६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 09:07 IST
1 / 9Baba Vanga Predictions For Lucky Zodiac Signs 2025: २०२५ चा नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे आणि शेवटच्या डिसेंबर महिन्यानंतर सन २०२५ या वर्षाची सांगता होईल. या कालावधीत ग्रहांच्या गोचराने अनेकविध शुभ योग, राजयोग जुळून येत आहेत. गुरू, शनि, मंगळ या ग्रहांच्या गोचराने अत्यंत शुभ राजयोग जुळून आलेले आहेत. 2 / 9Baba Vanga Predictions 2025: बाबा वेंगाची भाकित नेहमीच चर्चेत असतात. ती केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, ज्या कालांतराने खरी ठरल्याचे मानले जाते. बाबा वेंगा यांच्या मते पुढील ६० दिवस काही राशींसाठी अत्यंत सर्वोत्तम ठरू शकतात. 3 / 9या काळात काही राशींच्या कष्टाचे चीज होऊ शकेल. मेहनतीचे यथायोग्य किंचितसे अधिकच फल मिळू शकेल. मनोकामना पूर्ण होऊ शकतील. कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही. धन-धान्य, वैभव-ऐश्वर्य, सुख-समृद्धी, सुबत्ता लाभू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...4 / 9वृषभ: वृषभ राशीसाठी अनेक आनंददायी घटना घडतील. या वर्षाचा शेवट मोठ्या आर्थिक लाभाने होऊ शकतो. संपत्ती आणि प्रसिद्धीचा पुरेपूर आनंद घ्याल. आयुष्यात स्थिरता येईल. कष्टाचे फळ मिळेल. हा काळ खूप शुभ राहणार आहे. नशिबाची भक्कम साथ लाभू शकेल. जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या सुवर्ण संधी येऊ शकतात. मान, सन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील. एकंदरीत, वृषभ राशीसाठी हा काळ यश, सुख, समाधानाने भारलेला असेल.5 / 9मिथुन: या राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतील. प्रतिष्ठा वाढेल. कामाला मान्यता मिळेल. आर्थिक लाभामुळे बँक बॅलन्स वाढेल. सामाजिक दर्जा वाढेल. सर्जनशीलतेचा फायदा होईल. खूप यश मिळवून देणारा काळ ठरू शकेल. पद, पैसा, संपत्ती आणि प्रेम मिळेल. कुटुंबासोबत संस्मरणीय वेळ घालवाल. आदर आणि सन्मान वाढेल. संपत्तीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.6 / 9सिंह: या राशीच्या लोकांना जीवनाकडे पाहण्याचा आशावादी दृष्टिकोन लाभदायक ठरेल. खूप दिवसांपासून स्वप्न पाहत असलेले मोठे यश मिळवू शकाल. पदोन्नती, पगारवाढ आणि अनपेक्षित आर्थिक लाभ शक्य आहे. एक नवीन उपक्रम सुरू करू शकता. जुन्या त्रासांपासून मुक्त करू शकते. नवीन संधी मिळतील. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. लक्षणीय प्रगती होईल. नवीन कार खरेदी करण्याची शक्यता आहे. व्यवसायात तेजी येईल.7 / 9कन्या: या राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभफळांनी भरलेला ठरू शकेल. या काळात भाग्याची भक्कम साथ लाभू शकेल. दीर्घकाळापासून चालत आलेले आर्थिक प्रश्न संपतील. संपत्तीचे नवीन स्रोत येतील. कारकिर्दीत आणि व्यवसायात प्रचंड प्रगती दिसेल. या काळात नवीन मालमत्ता किंवा वाहन मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. प्रियजनांकडून पाठिंबा मिळेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश लाभू शकेल. मेहनतीचे फळ मिळेल.8 / 9कुंभ: या राशीच्या लोकांसाठी हा काळ जीवनाच्या अनेक क्षेत्रात सकारात्मक परिणाम देईल. उत्पन्न वाढेल, करिअरचे नवीन टप्पे साध्य होतील. अनेक स्रोतांमधून संपत्तीचा प्रवाह होईल. आयुष्यात आनंद येईल. प्रगती कराल. बँक बॅलन्स वाढेल. वेळ पूर्णपणे उपभोगू शकाल. प्रेम जीवनात प्रेम वाढेल. विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात गोडवा येईल. एकंदरीत, हा काळ खूप छान जाईल.9 / 9- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.