प्रभू श्रीरामांचे दर्शन किती वाजता सुरु होणार? आरत्या, विश्रांतीचे टाईमटेबल आले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 13:49 IST
1 / 6अयोध्येमध्ये प्रभू रामांच्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठा झाली आहे. उद्यापासून म्हणजेच २३ जानेवारीपासून नित्यनेमाने मंदिरात पूजा, आरती, दर्शन आदी होणार आहे. यासाठी टाईमटेबलही आले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत. यामुळे प्रवासाच्या नियोजनासह दर्शनाचेही नियोजन भाविकांना करावे लागणार आहे. यासाठी श्री रामोपासना या नावाने नियमावली तयार करण्यात आली आहे. 2 / 6यापूर्वी पाचवेळा आरती केली जात होती, पुढेही तशीच सुरु राहणार आहे. रामलला पहाटे चार वाजता जागे होणार आहेत. त्यापूर्वी एक तासभर पूजेची आणि श्रृंगाराची तयारी केली जाणार आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी याची माहिती दिली आहे. 3 / 6मंदिर दररोज सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता मंदिरातील दर्शनाचा कालावधी 14-15 तासांचा असू शकतो. दरदिवशी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र मुर्तीला परिधान केले जाणार आहे. 4 / 6पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास दोन्ही मूर्ती आणि श्रीयंत्र मंत्रोच्चारांनी जागृत केले जातील. त्यानंतर मंगला आरती होईल. यानंतर मूर्तींचा अभिषेक व सजावट होईल. शृंगार आरती होईल. 4:30 ते 5 पर्यंत असेल.5 / 6सकाळी ८ वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात होईल. दुपारी एक वाजता मध्यान्ह भोग आरती होईल. दोन तास दर्शन बंद, देव विश्रांती घेईल. 6 / 6दुपारी 3 वाजल्यापासून पुन्हा दर्शनाला सुरुवात होईल, जे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, सायंकाळी ७ वाजता आरती होईल.