1 / 14ज्योतिषशास्त्रानुसार, नियमित कालावधीत ग्रहांचे गोचर सुरू असते. मे महिन्याच्या उत्तरार्धात बुध आणि शुक्र यांचे गोचर आहे. २३ मे २०२५ रोजी बुध ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला असून, शुक्र ३१ मे २०२५ रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर, चंद्र मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशीतून भ्रमण करत आहे. 2 / 14या कालावधीत बुध, गुरु, सूर्य आणि चंद्र या ग्रहांच्या संयोगाने विविध प्रकारचे राजयोग जुळून येत आहेत. शशि आदित्य, बुधादित्य, गजकेसरी राजयोग जुळून येत आहे. तसेच बुध आणि गुरू ग्रहाचा दशांक योग आणि द्विद्वादश योग जुळून आला आहे. सूर्य आणि वरुण ग्रहाचा विशेष योग जुळून आला आहे. 3 / 14मे महिन्याची सांगता होताना जुळून आलेले हे योग काही राशींना सकारात्मक ठरू शकतात, असे सांगितले जात आहे. कुटुंब, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, व्यापार, आर्थिक आघाडी यामध्ये कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...4 / 14मेष: आळस झटकून कामावर अधिक लक्ष द्याल. यासोबतच भावंडांशी चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतील. व्यवसायात प्रगतीची शक्यता राहील. वैवाहिक जीवनात फक्त आनंदच राहू शकतो. समाजात आदर आणि सन्मान वेगाने वाढू शकतो. उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. वडिलांशी चांगले संबंध राहू शकतात. शुभ कार्यात भाग घेऊ शकता.5 / 14वृषभ: नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. कुटुंबातील बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येण्याची शक्यता आहे. संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. परंतु, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. नोकरी आणि व्यवसायात खूप फायदे मिळू शकतात.6 / 14मिथुन: चांगली बातमी मिळू शकते. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्यांचा अंत होऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात. परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. व्यवसायाच्या क्षेत्रात भरपूर नफा मिळू शकेल. बनवलेल्या रणनीती यशस्वी होऊ शकतात. समाजात आदर वाढू शकतो.7 / 14कर्क: गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ आहे. अशा योजनेत पैसे गुंतवू शकता ज्यामध्ये नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. कामानिमित्त केलेले प्रवास लाभदायक आणि फलदायी ठरू शकतात. नात्यांमधील समस्या दूर होऊ शकतील. काही गैरसमज निर्माण झाले होते, ते आता संपू शकतील. यश मिळेल. 8 / 14सिंह: भरघोस लाभ होण्याची शक्यता आहे. यश मिळवू शकतात. आर्थिक परिस्थितीशी संबंधित आव्हाने सोडवता येतील. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. मुलांची प्रगती होऊ शकते. शिक्षण क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. गुप्त संपत्ती मिळू शकते. भावंडांशी चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात. 9 / 14कन्या: मे महिन्याच्या सांगतेचा काळ शुभ आणि फलदायी ठरू शकतो. साहस आणि पराक्रमात वाढ दिसून येऊ शकेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. करिअरच्या क्षेत्रात नवीन संधी मिळतील. मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच चांगली संधी मिळू शकते. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आणि प्रेम वाढेल. संबंध अधिक दृढ होतील. जोडीदाराची प्रगती होऊ शकते.10 / 14वृश्चिक: कुटुंब, नोकरी किंवा व्यवसायात सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. करिअरमध्ये चांगला परिणाम दिसून येऊ शकतो. कामाचे कौतुक होऊ शकते. कोणताही निर्णय विचारपूर्वक घेतला तर ते चांगले होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल. व्यवसायात बनवलेली रणनीती प्रभावी ठरू शकते. अशा परिस्थितीत चांगला नफा कमवू शकता. नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. विचार व्यक्त करण्यात यशस्वी होऊ शकता. यातून खूप फायदा होऊ शकतो.11 / 14धनु: वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकेल. जोडीदारामधील सुरू असलेला दुरावा संपुष्टात येऊ शकतो. व्यवसाय सुरू करायचा असेल तर या काळात नफा मिळू शकतो. रिअल इस्टेटच्या बाबतीतही यश मिळू शकते. निर्णय घेण्याची क्षमता वाढू शकते. सासरच्या लोकांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायाकडे लक्ष दिले तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल.12 / 14मकर: भरघोस लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. एकाग्रता वाढल्याने परीक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कल अध्यात्माकडे असेल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. सुख आणि समृद्धी मिळू शकते. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. अनेक प्रकारे फायदे मिळू शकतात. उत्पन्नात वाढ होऊ शकते. 13 / 14कुंभ: आर्थिक परिस्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. आखलेल्या योजना यशस्वी होऊ शकतात. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात लाभ मिळू शकतात. चांगल्या नोकरीसोबतच पगारवाढही होऊ शकते. उच्च शिक्षणातूनही बरेच फायदे मिळू शकतात. निर्णय घेण्याची क्षमता वाढू शकते.14 / 14- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.