गजकेसरी योगातील ज्येष्ठ अमावास्येवर अशुभ छाया: ९ राशींची भरभराट, अकल्पनीय लाभ; यश प्रगती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:43 IST
1 / 15२५ जून २०२५ रोजी ज्येष्ठ अमावास्या आहे. मंगळवार, २४ जून २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता अमावास्या प्रारंभ होत आहे. तर बुधवार, २५ जून २०२५ रोजी सायंकाळी ०४ वाजून ०१ मिनिटांनी अमावास्या समाप्त होणार आहे. काही जण अमावास्या अशुभ असते, असे मानतात. परंतु, असे काही नाही. अमावास्याही अनेकार्थाने महत्त्वाची मानली जाते. 2 / 15ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास अमावास्या काळात गजकेसरी नामक अतिशय शुभ राजयोग जुळून येत आहे. गुरु आणि चंद्र यांच्या युतीने गजकेसरी योग जुळून येतो. परंतु, या अमावास्येवर दोन अशुभ योगांची छाया आहे. शनि आणि मंगळ यांचा षडाष्टक योग असून, मंगळ आणि केतु यांचा अशुभ योगही जुळून आलेला आहे. 3 / 15शनि, मंगळ आणि केतु यांचे योग चांगले मानले गेलेले नाहीत. असे असले तरी काही राशींना अमावास्या काळ अतिशय उत्तम, धनलक्ष्मीची अपार कृपा असणारा, चांगले यश, प्रगती देणारा आणि अनपेक्षित अकल्पनीय लाभ प्राप्त होणारा ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...4 / 15मेष: मनातील सकारात्मक विचारांच्या जोरावर सफल व्हाल. नवीन ओळखी होतील. त्यातून लाभ होईल. विवाहेच्छुकांचा विवाह ठरण्याच्या दृष्टीने सुरुवातीला हालचाली होऊ शकेल. काही अनपेक्षित लाभ होतील. घरातील वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्यावी. मालमत्तेची कामे करताना खबरदारी घ्यावी. कागदपत्रे वाचूनच सही करावी. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावी. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. मात्र, गुंतवणूक करताना काळजी घ्यावी.5 / 15वृषभ: ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळू शकेल. थोडे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तरुण वर्गाने प्रेमात सावध राहावे. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करील. त्यातून आर्थिक फटका बसू शकतो. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. काही तरी नवीन करून दाखवण्याची जिद्द राहील. योजना लोकांना आवडतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. कागदोपत्री पूर्तता करताना सतर्कता बाळगा.6 / 15मिथुन: एखाद्या कामात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात यश मिळेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. हाती आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. कुणाला जामीन राहणे शक्यतो टाळा. अडचणी दूर होतील. अकल्पनीय लाभ होतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील.7 / 15कर्क: लाभदायक कालावधी ठरेल. नोकरीत नवीन संधी मिळेल. त्यातून आर्थिक फायदा होईल. एखाद्या उलाढालीत अचानक मोठा फायदा होईल. नवीन ओळखी होतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. कायद्याची बंधने पाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा, खर्चावर नियंत्रण ठेवा. किरकोळ स्वरूपाच्या अडचणी दूर होतील. मन प्रसन्न राहील. 8 / 15सिंह: एखादी आनंदाची बातमी कळेल. कामाचा ताण आटोक्यात आलेला असल्याने मोकळा वेळ मिळेल. स्वत:कडे लक्ष द्याल. मौजमजा कराल. कलागुणांचे कौतुक होईल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. नोकरीत अचानक काही बदल होऊ शकतात. घरी अनाहूत पाहुणे येतील. घराशी संबंधित खर्च करावा लागेल. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक आवक चांगली राहील. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्यावे. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल.9 / 15कन्या: चांगले यश मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. अचाट साहस करू नका. काहींना पर्यटन घडेल. कलाकारांना पुरस्कार जाहीर होण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. वडीलधाऱ्यांची काळजी घ्यावी. शुक्रवार, शनिवार लाभ स्थानातील चंद्रामुळे शुभ फळे मिळतील.10 / 15तूळ: ग्रहमान अनुकूल असले, तरी बेफिकीरपणाने वागू नका. व्यवसायात भरभराट होईल. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. इतरांच्या भानगडीत पडू नका. आपला ताण वाढेल, अशी समाजसेवा करू नका. नोकरीत नवीन संधी मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या.11 / 15वृश्चिक: संमिश्र ग्रहमान राहील. काही अडचणी येतील. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. योजना लोकांना सांगत बसू नका. लोक त्यात छुप्या कारवाया करतील. मोहापासून सावध राहावे. विवाहविषयक निर्णय सावधपणे घ्यावे. जीवनसाथीच्या कलाने वागा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.12 / 15धनु: कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. जवळच्या प्रवासाचा योग येईल. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. आरोग्याची हेळसांड करू नका. बेफिकीर वृत्ती नको. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका.13 / 15मकर: कलागुणांचे कौतुक केले जाईल. नवीन संधीचा फायदा घ्यावा. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. प्रसिद्धी, मान-सन्मान मिळेल. काहींना प्रवास घडून येईल. सावधपणे वागण्याची गरज आहे. जवळचे समजून एखाद्याला महत्त्वाची माहिती सांगाल आणि तो ती गावभर करून टाकेल, असा प्रकार होऊ शकतो. अडचणी दूर होतील.14 / 15कुंभ: नोकरी, व्यवसाय, शिक्षण, वास्तू इत्यादी बाबतीत मनासारखी फळे मिळू शकतील. मालाची विक्री चांगली होईल. नवीन प्रयोग करून पाहिले जातील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळच्या प्रवासाचे योग येतील. नोकरीत अचानक नवीन संधी मिळेल. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू खरेदी कराल. नातेवाइकांच्या भेटी होतील. मुले प्रगती करतील. आनंदवार्ता समजतील.15 / 15मीन: अनेक उत्तम लाभ होतील. अनेक दिवसांपासूनचे एखादे स्वप्न पूर्ण होईल. धनलक्ष्मीची कृपा राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. व्यवसायात भरभराट होईल. कुणाच्या सांगण्यावरून मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. नोकरीत काही बदल होतील. घरात कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.