शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:09 IST

1 / 12
5 rare rajyog on begin of new year 2026: २०२५ची सांगता होऊन आता २०२६ सुरू होत आहे. २०२६ मध्ये गुरू, शनि, राहु-केतु यांचे महत्त्वाचे गोचर होणार आहे. गुरू ग्रह मार्गी होऊन राशीपरिवर्तनही करणार आहे. तसेच अनेक दुर्मिळ राजयोग जुळून येणार आहेत. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर दिसून येईल.
2 / 12
२०२६ या इंग्रजी नववर्षाची सुरुवात पाच अद्भुत दुर्मिळ अशा राजयोगांनी होणार आहे. गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्र यांचा चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. तसेच मालव्य राजयोग, बुधादित्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग, आदित्य मंगल, लक्ष्मी नारायण राजयोग जुळून येत आहेत. तसेच गुरू आणि चंद्र यांच्या युतीने जुळून येणारा अत्यंत शुभ गजकेसरी योगही जुळून येत आहे.
3 / 12
गुरू ग्रहाच्या मिथुन राशीतील गोचरामुळे विपरीत राजयोग जुळून येत आहे. नववर्षाच्या सुरुवातीला असणारी ग्रहांच्या स्थितीचा योग सुमारे ५०० वर्षांनी जुळून येत असल्याचे दावा करण्यात आला आहे. या राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींना चांगले दिवस येऊ शकतात. यासोबतच नवीन नोकरी, आर्थिक लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
4 / 12
मेष: पाच दुर्मिळ राजयोग फायदेशीर ठरू शकतात. या काळात वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होतील. व्यक्तिमत्त्वाला उजळवण्याचा आणि जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रात ओळख निर्माण करण्याचा हा काळ आहे. या काळात नोकरी किंवा व्यवसायात नवीन यश आणि सकारात्मक बदल दिसू शकतात. देशांतर्गत किंवा परदेशात प्रवास करू शकता. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग समोर येतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल. या काळात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती मिळू शकते. व्यावसायिकांना लक्षणीय आर्थिक फायदा होऊ शकतो.
5 / 12
मिथुन: पाच राजयोगांची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. या काळात काम आणि व्यवसायात प्रगती होईल. नशिबाची भक्कम साथ लाभू शकेल. रखडलेली कामे आता सहजपणे पूर्ण होतील. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ, बोनस किंवा पदोन्नतीची चांगली बातमी मिळू शकते. मानसिक शांतता लाभू शकेल. नियोजित प्रकल्प यशस्वी होऊ शकतील.
6 / 12
कर्क: राजयोगाची निर्मिती अनेक क्षेत्रांमध्ये फायदे देऊ शकते. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आणि संपत्तीत वाढ होऊ शकते. परदेश प्रवासाची शक्यता आहे. याशिवाय, निर्णायक स्थितीत यश मिळू शकते. शत्रूंचा पराभव होऊ शकतो. करिअरमध्ये काही मोठी जबाबदारी मिळू शकते. पदोन्नतीसोबत आर्थिक लाभही होऊ शकतो.
7 / 12
कन्या: गजकेसरी राजयोगाची निर्मिती लाभप्रद ठरू शकते. या काळात कामात आणि व्यवसायात प्रगतीचा अनुभव येऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना वाढ, बोनस किंवा पदोन्नतीची चांगली बातमी मिळू शकते. याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन करार, भागीदारी आणि नफ्याचा ठरू शकेल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरण्याची शक्यता आहे.
8 / 12
तूळ: दुर्मिळ युती राजयोग चांगला ठरू शकतो. या काळात वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. शिवाय, कौटुंबिक जीवन शांतता, आनंद आणि सहकार्याने भरलेले असेल. मानसिक समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक दर्जा मजबूत होईल. या काळात बेरोजगार व्यक्तींना नोकऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांनाही लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतात. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. सर्जनशील योजना आणि गुंतवणूक या वेळी फायदेशीर ठरू शकतात.
9 / 12
धनु: गजकेसरी राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. या काळात विवाहित व्यक्तींना एक अद्भुत वैवाहिक जीवन अनुभवायला मिळेल. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि मानसिक संतुलन सुधारू शकेल. या काळात मागील गुंतवणूक आणि योजनांमधून नफा मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा, मान-सन्मान वाढू शकेल.
10 / 12
मकर: पाच दुर्मिळ राजयोग सकारात्मक सिद्ध होऊ शकतात. या काळात कामात आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. धैर्य आणि शौर्य वाढेल. कामावर नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ, बोनस किंवा पदोन्नतीची चांगली बातमी मिळू शकते. या काळात व्यावसायिकांना नवीन सौदे, भागीदारी आणि नफा प्राप्त होऊ शकेल. भावंडांकडूनही पाठिंबा मिळेल. दीर्घकालीन समस्या सुटू शकतात.
11 / 12
कुंभ: हा काळ सकारात्मक ठरू शकतो. या काळात उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या काळात बुद्धिमत्ता आणि निर्णय घेण्याची क्षमता तीक्ष्ण असेल, ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल होतील. नियोजित योजना यशस्वी होतील. आदर आणि सन्मान मिळेल.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिकNew Yearनववर्ष 2026