८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 09:36 IST
1 / 15Ganesh Chaturthi Ganpati 2025 Astrology: भाद्रपदातील गणेश चतुर्थी हा सर्वांच्या परमोच्च आनंदाचा दिवस. १४ विद्या, ६४ कलांचा अधिपती प्रथमेश गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. 2 / 15यंदाची गणेश चतुर्थी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक दुर्मिळ शुभ योगात या गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. यावेळी गणेश चतुर्थीला दुर्लभ योग जुळून येत आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, प्रीति योग, इंद्र योग आणि ब्रह्म योग यांचा समावेश आहे. तसेच महालक्ष्मी योग, महाभाग्य योग, लक्ष्मी नारायण योगही जुळून येत आहेत.3 / 15गणपती उत्सवाची सुरुवात कोणत्या राशींना सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च लाभांची ठरू शकेल? गणपती बाप्पाचा वरदहस्त कोणत्या राशींवर राहू शकेल? आर्थिक आघाडी, कुटुंब, नोकरी, व्यवसाय, व्यापार, शिक्षण, करिअर, विवाह, वैयक्तिक जीवनात कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...4 / 15मेष: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. कामे झालीच पाहिजेत, असा अट्टहास करू नका. काही अनपेक्षित अडचणी, कामातील बदल, असे अनुभव येतील. शांतचित्ताने कामे करत राहा. आराम करा. भावी योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळा. मात्र, वेळ वाया न घालवता कामांची आखणी करून ठेवा. आर्थिक व्यवहार जपून करा. गुरुवार-शुक्रवार अनेक अडचणी आपोआप दूर झाल्याचा अनुभव येईल.5 / 15वृषभ: ग्रहमानाची चांगली साथ राहील. मात्र, काही बाबतीत थोडे तडजोडीचे धोरण ठेवा. नोकरीत अचानक काही परिवर्तन होऊ शकते. त्यातच घरातील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. उत्साहाला उधाण येईल. शैक्षणिक प्रगतिपुस्तक झळकते राहील. प्रेमात असणाऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळेल. सामाजिक महत्त्व वाढेल. गुरुवार, शुक्रवार मात्र षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमणामुळे संमिश्र अनुभव येतील. शेवटी परिस्थिती आटोक्यात येईल. 6 / 15मिथुन: नवनवीन संधी मिळतील. त्यामुळे उत्साह वाढेल. प्रयत्नांना यश मिळेल. जनसंपर्क चांगला राहील. मात्र, सुरुवातीला भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. या काळात अनुकूल वातावरण राहील. नोकरीत ताण असला तरी लोकांशी गोडीत बोलून कामे करून घ्याल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू खरेदी कराल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील.7 / 15कर्क: अनुकूल फळे मिळतील. धनलाभ, व्यावसायिक वाढ, गृहसौख्य, मुलांची प्रगती या दृष्टीने चांगला काळ आहे. वैवाहिक जीवनात सुख-समाधान राहील. व्यवसायात भरभराट होईल. मोठ्या उलाढालीतून फायदा होईल. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. नोकरीत काहींना बदलाला सामोरे जावे लागेल. प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करा.8 / 15सिंह: मनात काळजीचे विचार राहतील. जवळच्या लोकांशी संवाद साधा. जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. परिस्थिती बाजूने राहील. धनलक्ष्मीची कृपा राहील. जुनी येणी वसूल होतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. हाती घेतलेले प्रकल्प गती घेतील. त्यामुळे उत्साह वाढेल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. भेटीगाठी फलद्रूप होतील, व्यवसायात भरभराट होईल.9 / 15कन्या: अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. तसेच खर्चावर नियंत्रण ठेवा. अनुकूल फळे मिळण्यास सुरुवात होईल. तरुणवर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू प्राप्त होतील. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल परिस्थिती राहील. एखाद्या बाबतीत निष्कारण ताण तणाव राहू शकतो. गुरुवार, शुक्रवार महत्त्वाची कामे हातावेगळी कराल.10 / 15तूळ: प्रगती होईल. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, देवाणघेवाण करताना खबरदारी घ्यावी. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. पगारवाढ व इतर अनेक लाभ होतील. सुखसोयी वाढवून मिळतील. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. काही अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. खर्च करण्याकडे कल राहील. प्रवासात सतर्क राहा. अनोळखी लोकांपासून सावध राहा. गुरुवारपासून मनासारख्या घटना घडतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.11 / 15वृश्चिक: महत्त्व वाढेल. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. अनपेक्षितपणे हाती मोठा पैसा येईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. त्यातून महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. यशामुळे प्रियजनांना आनंद वाटेल. गुरुवार, शुक्रवार खर्चावर नियंत्रण ठेवा. काहींना प्रवास घडून येतील. मन आनंदी राहील. मात्र प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. कुणी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करील. 12 / 15धनु: भेटवस्तू मिळतील. ग्रहमान अनुकूल राहील. मात्र, बेफिकीरपणे वागू नका. आपली कामे वेळच्या वेळी करा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मात्र, काही लोक चुकांकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करतील. नोकरीत नवीन संधी मिळेल. मात्र, सहकारी वर्गाशी गोडीत वागा. त्यामुळे तणाव व्यवस्थापन नीट होईल. नोकरीत पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. काहींचे कामाचे स्वरूप बदलेल. गुरुवार, शुक्रवार अपेक्षित फायदे होतील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल.13 / 15मकर: धडाडी दाखवाल. विविध आघाड्यांवर सफलता मिळेल. मात्र, घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. वाहने जपून चालवा. चंद्राचे भाग्य स्थानातून लाभ स्थानापर्यंत होणारे भ्रमण शुभ फळे देणारे ठरेल. समाजात महत्त्व वाढेल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. नोकरीत नवीन संधी मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.14 / 15कुंभ: कामावर लक्ष केंद्रित करा. मनात सुरुवातीला काळजीचे विचार राहतील. काही अडचणी येतील. इतरांच्या प्रश्नात गुंतून पडू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अचाट साहस करणे टाळा. गुरुवार, शुक्रवार अडचणी दूर झालेल्या असतील. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. शनिवारी नोकरीत धावपळ करावी लागेल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील.15 / 15मीन: काही कटू तर काही गोड अनुभव येतील. दगदग होईल. इतरांच्या समस्यांचा स्वतःला त्रास करून घेऊ नका. महत्त्वाच्या योजना लोकांना सांगत बसू नका. कामाचा ताण असला तरी खुबीने त्यातून मार्ग काढाल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. गुरुवार, शुक्रवार वाहने हळू चालवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो.