त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना यश-सुख काळ, पद-पैसा-लाभ; फेब्रुवारी शुभ सुरुवात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 14:17 IST
1 / 10जानेवारी महिन्याचा अखेरचा सप्ताह आहे. जानेवारी महिन्याची सांगता होऊन आता लवकरच फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे. जानेवारी महिन्याची सांगता होत असतानाच काही शुभ योग जुळून येत आहेत. तसेच काही शुभ व्रतेही साजरी केली जाणार आहेत.2 / 10ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीत त्रिग्रही योग जुळून येणार आहे. तसेच सूर्य आणि बुधाचा बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. याशिवाय शुक्र ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन रास ही शुक्राची उच्च रास मानली जाते. ३१ मे पर्यंत शुक्र याच राशीत असणार आहे. 3 / 10मीन राशीत राहु विराजमान असून, राहु आणि शुक्र यांचा युती योग जुळून येणार आहे. एकंदरीत शुभ योग पाहता जानेवारी महिन्याची सांगता आणि फेब्रुवारी महिन्याची सुरुवात कोणत्या राशींना शुभ-लाभाची आणि नफा-फायदा, यश-प्रगती प्राप्त करून देणारी ठरू शकेल? ते जाणून घेऊया...4 / 10मेष: उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळू शकेल. सामाजिक वर्तुळ वाढेल. व्यवसायाचा विस्तार होईल. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होतील. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला शेअर बाजारात आणि लॉटरीत गुंतवणूक करायची असेल तर वेळ अनुकूल ठरू शकेल.5 / 10वृषभ: शुक्राचे गोचर उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या बाबतीत शुभ ठरू शकते. कुटुंबात शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ आणि नवीन गुंतवणूकीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात नफा मिळू शकेल. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. कार्यक्षेत्रात मेहनतीचे फळ मिळू शकेल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.6 / 10मिथुन: शुक्राचे गोचर लाभप्रद ठरू शकेल. कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती करू शकाल. नवीन योजनांमध्ये यश मिळू शकेल. व्यवसायात नफा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रशंसा आणि पदोन्नती शक्य आहे. नवीन संधींमुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकेल. बेरोजगार आहेत त्यांना नोकरीची संधी मिळू शकते. 7 / 10कन्या: नशिबाची साथ मिळू शकेल. कारकिर्दीत यश मिळू शकेल. परदेशात काम करणाऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकेल. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना प्रगती आणि यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल. काही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. अध्यात्मिक कार्यात आवड अधिक असेल.8 / 10धनु: शुक्राचे गोचर फायदेशीर ठरू शकते. भौतिक सुखांचा लाभ घेता येऊ शकेल. कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहू शकेल. जोडीदाराशी समन्वय वाढेल आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. काही लक्झरी, चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. कार्यक्षेत्रात मेहनतीचे फळ मिळू शकेल. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात.9 / 10कुंभ: चांगले दिवस सुरू होऊ शकतात. भौतिक सुखांचा लाभ घेऊ शकाल. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आदर आणि लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांना विशेष फायदे मिळू शकतात. अनावश्यक खर्च कमी करण्यात यश मिळू शकेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्यास वाव आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायात नफा मिळू शकेल. देशात आणि परदेशात प्रवास करू शकता.10 / 10मीन: शुक्राचे या राशीत होत असलेले गोचर शुभ ठरू शकते. काम करण्याची पद्धत सुधारेल. व्यक्तिमत्व आकर्षक असेल. व्यावसायिकांना विशेष फायदे मिळू शकतील. अनावश्यक खर्च कमी होतील. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळू शकतील. नवीन नोकरीच्या ऑफर किंवा परदेशी प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. वैवाहिक जीवनात समन्वय चांगला राहू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.