शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Budh Gochar 2023 : कुंभ राशीत येऊन बुध बनवणार त्रिग्रही योग, बुधादित्य राजयोगाचा 'या' पाच राशींना तुफान फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 17:57 IST

1 / 7
बुध २७ फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य आणि शनि आधीच कुंभ राशीत आहेत. अशा स्थितीत बुधाचे कुंभ राशीत आगमन झाल्यामुळे येथे तीन ग्रहांचा संयोग होईल म्हणजेच त्रिग्रही योग तयार होईल.
2 / 7
सूर्य आधीच कुंभ राशीत असून बुध कुंभ राशीत प्रवेश करत असताना बुधादित्य योग तयार होईल. त्याच बरोबर बुध आणि शनि हे देखील अनुकूल ग्रह आहेत. अशा परिस्थितीत या तीन ग्रहांचे कुंभ राशीत आगमन पाच राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना मिळणार याचा फायदा.
3 / 7
मेष - कुंभ राशीत बुधाच्या प्रवेशानंतर मेष राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरू शकतो. या कालावधीत तुम्ही तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाच्या लोकांसाठीही हा काळ खूप छान असणार आहे. या दरम्यान त्यांना व्यवसायाचा विस्तार करण्यात यश मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्येही या काळात यश मिळू शकते.
4 / 7
वृषभ - नोकरीच्या दृष्टीने हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय चांगला राहण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला जे काही काम मिळेल, ते तुम्ही वेळेपूर्वी पूर्ण करू शकाल. एवढेच नाही तर या काळात तुमचा आत्मविश्वासही वाढेल. या काळात तुमच्या व्यवसायाशी संबंधित सर्व गोष्टी ज्या काही कारणास्तव थांबल्या होत्या त्यांना पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला मोठं आर्थिक यशही मिळू शकते. एवढेच नाही तर तुमचं काम तुम्हाला यश देईल. कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्यांना या काळात भरपूर नफा मिळविण्याच्या अनेक चांगल्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन देखील या काळात आनंदाने भरलेले राहू शकेल.
5 / 7
मिथून- बुधाचा हा प्रवेश तुमच्या जीवनात व्यावसायिक बदल घडवून आणण्याची शक्यता आहे. दरम्यान तुम्हाला नशीबाची पूर्ण साथ मिळू शकते. यावेळी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसंच व्यापारी वर्गातील लोकांना त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी खूप चांगला काळ ठरू शकतो, त्यामुळे व्यवसायात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. तुम्हाला नफाही मिळण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुम्ही मानसिकदृष्ट्याही खूप आनंदी असाल.
6 / 7
तूळ - या कालावधीत तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकते. या काळात तुम्ही तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ पाहू शकता. यावेळी तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा कराल. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. परीक्षेत चांगले रिझल्ट मिळण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुम्ही जे काही प्रयत्न कराल, त्या सर्वांमध्ये तुम्हाला यशही मिळू शकते.
7 / 7
धनु - या कालावधीत धनु राशीच्या लोकांचे संवाद कौशल्य मजबूत होईल. या दरम्यान तुम्ही ज्या लोकांशी संवाद साधता ते तुमच्याकडे आकर्षित होतील. एवढेच नाही तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही तुमच्या समजूतदारपणाने आणि कार्यक्षमतेने तुमच्या करिअरमध्ये चांगले परिणाम साध्य करू शकाल.. करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल ठरु शकतो. या काळात तुम्हाला बढती देखील मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या माध्यमांशी संबंधित लोकांसाठी हा बुधाचा प्रवेश उत्तम ठरू शकतो.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य