१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:29 IST
1 / 12गुरू ग्रह आताच्या घडीला कर्क राशीत आहे. नोव्हेंबर महिन्यात गुरू ग्रह याच राशीत वक्री झाला होता. वक्री चलनाने गुरू ग्रह कर्क राशीतून उलट मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. अलीकडेच गुरू ग्रहाने मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश केला होता. परंतु, वक्री चलनाने गुरू पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ०५ डिसेंबर रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करत आहे.2 / 12डिसेंबर महिन्यात अनेक ग्रहांचे गोचर आहे. शुक्र ग्रह डिसेंबर महिन्यात गुरूचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत प्रवेश करत आहे. शुक्राने धनु राशीत प्रवेश केल्यानंतर गुरू आणि शुक्राचा समसप्तक योग जुळून येणार आहे. तसेच शुक्र ग्रह स्वनक्षत्रातही प्रवेश करणार आहे. त्यामुळे शुक्राचे हे गोचर चांगले मानले जात आहे.3 / 12वास्तविक पाहता गुरू आणि शुक्र एकमेकांचे शत्रू ग्रह मानले गेले आहेत. गुरूचे वक्री असणे, वक्री चलनाने मिथुन राशीत प्रवेश करणे, शुक्राचे गुरूच्या राशीत आणि स्वनक्षत्रात गोचर करणे सात राशींना अनेकविध लाभ, नफा-फायदा देणारे ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल, ते जाणून घेऊया...4 / 12मेष: भाग्य बळकट होईल. आध्यात्मिक कल वाढू शकेल. उच्च शिक्षणाशी संबंधित इच्छा पूर्ण होऊ शकतात. कामातील समर्पण आणि कठोर परिश्रम सर्वांचे लक्ष वेधून घेतील. परिणामी पदोन्नती, सन्मान किंवा विशेष कामगिरी होईल. परदेश प्रवासाची स्वप्ने किंवा परदेशाशी संबंधित कोणतीही संधी पूर्ण होऊ शकते. वैवाहिक आणि प्रेम जीवनात आनंददायी बदल दिसून येतील. जोडीदारासोबतचे नाते अधिक गोड होईल. परस्पर समज मजबूत होईल. पाठिंब्यामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात यश मिळू शकते.5 / 12मिथुन: जीवनात अनेक सकारात्मक परिणाम मिळू शकतात. थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. भागीदारीच्या कामात किंवा व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकेल. नातेसंबंध अधिक गोड होतील. अविवाहित लोक एखाद्या खास व्यक्तीशी भेटू शकतात. शुक्राच्या अनुकूल प्रभावामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ आनंददायी असेल. 6 / 12कर्क: समसप्तक राजयोगाची निर्मिती सकारात्मक ठरू शकते. या काळात वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. प्रेमप्रकरणात यश मिळू शकते. प्रेमविवाह करण्याचा विचार करत असाल तर संधी अनुकूल असेल. या काळात व्यावसायिकांना लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतात. त्यांचा व्यवसाय विस्तारू शकतो. आर्थिक परिस्थिती सुधारेल. अचानक करिअरमध्ये वाढ, नवीन संधी प्रगतीचा मार्ग प्रदान करतील. मालमत्तेशी संबंधित लाभ शक्य आहेत.7 / 12सिंह: उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. जुन्या इच्छा पूर्ण होतील. सामाजिक वर्तुळ विस्तारेल. मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकेल. करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. प्रवास करण्याची संधी मिळू शकते. मन आनंदी, प्रफुल्लित होऊ शकेल. गुंतवणुकीतून नफा मिळेल. या काळात व्यावसायिक एखादा मोठा करार करू शकतात.8 / 12तूळ: नशीब बाजूने असेल. लांब प्रवास यशस्वी होतील. अध्यात्मात आवड वाढेल. वडिलांकडून किंवा गुरूंकडून पाठिंबा मिळेल. देशात किंवा परदेशात प्रवास करू शकता. विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशातही जाऊ शकतात. एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. सहकारी प्रशंसा करतील. प्रसिद्धी लाभू शकेल. अधिकार वाढेल. जीवनात आनंददायी अनुभव येतील.9 / 12धनु: समसप्तक राजयोगाची निर्मितीने सकारात्मक काळ येऊ शकतो. या काळात आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकते. या काळात कार्यनीती सुधारेल. मालमत्ता किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित समस्या सोडवल्या जातील. लक्झरी वस्तूंवर जास्त खर्च करू शकता. कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. जोडीदारासोबतचे नाते प्रेमाने भरलेले असेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. स्वतःमध्ये एक अद्वितीय सर्जनशीलता अनुभवाल.10 / 12मकर: समसप्तक राजयोगाची निर्मिती अनुकूल ठरू शकते. हा काळ कामात आणि व्यवसायात प्रगती करेल. भावंडांकडून आणि सहकाऱ्यांकडूनही तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल. विचार त्यांच्याशी मोकळेपणाने शेअर कराल. स्वतःमध्ये एक अनोखी ऊर्जा अनुभवायला मिळेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतात. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे.11 / 12डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात शुक्र मूळ आणि पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात शुक्र अधिक बलवान, मजबूत होतो, असे मानले जाते. तर, दुसरीकडे अतिचारी गतीमुळे गुरूचे गोचर गतिमानतेने होत आहे. पुढील काही वर्ष गुरू अशाच पद्धतीने गोचर करणार असल्याचे सांगितले जात आहे.12 / 12- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.