शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनिवारी केस कापू नयेत, तेल-मीठ खरेदी करू नये, असं का मानतात?, त्यामागचं लॉजिक काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 2:10 PM

1 / 6
शास्त्रात शनिवारी अशी काही कामे सांगितली आहेत, जी करण्यास मनाई आहे. जर एखाद्या व्यक्तीने चुकूनही या गोष्टी केल्या तर ते शनिदेवांचा रोष ओढवून घेतात. एवढेच नाही तर व्यक्तीच्या कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत होते. होणारे काम बिघडू लागते. या गोष्टी टाळण्यासाठी आपल्या पूर्वजांनी सांगितलेले नियम आणि त्यामागील आशय समजून घ्या.
2 / 6
शनिवारी आपण मारुतीला किंवा शनिदेवाला तेल वाहतो. तसेच गरजू लोकांना तेल आणि अन्न धान्याचे दान करतो. त्यामुळे शनिवारी घरातील तेल संपले तर शक्यतो त्या दिवशी तेल विकत आणू नका. एक तर आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आणा मात्र शनिवारी तेलाची खरेदी टाळा.
3 / 6
मीठ मागणे हे ऋण घेण्यासारखे आहे. मीठ हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. ते उसने घेणे म्हणजे दारिद्रयाला आवाहन करण्यासारखे आहे. यासाठीच शनिवारी मीठ विकत आणू नये आणि कोणाकडून उसनेही मागू नये!
4 / 6
काही लोकांना नियमितपणे केस धुण्याची सवय असते. तसे असले तरी शनिवारी केस धुणे निषिद्ध मानले जाते. कारण शनी देवांना स्वच्छता प्रिय असली तरी शनिवारच्या दिवशी केस धुणे, केस कापणे या गोष्टी आवडत नाहीत. म्हणून या दोन्ही गोष्टी टाळलेल्याच बऱ्या!
5 / 6
लोखंड हा शनी देवाचा प्रिय धातू आहे. म्हणून शनिवारी लोखंडाचे दान केले जाते. दान करण्याजोगी वस्तू खरेदी करून स्वतःच्या उपयोगासाठी वापरलेली शनी देवांना आवडणार नाही. यासाठीच शनिवारी लोखंडी वस्तूची खरेदी करू नका.
6 / 6
मांसाहार अर्थात सामिष भोजन हे ऐहिक सुखाचे प्रतीक मानले जाते. मात्र तसे करणे शनी महाराजांच्या दृष्टीने गैर ठरते. कारण मांसाहार म्हणजे प्राणी हत्या. ती शनी देवांना कदापि मान्य नाही. याउलट पशूंना खाद्य दिले, गोरगरिबांना दान दिले तर शनी महाराजांची कृपा होईल हे नक्की!