नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:21 IST
1 / 12ज्योतिषशास्त्रात अनेक अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. राहु-केतु हे दोन छाया ग्रह नेहमी वक्री चलनाने नक्षत्र आणि राशी गोचर करतात. तर, सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह कधीच वक्री चलनाने गोचर करत नाही. शीघ्र गतीचा ग्रह म्हणून चंद्र ग्रह ओळखला जातो. 2 / 12एका राशीत दोन ते अडीच दिवस चंद्र असतो. चंद्र ज्या राशीत जातो, त्या राशीत त्या वेळी कोणता ग्रह विराजमान असेल, तर त्यासोबत चंद्राचा युती योग जुळून येतो. मेष राशीत असलेला चंद्र ५ मार्च २०२५ रोजी वृषभ राशीत प्रवेश करत आहे.3 / 12वृषभ राशीत आताच्या घडीला नवग्रहांचा गुरु मानला गेलेला बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह विराजमान आहे. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग जुळून येतो. मार्च महिन्यात जुळून येत असलेल्या या राजयोगाचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...4 / 12वृषभ: आत्मविश्वास वाढेल. बौद्धिक क्षमता खूप चांगली असेल. कामाच्या पद्धतीत सुधारणा होईल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. व्यावसायिकांचा नफा वाढू शकेल. आर्थिक लाभामुळे पैसे वेळेवर परत करण्यात यश मिळू शकेल.5 / 12मिथुन: परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना थोडे लक्ष केंद्रित करून काम करावे लागेल. यश मिळण्याची शक्यता वाढू शकेल. काही काम पूर्ण करून आनंद होईल. कुटुंबासह घरी एक छोटी पार्टी आयोजित करू शकता. मनाला शांतता लाभू शकेल. काही योजनांवर काम कराल ज्यामुळे फायदे मिळू शकतील.6 / 12सिंह: नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. या काळात बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. व्यापारी असाल तर चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. करिअरबद्दलचा ताण कमी होऊ शकेल. मानसिक स्थितीत सुधारणा होईल. अडकलेले पैसे परत मिळतील आणि जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल.7 / 12कन्या: भाग्याची साथ मिळेल. काम प्रलंबित होते ते पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांनाही चांगले परिणाम मिळू शकतील. कोणी सरकारी नोकरीशी संबंधित परीक्षेला बसत असेल, तर लाभ मिळण्याची शक्यता आहे. देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. धार्मिक आणि शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता.8 / 12तूळ: सर्व इच्छा पूर्ण होत आहेत, असे वाटेल. विरोधक पराभूत होतील. यश मिळण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल काळ राहणार आहे. विरोधक तुमच्याशी हातमिळवणी करण्यासाठी पुढे येऊ शकतात. मन आनंदी होईल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर पती-पत्नीमधील नाते पूर्वीपेक्षा अधिक गोड होऊ शकेल.9 / 12वृश्चिक: करिअरच्या बाबतीत गजकेसरी राजयोग भाग्यकारक ठरू शकतो. केलेल्या प्रयत्नांमुळेच यश मिळवू शकता. व्यवसायाच्या क्षेत्रात भरपूर नफा मिळणार आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायात मोठा नफा होईल. प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध राहतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. जीवनात आनंद आणि शांतता लाभू शकेल.10 / 12मकर: शुभ सिद्ध होईल. काही काळापासून असलेल्या चिंतांपासून दिलासा मिळू शकेल. कामात शुभचिंतकांचा आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायिकांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते परत मिळवू शकता. कामाच्या ठिकाणी कामाबद्दल सन्मान होऊ शकतो. भौतिक सुखसोयी वाढतील.11 / 12कुंभ: विलासी जीवन जगण्याची संधी मिळू शकेल. सुखसोयींमध्ये वाढ होईल. संपूर्ण लक्ष करिअरवर असेल, जे फायदेशीर ठरू शकते. कामाचे कौतुक होऊ शकते आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात. घर नूतनीकरण करू शकता, मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल.12 / 12मीन: प्रसिद्धीसोबतच खूप आदर मिळू शकतो. जीवन जगण्याचा मार्ग सापडू शकेल. आता बऱ्याच काळापासून ज्या समस्येचा सामना करावा लागत आहे त्यात यश मिळू शकते. करिअर क्षेत्रात अनेक फायदे मिळत राहतील. व्यवसायात कल्पना यशस्वी होऊ शकते. कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.