शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुप्तनवरात्रारंभ: विशेष योगात करा देवीचे पूजन; ‘हे’ उपाय करा, वैभव, सुख-समृद्धी मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 2:19 PM

1 / 12
संपूर्ण मराठी वर्षात अनेकविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी केली जातात. त्यातील महत्त्वाचे उत्सव म्हणजे नवरात्रौत्सव. वर्षभरात ४ नवरात्र साजरी केली जातात. यातील दोन नवरात्र गुप्तपणे साजरी केली जातात. यालाच गुप्त नवरात्र असे म्हटले जाते. (gupt navratri 2022)
2 / 12
हिंदू नववर्षातील पहिले गुप्त नवरात्र ३० जून रोजी सुरु झाले आहे. आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रारंभ होत असून, आषाढ शुद्ध नवमीपर्यंत हे नवरात्र साजरे केले जाणार आहे. सन २०२२ मध्ये आषाढ गुप्त नवरात्रीला विशेष योग जुळून येत आहेत. (ashadha gupta navratri)
3 / 12
तसेच या कालावधीत केलेले काही उपाय उपयुक्त ठरू शकतात. देवीच्या पूजेसह या उपायांमुळे सुख-समृद्धी, वैभव प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जात आहे. त्रेतायुगात आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्र सर्वांत जास्त प्रचलित होती, असे मानले जाते. या नवरात्रीमध्ये साधक अलौकिक आणि दैवी शक्तींसाठी देवीची पूजा केली जाते.
4 / 12
धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीमध्ये प्रकट झालेल्या भौतिक सुखासाठी देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. परंतु गुप्त नवरात्रीमध्ये देवीच्या १० महाविद्यांची साधना केली जाते. देवीच्या दहा महाविद्या या महाशक्ती आहेत ज्या साधकांना वैश्विक आणि अलौकिक आनंद आणि सुख प्रदान करतात.
5 / 12
यंदा आषाढ गुप्त नवरात्रीला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या दिवशी मध्यरात्री पुष्य नक्षत्र होणार असून त्यामुळे गुरु पुष्य योगही तयार होत आहे. या शुभ योगासोबतच या दिवशी अमृत सिद्धी आणि सर्वार्थ सिद्धी नाम योगही तयार होतील. अशा स्थितीत मध्यरात्री देवीच्या बीज मंत्रांचा जप करणे आणि देवीची साधना करणे खूप शुभ ठरेल.
6 / 12
यावर्षी ३० जूनपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात होत असून, ती ८ जून रोजी संपत आहे. अशा स्थितीत या काळात अनेक शुभ संयोग घडतील. ३० जून रोजी सर्वार्थ सिद्धी योग, गुरु पुष्य योग आणि अमृत सिद्धी योग प्रथम असेल. यानंतर ६ जुलै रोजी सर्वार्थ सिद्धी योग होईल. २ जुलै, ४ जुलै, ६ जुलै आणि ८ जुलै रोजी रविपुष्य योग असेल.
7 / 12
गुप्त नवरात्रीमध्ये देवी भगवतीला प्रसन्न करण्यासाठी कमळाच्या माळेने दुर्गा मातेच्या बीज मंत्राचा जप करा आणि नियमित हवन करा. असे केल्याने माँ दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरामध्ये सकारात्मक उर्जा संचारते.
8 / 12
शारदीय आणि चैत्र नवरात्रीसोबत गुप्त नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. देवी भगवतीची पूजा केल्यानंतर कवच, कीलक आणि अर्गल स्तोत्रासह दुर्गा सप्तशतीच्या अध्यायांचे पठण करा आणि कुमारींना घरी बोलावून भोजनाचा आस्वाद घेऊ द्या. असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि देवीचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील.
9 / 12
गुप्त नवरात्रीत माता भगवतीच्या दहा महाविद्यांची पूजा केली जाते. म्हणून या गुप्त नवरात्रीत दहा महाविद्यांच्या वेगवेगळ्या दिवशी देवीच्या मंत्रांचा जप करा. असे केल्याने सर्व दु:ख दूर होतात आणि आत्मा शुद्ध होतो.
10 / 12
गुप्त नवरात्रीमध्ये देवी भगवतीची विशेष पूजन करावे आणि हवनाच्या वेळी खीरमध्ये मध मिसळून नैवेद्य दाखवा. असे केल्याने घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा अंत होतो आणि आईच्या आशीर्वादाने नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते.
11 / 12
गुप्त नवरात्रीमध्ये देवी भगवतीला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा झाल्यानंतर देवीला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण करा. देवीला आवडणारी फुले, फळे अर्पण करणे उपयुक्त ठरू शकेल.
12 / 12
पूजेनंतर परिधान करा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि सर्व रखडलेली कामे पूर्ण होतात, हा एक प्राचीन उपाय आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरी प्राचीन काळापासून नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी या उपायांचा उपयोग केला जातो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, संबंधित तज्ज्ञांचा उपाय उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Navratriनवरात्रीReligious programmeधार्मिक कार्यक्रम