शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:16 IST

1 / 6
वृषभ राशीत चंद्राच्या येण्याने शुक्र आणि चंद्र यांच्यामध्ये राशी परिवर्तन योग तयार होईल. त्याबरोबरच शशी योग देखील तयार होईल, जो खूप शुभ असेल. चंद्रापासून दुसऱ्या घरात गुरूच्या उपस्थितीमुळे, शुनाफ योग देखील तयार होत आहे. तसेच भरणीनंतर, कृतिका नक्षत्राच्या संयोगात, रवि योगाचा शुभ संयोग देखील तयार होत आहे, जो पुढील पाच राशींना लाभदायी ठरेल.
2 / 6
वृषभ : आजचा शुक्रवार वृषभ राशीसाठी लाभाचा ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात नोकरी व्यवसायात नफा होईल. व्यावसायिकांना व्यवसायाची चांगली संधी मिळेल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. आवडत्या वस्तूंची खरेदी कराल. आवडते पदार्थ खाल आणि खाऊ घालाल. सहकाऱ्यांशी मिळते जुळते घ्या, जेणेकरून वादाचे प्रसंग टाळता येतील.
3 / 6
कर्क : अनपेक्षित लाभाचा दिवस. कौटुंबिक सौख्य मिळेल. नियोजित गोष्टी यशस्वीपणे पूर्ण कराल. वाहनसौख्य मिळाल्याने छोटासा प्रवासही आनंददायी ठरेल. उधारी वसूल होईल. मित्राचे, सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराची साथ मिळाल्याने दिवस आनंदात जाईल. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली इच्छाही पूर्ण होईल.
4 / 6
कन्या : नशिबाची पूर्ण साथ देणारा दिवस असेल. आई वडिलांकडून जमिनीच्या संदर्भात लाभ होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकाऱ्यांची साथ मिळाल्याने कामाला गती येईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. व्यावसायिकांना नफा देणारा आजचा दिवस ठरेल. जुनी येणी वसूल झाल्याने अचानक धनलाभ होई. कुटुंबाबरोबर निवांत वेळ घालवाल.
5 / 6
तूळ : सुख-समृद्धी वाढवणारा दिवस. शत्रूंचा पराभव आणि लोकप्रियता देणारा दिवस ठरेल. आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी मिळेल. कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्याने नियोजित कार्यात गती मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचाही फायदा होऊ शकतो. जोडीदाराशी सुसंवाद होऊन दिवस आनंदात जाईल.
6 / 6
कुंभ : अपेक्षेपेक्षा जास्त आनंद देणारा दिवस असेल. मित्रांचे, सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायाशी संबंधित प्रवास आनंद देईल. नातेसंबंध सुधारतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन संतती सुखाची प्रतीक्षा करणाऱ्यांना गोड बातमी मिळेल. भविष्यातील काही योजना आखण्यात यशस्वी व्हाल. चिंतामुक्त दिवस जाईल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यdaily horoscopeदैनिक राशीभविष्यMONEYपैसा