शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 09:56 IST

1 / 9
मे महिन्यात नवग्रहांमधील सर्वांत महत्त्वाचे राशीपरिवर्तन होणार आहे. नवग्रहांचा गुरु मानला गेलेला बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रह एखाद्या राशीत सुमारे एक वर्ष विराजमान असतो. परंतु, अनेक वर्षांनंतर गुरु ग्रहाची अतिचारी गती पाहायला मिळणार आहे.
2 / 9
गुरु ग्रहाच्या गोचरावेळी सूर्य जवळून भ्रमण करणार आहे. त्यामुळे गुरु अतिचारी पद्धतीने गोचर करणार आहे. पुढील ८ वर्षे गुरु ग्रह त्याच स्थितीत राहील, कारण जेव्हा गुरु एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करेल, तेव्हा सूर्य त्याच्या जवळ असेल, ज्यामुळे येत्या ८ वर्षांत गुरु अतिचारी गतीने गोचर करेल, असे सांगितले जात आहे. एखादा शुभ ग्रह अतिचारी गतीने गोचर करतो, ही बाब शुभ मानली जात नाही, असे म्हटले जाते.
3 / 9
१४ मे २०२५ रोजी रात्री ११.२० वाजता गुरू मिथुन राशीत प्रवेश करेल. यानंतर, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी गुरु कर्क राशीत प्रवेश करेल आणि वर्षाच्या शेवटी म्हणजेच ५ डिसेंबर २०२५ रोजी गुरु वक्री होऊन पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, असे सांगितले जात आहे. गुरुची अतिचारी गती केवळ राशींवर नाही, तर देश दुनियेवर प्रभावकारी मानली जात आहे. सुमारे ५०० वर्षांनंतर असा योग जुळून येत असल्याचा दावा केला जात आहे. याचा ६ राशींना उत्तम लाभ मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 9
वृषभ: गुरुचे अतिचार गतीने होणारे गोचर अनुकूल ठरू शकते. या काळात वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती मजबूत असेल आणि पैसे गुंतवण्याची ही योग्य वेळ आहे. प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येईल आणि विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल. या काळात इच्छा पूर्ण होतील. नियोजित योजना यशस्वी होतील.
5 / 9
मिथुन: जीवनात चांगले परिणाम दिसणार आहेत. कल अध्यात्माकडे असेल. धार्मिक बाबींमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकाल. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आर्थिक संकटातून दिलासा मिळू शकेल. प्रवासात अनेक योगायोग घडून येताना दिसू शकतील. आनंददायी घटना घडू शकतात.
6 / 9
कन्या: गुरुचे अतिचार गतीने होणारे गोचर सकारात्मक ठरू शकते. चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होऊ शकतो. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.
7 / 9
तूळ: गुरुचे अतिचार गतीने होणारे गोचर शुभ ठरू शकते. भाग्याची साथ मिळू शकते. काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. सहलीला जाऊ शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे आणि कौटुंबिक वाद मिटू शकतात. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. जीवनशैलीत सकारात्मक बदल होतील.
8 / 9
धनु: दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. यासोबतच, कुटुंबासह आनंदाने आणि शांततेत राहू शकाल. सदस्यांमधील सुरू असलेला दुरावा आता संपुष्टात येऊ शकतो. काही फायदा होऊ शकतो. सासरच्या लोकांकडूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. उत्पन्नाचे अनेक स्रोत उघडू शकतात.
9 / 9
मीन: गुरुचे अतिचार गतीने होणारे गोचर फायदेशीर ठरू शकते. सुखसोयी वाढू शकतात. आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकेल. तसेच या वेळी वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळेल. यावेळी कौटुंबिक जीवनात आनंद राहील. नात्यात गोडवा वाढेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, हा प्रगतीचा काळ आहे. नोकरीत नवीन प्रकल्प उपलब्ध होतील. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक