1 / 7रतन टाटा, धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी, अझीम प्रेमजी यांसारख्या यशस्वी व्यावसायिकांची नावे घेताना ज्योतिष शास्त्राच्या नजरेतून पाहिले तर त्यांची रास त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला पूरक असल्याचे लक्षात येते. अर्थात खडतर कष्ट, प्रयत्न, सातत्य याची जोड असल्याशिवाय ध्येय गाठता येत नाही. पण त्यात नशिबाची साथ असेल तर भाग्याला कलाटणी मिळते हेही तितकेच खरे आहे. 2 / 7ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींमध्ये नैसर्गिकरित्या व्यवसायात यशस्वी होण्याचे गुण असतात. या राशीच्या व्यक्ती त्यांच्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने यशाच्या शिखरांना स्पर्श करतात आणि त्यांच्यात नेतृत्व, सर्जनशीलता आणि शिस्त असे गुण असतात. ज्योतिष शास्त्रानुसार पुढील पाच राशींमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु करून आपले साम्राज्य निर्माण करण्याची क्षमता असते.3 / 7मेष राशीच्या लोकांमध्ये नेतृत्त्वाचे गुण असतात. ते साहसी, उत्साही असतात आणि आव्हाने पेलण्यास सक्षम असतात. हेच गुण एखाद्या व्यक्तीला स्पर्धात्मक कारकिर्दीसाठी योग्य बनवतात. मेष राशीचे लोक कधीही त्यांच्या शब्दापासून मागे हटत नाहीत. ते धडाडीचे निर्णय घेतात आणि स्वतःला झोकून देतात. भाग्य अशाच शूरांना साथ देते. नशीब यांना शोधत येते. त्यांचा आत्मविश्वास आणि निर्णायक्षमता त्यांना यशाच्या शिखरावर नेते.4 / 7सिंह राशीचे लोक सर्जनशील आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात. कारण कोणतेही असो, ते प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्यांच्याकडे नेतृत्त्वाचे गुण आणि सभाधीटपणा असतो. ते इतरांसाठी प्रेरणा ठरतात. या लोकांची कठोर परिश्रमाची तयारी असते त्यामुळे ते सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर मात करून पुढे जातात आणि इतरांनाही पुढे नेतात. 5 / 7कन्या राशीचे लोक व्यावहारिक विचार करणारे असतात. ते त्यांचे काम अतिशय पद्धतशीरपणे करतात, ही वृत्ती त्यांना समस्या सोडवण्यास मदत करते. संघटना कौशल्य चांगले असल्यामुळे ते लोकांना जोडून ठेवतात. स्वतः बरोबर इतरांचा उत्कर्ष करण्याची सवय त्यांच्या यशाला कारणीभूतठरते. शांत डोक्याने काम करणे, संयमाने निर्णय घेणे, मोजकं पण महत्त्वाचे बोलणे त्यांच्या यशस्वी उद्योजकाला पूरक ठरते. 6 / 7वृश्चिक राशीचे लोक दृढनिश्चयी, धोरणात्मक आणि कामावर लक्ष केंद्रित करणारे असतात. ध्येय गाठण्यासाठी ते संभाव्य सगळे प्रयत्न करतात. आपला लहेजा विसरून काम करण्याची तयारी ठेवतात. लोकांची पारख करण्याची कला त्यांना अवगत असते. गोड बोलून काम करून घेणे त्यांना जमते. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून उद्योग, व्यवसायात ते पुढे जातात.7 / 7मकर राशीचे लोक कधीही कोणतेही काम अपूर्ण सोडत नाहीत. ते व्यावहारिक आणि शिस्तप्रिय असतात. ते त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. काम करताना काळ वेळेचे बंधन ठेवत नाहीत, झोकून देतात आणि यशासाठी योजना आखण्यासाठी नेहमी रणनीतींचा विचार करतात. यामुळे ते व्यवसायात खूप योजनापूर्वक मार्गक्रमणा करतात. ते दृढनिश्चयी आणि ध्येयनिष्ठ असतात. ध्येय गाठूनच थांबतात.