1 / 8गुरु उदय होत असताना जगभरात अनेक तापदायक घडामोडी घडतात. जागतिक स्तरावर सांगायचे तर युद्ध, भूकंप, दहशवाद या घटना घडू शकतात तर व्यक्तिगत स्वरूपात म्हणजेच राशींच्या अनुषंगाने सांगायचे तर नाते संबंधांमध्ये फूट, वाद, घातपात अशा घटना घडू शकतात. अशा वेळी पुढील ७ राशींनी विशेष काळजी घ्यावी असे ज्योतिषांनी सुचवले आहे. ही काळजी नेमकी कोणत्या स्वरूपात घ्यायला हवी ते जाणून घेऊ. 2 / 8मेष : मेष राशीच्या तिसऱ्या घरात गुरूचा उदय होत आहे. साधारणपणे, तिसऱ्या घरात गुरू असणे भाग्यासाठी चांगले मानले जात नाही. अशा परिस्थितीत, गुरूच्या उदयामुळे फारसे सकारात्मक परिणाम अपेक्षित नाहीत. मिथुन राशीत गुरूच्या उदयामुळे प्रवास योग येतो पण तो फायदेशीर ठरत नाही, केवळ वेळेचा अपव्यय ठरतो. परदेशाशी संबंधित बाबींमध्ये काही चांगले परिणाम दिसू शकतात. सगळ्यांशी जुळवून घेणे हिताचे ठरेल. अकारण वाद उकरून काढल्यास नात्यात फूट पडण्याची शक्यता असते, तेव्हा सांभाळून राहणे चांगले. 3 / 8वृषभ : वृषभ राशीसाठी हा संमिश्र घटनांचा काळ असेल. आरोग्य तसेच आर्थिक अडचणी निर्माण झाल्याने मानसिक ताण जाणवेल. मात्र या काळात कुटुंबात काही आनंददायी घटना घडल्याने बाकीचे प्रश्न, समस्या, दुःख विसरून कौटुंबिक सौख्यात सहभागी व्हाल आणि त्यामुळे तुमची सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल. हितशस्त्रूंचा धोका संभवतो. होणारे काम अडल्याने चीड चीड होऊ शकते. अशा वेळी मन शांत ठेवणे हिताचेच ठरेल. 4 / 8मिथुन : मिथुन राशीत गुरूचा उदय होत असल्याने सर्वात जास्त प्रभाव या राशीवर होणार आहे. मिथुन राशीतून गुरूचा अस्त होणार असल्याने मिथुन राशीच्या लोकांचे आयुष्य देखील काही काळ अंधारलेले राहील. अपेक्षित यश मिळण्यासाठी काही काळ वाट बघावी लागेल. आरोग्याच्या तक्रारी डोकं वर काढणार आसल्याने पैसेही मोठ्या प्रमाणात खर्च होतील. त्यामुळे तब्येतीची काळीज घ्या आणि अनावश्यक खर्च टाळा. खाण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 5 / 8कन्या : कन्या राशीच्या दहाव्या अर्थात कर्म घरात गुरूचा उदय होत आहे. हे भ्रमण चांगले मानले जात नाही. बदनामीचे प्रसंग येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सर्वार्थाने सांभाळून राहिले पाहिजे. या काळात व्यवसायात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कामात प्रगती व्हावी, तुमची दखल घेतली जावी यासाठी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील. घराशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा होऊ शकते. विवाहित जीवनातही अनुकूलता दिसून येऊ शकते. पण नोकरी व्यवसायात सतर्क राहा. 6 / 8वृश्चिक : वृश्चिक राशीच्या आठव्या घरात गुरूचा उदय होत आहे. सरकारी कामांमध्ये अडथळे निर्माण करणारा हा काळ ठरेल. तसेच नोकरी व्यवसायातही अधिक परिश्रम करावे लागणार आहेत. संततीचे प्रश्न मिटतील. संतती सौख्य लाभेल. हा काळ तुमच्यासाठी संमिश्र घटनांचा असेल. वैयक्तीक सुखाच्या बाबतीत गुरु साथ देईल, नात्यामध्ये गोडवा वाढेल, जोडीदाराशी संबंध सुधारतील, तर नोकरी व्यवसायात तुमची परीक्षा घेईल. मात्र फार मोठे नुकसान नाही तरी आयुष्यभराची शिकवण देणारा एखादा प्रसंग घडेल. 7 / 8मकर : मकर राशीच्या सहाव्या घरात गुरूचा उदय होत आहे. सरकारी कामात काही अडचणी येऊ शकतात. संततीची काळजी वाटेल. करिअरमध्ये चांगली झेप घेता येईल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. विषय कोणताही असो, सतर्क राहणे चांगले. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य ठरणार नाही. पैशांची बचत करण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्या. छोटे मोठे आजार भविष्यात मोठी समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे वेळीच काळजी घेणे हितावह ठरेल. बोलताना शब्द जपून वापरा अन्यथा नोकरी तसेच नात्यांमध्येही कटुता येऊ शकते. 8 / 8मीन : मीन राशीच्या चौथ्या घरात गुरुचा उदय संमिश्र परिणाम देऊ शकतो. ज्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी प्रगती दिसेल. पूर्वीपेक्षा अधिक जबाबदारीने काम कराल. हितशत्रूंचा त्रास होऊ शकतो. आर्थिक अडचणीचा हा काळ ठरेल. आईच्या आरोग्याची काळजी वाटेल, मन तणावग्रस्त राहिले. तरी फार काळ ही स्थिती राहाणार नाही. पुन्हा काही दिवसात सगळे काही सुरळीतपणे सुरु होईल.