसेच ॐ अं अंगारकाय नमः या मंत्राचा शक्य असेल तर १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. 12 / 15धनु राशीचा स्वामी गुरू आहे. या राशीच्या व्यक्तींनी हनुमंतांचा केळी अर्पण करावीत. तसेच ॐ हं हनुमते नमः या मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.13 / 15मकर राशीचा स्वामी शनी आहे. यंदाच्या हनुमान जयंतीला या राशीच्या व्यक्तींनी मोतीचूर लाडवाचा नैवेद्य दाखवावा. तसेच ॐ नमो हनुमते रूद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा या मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. 14 / 15कुंभ राशीचा स्वामी शनी असून, स्वराशीत आहे. या राशीच्या व्यक्तींनी सिंदूर लेप लावावा. तसेच ॐ नमो हनुमते रूद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा या मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. 15 / 15मीन राशीचा स्वामी गुरु आहे. गुरु ग्रह स्वराशीत आहेत. या राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीला मारुतीरायाला मलाई-मिश्री आणि लाडवाचा नैवेद्य दाखवावा. तसेच ॐ हं हनुमते नमः या मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.