1 / 13गेले काही दिवस कुटुंबात, समाजात, जगभरात घडणाऱ्या घटना पाहता मनावर निराशेची काजळी येणे स्वाभाविक आहे. मात्र ९ जुलै रोजी होणारे गुरुचे स्थित्यंतर एक सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे, ज्यामुळे गुरुपौर्णिमेचा काळ भाग्योदयाचा ठरेल. गुरु त्याचा मित्र ग्रह बुध याच्या राशीत संक्रमण करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा शुभ योग मानला जात आहे. ज्यामुळे संपत्ती, वैवाहिक जीवन, आर्थिक बाबी यामध्ये सकारात्मक घटना घडतील असे भाकीत वर्तवले जात आहे. त्याचा १२ राशींवर होणारा परिणाम जाणून घेऊ. 2 / 13मेष : हे स्थित्यंतर मेष राशीला संमिश्र परिणाम देणारे ठरेल. म्हणजेच काही घटना अनपेक्षित आनंद देतील तर काही अपेक्षाभंग करू शकतील. यासाठी तुम्ही तुमचे काम मनापासून करा आणि येणाऱ्या परिणामाची वाट बघू नका किंवा त्यावर अवलंबून राहू नका. करिअरच्या बाबतीत तुम्हाला अनपेक्षित लाभ संभवतो. गुरुकृपेने प्रगतीचे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. प्रयत्नात कुचराई करू नका. 3 / 13वृषभ : हे स्थित्यंतर वृषभ राशीला सकारात्मक परिणाम देणारे ठरेल. उत्पन्नाचा आलेख वाढू शकतो. कौटुंबिक समस्या दूर होऊ शकतात. योग्य ठिकाणी योग्य बोलण्याचा प्रभाव पडून तुम्हाला लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल आणि गुंतवणुकीबाबत तुमच्या मनात असलेली भीती आता दूर होऊ शकते. करिअरमध्ये प्रगती होईल आणि कौटुंबिक आनंद वाढेल. एकूणच, गुरूचा उदय तुमच्यासाठी सकारात्मक असेल.4 / 13मिथुन : हे स्थित्यंतर मिथुन राशीला सकारात्मक परिणाम देणारे ठरेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याचा हा काळ ठरेल. वैवाहिक जीवनातील समस्या संपुष्टात येतील. नोकरी-व्यवसायात अनुकूलता वाढू शकते. या काळात तुमचे गुरुबळ वाढेल आणि कुटुंब सौख्य वाढेल. विद्यार्थ्यांना या काळात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. मात्र रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी दत्त उपासना लाभदायी ठरेल. 5 / 13कर्क : हे स्थित्यंतर कर्क राशीला संमिश्र परिणाम देणारे ठरेल. अशा परिस्थितीत तुमचे खर्च वाढू शकतात. यावेळी विरोधक देखील अधिक सक्रिय होऊ शकतात. आरोप-प्रत्यारोपांचा कालावधी वाढू शकतो, परंतु सकारात्मक बाजू अशी असेल की नशीब तुमच्या बाजूने असेल. अशा वेळी तुम्ही डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवणे केव्हाही चांगले. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक वाढीचा असेल, त्यामुळे वाद विवादात वेळ न दवडता तुमच्या कामावर लक्ष द्या. 6 / 13सिंह : हे स्थित्यंतर सिंह राशीला सकारात्मक परिणाम देणारे ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा यशाचा काळ असेल. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. कौटुंबिक सौख्य मिळेल, वाढेल. मैत्रीच्या दृष्टिकोनातून गुरूचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. दरम्यान तुम्हाला अनपेक्षित फायदे मिळू शकतात. आई वडिलांकडून किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे. 7 / 13कन्या : हे स्थित्यंतर कन्या राशीला संमिश्र परिणाम देणारे ठरेल. या काळात तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेबद्दल अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. गुरूचे भ्रमण व्यवसायात काही अडथळे देखील निर्माण करते. अशा परिस्थितीत, आता तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. काही प्रकरणांमध्ये सकारात्मक परिणाम देखील मिळू शकतात, जसे की घराशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा होऊ शकते. वैवाहिक जीवनातही सुसंगतता दिसून येते. आर्थिक बाबतीत वृद्धी होईल. 8 / 13तूळ : हे स्थित्यंतर तूळ राशीला सकारात्मक परिणाम देणारे ठरेल. या काळात तुम्ही तीर्थक्षेत्री जाण्याचे आयोजन कराल.मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. अडलेली कामे पूर्ण होतील. लोकांकडून आदर-सन्मान मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. समाजात नावलौकिक मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन आयुष्याला नवी दिशा देईल. 9 / 13वृश्चिक : हे स्थित्यंतर वृश्चिक राशीला संमिश्र परिणाम देणारे ठरेल. कामात काही बाबतीत अडथळे येऊ शकतात. सरकारी कामे मार्गी लागण्यात विलंब होईल. मात्र मुलांशी संबंधित समस्या दूर होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. मात्र कठोर परिश्रम घ्यावे लागतील. याकाळात आर्थिक गणिते बिघडतील. खर्च वाढतील मात्र जोडीला उत्पन्नाचे साधनही वाढेल. 10 / 13धनु : हे स्थित्यंतर धनु राशीला सकारात्मक परिणाम देणारे ठरेल. सर्वात अनुकूल गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवनाशी आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. आईच्या आरोग्याची काळजी मिटेल. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये आणि वैवाहिक जीवनात चांगली सुसंगतता दिसून येते. विवाहेच्छूकांचे विवाह जुळतील. धार्मिक यात्रा घडतील, हातून सत्कार्य घडेल. 11 / 13मकर: हे स्थित्यंतर मकर राशीला संमिश्र परिणाम देणारे ठरेल. मुलांच्या करिअरची काळजी सतावेल. अनावश्यक खर्च झाल्याने आर्थिक गणित बिघडेल. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक राहण्याची आवश्यकता असेल. तथापि, तिसऱ्या घराच्या स्वामीच्या उदयामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, तसेच प्रवास आनंददायी होऊ शकतो. बाकी बाबतीत अनुभव हाच गुरु ठरेल. 12 / 13कुंभ : हे स्थित्यंतर कुंभ राशीला सकारात्मक परिणाम देणारे ठरेल. शिक्षण क्षेत्रातील लोकांना फायदा होऊ शकतो. या काळात आर्थिक लाभ होतील, गुंतवणूक यशस्वी होईल. मुलांकडून आनंददायी बातमी मिळेल. कुटुंब सौख्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन उत्साह जाणवेल. आगामी काळ तुमच्यासाठी प्रगतीचा ठरेल. 13 / 13मीन : हे स्थित्यंतर मीन राशीला संमिश्र परिणाम देणारे ठरेल. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. मान- सन्मान मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि कामाच्या ठिकाणी प्रगती देखील दिसून येईल.याकाळात विरोधक किंवा स्पर्धक सक्रिय असू शकतात. मालमत्तेशी संबंधित समस्या देखील वेळोवेळी उद्भवू शकतात. आईबद्दल चिंता वाटू शकते. नोकरीत काही ठिकाणी झुकते माप घ्यावे लागेल.