By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:02 IST
1 / 6नवरात्रीचा कालावधी शक्तिपूजेचा मानला जातो. याकाळात देवीच्या विविध रूपांची केलेली पूजा फलदायी ठरते. मग तुम्ही सरस्वतीची उपासना करा वा लक्ष्मीची! ती कृपावंत होतेच. यासाठी नवरात्रीच्या काळात आपण देवीची पूजा करतो. ज्योतिष शास्त्रानुसार देवीच्या आवडत्या तीन राशी आहेत, ज्यांच्यावर देवी केवळ नवरात्रीत नाही तर बारमाही कृपावंत असते. त्या राशिंबद्दल जाणून घेऊ. 2 / 6प्रत्येक राशीची देवता असते, शिवाय काही राशी देवतांना प्रिय असतात. इथे आपण चैत्र नवरात्रीनिमित्त देवीला प्रिय असणाऱ्या राशींबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांच्यावर माता दुर्गेचा नेहमीच विशेष आशीर्वाद असतो. ज्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात संपत्ती, यश, लोकप्रियता सर्वकाही मिळते. या लोकांचा जन्म गरीब कुटुंबात झाला असला तरी ते आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उच्च स्थान आणि कीर्ती मिळवतात. 3 / 6देवी हे शक्तीचे रूप आहे आणि शक्तीची विविध रूपे आहेत. सप्तशतीत वर्णन केल्याप्रमाणे ती क्षुधा, तृष्णा, लक्ष्मी, शांती, ममता, सरस्वती, लक्ष्मी अशा विविध रूपात अवतीर्ण होते. आपण कोणत्या रूपाची आळवणी करतो, त्या रूपात येऊन ती आपल्यावर कृपादृष्टी करते. पुढील तीन राशींना मात्र देवीच्या सगळ्याच रूपांचा लाभ मिळतो, असे ज्योतिष अभ्यासक सांगतात. 4 / 6ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीची देवता माता दुर्गा आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना दुर्गा मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो. विविध आव्हाने असूनही, या व्यक्ती निश्चितपणे यश मिळवतात. आर्थिक दृष्ट्या हे लोक सबळ असतात आणि नाव, प्रसिद्धी कमवतात. मात्र ज्याप्रमाणे आईची कृपा होते, त्याचप्रमाणे या राशीच्या जातकांनी गैरव्यवहार केला असता त्यांना देवीचा प्रकोपही झेलावा लागतो असे म्हणतात. 5 / 6सिंह हे देवीचे वाहन असून ते जसे देवीला प्रिय असते, तसे या राशीचे जातकही तिला प्रिय असतात. सिंह राशीच्या व्यक्ती शारीरिक, मानसिक दृष्ट्या कधीही दुर्बल आढळणार नाही. त्यांच्यात नेतृत्त्वाचे गुण ठासून भरलेले असतात. त्यांच्या कर्तृत्त्वाला झळाळी मिळते ती देवीच्या आशीर्वादामुळे! राजकारण आणि अन्य व्यवसायात हे लोक खूप नाव आणि पैसा कमवतात. 6 / 6तूळ राशीचे लोक स्वभाव, वागणूक, व्यवहार अशा सगळ्याच बाबतीत संतुलित व्यक्तिमत्त्वाचे असतात. त्यामुळे देवीला ते अधिक प्रिय असतात. कोणत्याही गोष्टीला मिळवण्यासाठी ते अट्टाहास करत नाहीत, म्हणूनच की काय, त्यांना हव्या त्या गोष्टी हव्या तेव्हा मिळवता येतात. आर्थिक स्थिती चांगली असते. हे लोक विलासी जीवन जगतात आणि देवीच्या कृपेने प्रत्येक संकटाला धीराने तोंड देतात.