शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Diwali 2022 Horoscope: १ वर्ष शुभ होईल! दिवाळीपासून ‘या’ ६ राशींवर लक्ष्मी मेहेरबान; धनलाभ, नशिबाची साथ, भाग्योदय काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 10:55 IST

1 / 15
दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हणत मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देशविदेशात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते. (Diwali 2022 Horoscope)
2 / 15
अंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपोत्सव. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन हे दिवाळीचे मुख्य दिवस. हे दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानले जातात; कारण धनप्राप्तीसाठी लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते. या दिवशी अनेक नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. यामुळे संपत्तीत अनंत वृद्धी होते, असे मानले जाते. (Diwali 2022 Astrology Predictions)
3 / 15
या दिवाळीपासून महालक्ष्मी वर्ष सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. पैसा आणि करिअरच्या क्षेत्रात हे वर्ष कसे जाईल? आगामी वर्ष कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल आणि कोणत्या राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो? या दिवाळीपासून पुढील वर्षीच्या दिवाळीपर्यंतचा काळ तुमच्यासाठी साधारण कसा असू शकेल? ते जाणून घेऊया... (Diwali 2022)
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना पुढील दिवाळीपर्यंतचा काळ अनुकूल ठरू शकेल. करिअरच्या दृष्टिने आगामी काळ चांगला आहे. शत्रूंचा पराभव होईल. काहीतरी चांगले करण्याचा विचार करू शकता. प्रमोशनची शक्यताही प्रबळ असेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून लाभ मिळेल. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना पुढील दिवाळीपर्यंतचा काळ यशकारक ठरू शकेल. व्यवसायात यश मिळेल. लेखन, कला आणि संगीत क्षेत्रात विशेष लाभ होण्याचे योग आहेत. चित्रपट जगताशी निगडीत असलेल्यांसाठी हे वर्ष लाभदायक ठरेल. परस्पर संबंधांमध्ये प्रेम, सहकार्य आणि समजूतदारपणा वाढेल. आर्थिक स्थिती मध्यम राहील. तुम्ही जमीन किंवा घर खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर काही काळ थांबणे चांगले राहील. आरोग्याकडेही लक्ष देण्याचा सल्ला दिला जात आहे.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना पुढील दिवाळीपर्यंतचा कालावधी लाभदायक ठरू शकेल. मात्र, व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सुरुवातीला तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळणार नाही, शेवटी तुम्हाला अनपेक्षित परिणाम मिळू शकतील. सर्जनशील कल्पनांमुळे करिअरमध्ये प्रगती होईल. सरकारी लोकांच्या संपर्कातून फायदा होईल. व्यवसायातील कोणताही करार तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकतो. काही गोष्टींमुळे मानसिक ताण येऊ शकेल.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना पुढील दिवाळीपर्यंतचा काळ यशकारक ठरू शकेल. करिअरमध्ये स्थान बदलण्याची शक्यता आहे. मालमत्ता आणि वाहनाच्या माध्यमातूनही तुम्हाला नफा मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास मजबूत असेल. कौटुंबिक नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती मध्यम ते चांगली असेल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना पुढील दिवाळीपर्यंतचा कालावधी सामान्य असू शकेल. शक्यतो कोणाशीही वाद होणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. तुम्हाला अनावश्यक संभाषण टाळावे लागेल. अन्यथा बिघडलेल्या नात्यात सुधारणा होण्याची शक्यता कमी होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. या वर्षी तुम्ही जी काही गुंतवणूक कराल त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना पुढील दिवाळीपर्यंतचा काळ उत्तम ठरू शकेल. वर्षभर काही ना काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या विचारांमुळे प्रसिद्धी, लोकप्रियता वाढू शकेल. कोणत्याही नवीन कराराद्वारे तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला तर प्रथम नवीन व्यवसाय तुम्हाला तणाव देईल, नंतर हळूहळू व्यवसायात प्रगती होताना दिसू शकेल. तुम्हाला मोठी पदे मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात सुसंवाद राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना पुढील दिवाळीपर्यंतचा कालावधी सामान्य असू शकेल. आगामी काळात कार्यक्षेत्रात काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. व्यवसायातील एखादा करार अनपेक्षित ठरू शकेल. जोडीदाराच्या विचित्र वागणुकीमुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकेल. आरोग्य सामान्य राहील. यासोबतच खास लोकांशी तुमची जवळीक वाढेल. तुमची आर्थिक स्थिती मध्यमपेक्षा चांगली राहील.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना पुढील दिवाळीपर्यंतचा काळ संमिश्र ठरू शकेल. सरकारच्या निर्णयाचा तुमच्या करिअरवर परिणाम होऊ शकेल. व्यवसायात योजना यशस्वी होईल. वैवाहिक जीवनात काही समस्या येऊ शकतात. मुलाच्या बाजूने तुम्हाला कमी मानसिक आनंद मिळेल. आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला गुंतवणुकीद्वारे चांगले परिणाम मिळू शकतात. तुमची कमाई आणि खर्च दोन्ही वाढू शकतात.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना पुढील दिवाळीपर्यंतचा कालावधी चांगला ठरू शकेल. आगामी वर्ष व्यवसायाच्या दृष्टीने चांगले जाऊ शकेल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. नवीन व्यवसायाचा मार्ग मोकळा होईल. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. नोकरी शोधणारे त्यांची नोकरी बदलू शकतात. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. जमीन आणि वाहनातून लाभ होण्याची शक्यता आहे.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना पुढील दिवाळीपर्यंतचा काळ संमिश्र ठरू शकेल. कार्यालयातील सहकाऱ्यांमुळे काहीसा तणाव जाणवू शकतो. तुम्हाला व्यवसायात नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. मुलांकडून आनंद मिळेल. व्यवसायातील अस्थिरतेचा कमाईवर किरकोळ परिणाम होईल. परंतु, तुमच्या बचतीमुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना पुढील दिवाळीपर्यंतचा कालावधी संमिश्र ठरू शकेल. मालमत्तेशी संबंधित व्यवहारात तसेच गुंतवणुकीच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुटलेले नाते सुधारेल. जोडीदारासोबतच्या नात्यात थोडा चढ-उतार राहील. रागावर नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरू शकेल. पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. गॉसिपिंग टाळा. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना पुढील दिवाळीपर्यंतचा काळ संमिश्र ठरू शकेल. पुढील एक वर्ष करिअरच्या दृष्टीने सामान्यपेक्षा कमी असणार आहे. या दिवाळीपासून पुढच्या वर्षीच्याया दिवाळीपर्यंत तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर हा काळ चांगला नाही. नोकरदार वर्गातील लोकांच्या पदोन्नतीत अडथळा येऊ शकतो. वैवाहिक जीवन ऊन-पावसासारखे राहू शकेल. तुमची आर्थिक स्थिती मध्यम राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2022Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य