तळहातालाच नव्हे, सकाळी कानात खाज येणंही शुभ लक्षण; आम्ही नाही, समुद्रशास्त्र सांगतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 08:00 AM2021-09-20T08:00:00+5:302021-09-20T13:06:34+5:30

सकाळी उठल्या उठल्या आपल्या तळ हाताला खाज सुटत असेल तर आपण लगेच म्हणतो, की आज धनप्राप्तीची चिन्ह आहेत. हे भाकीत समुद्र ज्योतिष शास्त्राचा एक भाग आहे. या शास्त्रानुसार दिवस कसा जाणार हे आपल्या सकाळच्या लक्षणांवरून कळते. त्यानुसार पुढे दिलेली काही लक्षणे पाहू आणि त्यानुसार तुम्हाला प्रतीची याआधी आली आहे का किंवा भविष्यात येणार आहे का ते जाणून घेऊ.

सकाळी कानात खाज येणे हे चांगले लक्षण आहे. हे संपत्ती किंवा सन्मानाशी संबंधित चांगली बातमी मिळणे सूचित करू शकते. प्रमोशन किंवा तत्सम शुभ वार्ता कळण्याचे ते लक्षण आहे.

जर सकाळी ओठांवर खाज सुटत असेल तर याचा अर्थ असा की त्या दिवशी तुम्ही तुमच्या आवडत्या स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेता येणार आहे. या व्यतिरिक्त, हे वैवाहिक जीवनासाठी देखील हे शुभ चिन्ह आहे. कसे ते सांगायला नको...!

स्त्रियांच्या डाव्या तळ हाताला आणि पुरुषांसाठी उजव्या तळ हाताला खाज येणे आर्थिक लाभ दर्शवते. अर्थात प्रातर्विधीपूर्वी हे लक्षण दिसत असेल तरच लाभ होतो.

हे देखील एक चांगले लक्षण आहे. अपूर्ण राहिलेले काही काम पूर्ण करण्याचा दिवस आहे, ज्याच्या पूर्ण होण्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता, ते काम साकारताना बघण्याची संधी मिळू शकते.

सकाळी छातीवर खाज सुटणे याचा अर्थ असा की ज्याला तुम्हाला बऱ्याच काळापासून भेटायचे होते त्याची भेट घडण्याची शक्यता आहे. थोडक्यात गाठीभेटीचा दिवस आहे असे समजायला हरकत नाही.