1 / 5हा उपाय सोमवारी करायचा आहे. सोमवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून, आवरून शिव मंदिरात जायचे आहे. सोमवार म्हणजे आठवड्याची सुरुवात असल्याने ज्यांना सकाळी शिव मंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी हा उपाय संध्याकाळी ऑफिसहुन परतल्यावर करावा. घरी येऊन अंघोळ करून, स्वच्छ कपडे आणि शुद्ध मनाने शिव मंदिरात जावे.2 / 5शिवमंदिरात जाताना घरातूनच पेलाभर पाणी घेऊन जा. शिवशंकराला जलाभिषेक करा आणि दोन लवंगा मुठीत बंद करून आपली अडचण अतिकनवाळू अशा भोलेनाथाला सांगा आणि अडचणी दूर करण्याची मनोभावे प्रार्थना करा. नंतर मुठीत धरलेल्या दोन लवंगा शिवलिंगावर वाहून घ्या.3 / 5पूर्ण श्रद्धेने हा उपाय केल्यास आयुष्यातील अडचणी तर दूर होतातच, शिवाय आर्थिक प्रश्नही मार्गी लागतात. आवक वाढते, नवीन संधी मिळतात. पैसे कमवण्याचे चांगले मार्ग सापडतात, नवीन ओळखी होतात.4 / 5लवंगीचा हा उपाय केल्याने वास्तूमधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक बदल दिसू लागतात. घरातील इतरही लोकांच्या आयुष्यात सकारात्मक घटना घडू लागतात. मात्र हा उपाय श्रद्धेने करावा, ही अतिशय किरकोळ पण महत्त्वाची अट असते.5 / 5घरातील अडचणी दूर होऊन सुख, शांती, समृद्धी नांदावी म्हणून लवंगीचा उपाय जरूर करून बघा. तसेच तुमच्या ओळखीत ज्यांना या उपायाची सर्वात जास्त गरज असेल त्यांना हा उपाय करायला सांगा. सोमवार हा शंकराचा वार आहे. महादेव भोळ्या भावाने केलेल्या उपासनेने संतुष्ट होतात आणि कृपा करतात. त्यामुळे ज्योतिष शास्त्राने हा उपाय करण्यावर भर दिला आहे.