शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 14:04 IST

1 / 9
Numerology 2026: ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते. २०२६ हे वर्ष काही मूलांकांसाठी अत्यंत शुभ ठरू शकते, असे सांगितले जाते.
2 / 9
Numerology: ०२६ चा राजा गुरू (बृहस्पति) असेल, तर मंत्री मंगल (मंगळ) असेल. गुरु राजा असल्याने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त होईल. मंगल मंत्री असल्याने सामाजिक आणि राजकीय वातावरण अशांत राहण्याची शक्यता आहे. लोकांमध्ये क्रोध, विद्रोह वाढू शकेल, असे म्हटले जात आहे. तसेच २०२६ याची बेरीज केली तर १० येते, त्यामुळे या वर्षाचा मूलांक १ असणार आहे. मूलांक १ चे स्वामित्व सूर्य ग्रहाकडे आहे.
3 / 9
सूर्य हा शक्ती, आदर, ऊर्जा, नेतृत्व आणि आत्मविश्वासाचा कारक मानला जातो. म्हणूनच, २०२६ हे वर्ष या अंकाच्या अनेक लोकांसाठी भाग्योदय करणारे ठरू शकते. मूलांक १ सह आणखी काही मूलांक असे आहेत, ज्यांना पुढील वर्ष हे अत्यंत लाभदायी, फलदायी आणि सर्वोत्तम यश-प्रगतीचे ठरू शकते, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...
4 / 9
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. सुवर्णकाळ सुरू होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता निर्माण होईल. आर्थिक परिस्थिती लक्षणीयरीत्या मजबूत होईल. नवीन उपक्रम सुरू करायचा असेल तर हे वर्ष उत्तम ठरू शकेल. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. संयम आणि शांततेने प्रत्येक समस्येवर उपाय शोधू शकाल. प्रवासातून चांगले फायदे मिळण्याची अपेक्षा आहे. राजकारण, प्रशासन आणि व्यवसायाशी संबंधित लोकांचा आदर वाढेल.
5 / 9
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. २०२६ या नवीन वर्षात आर्थिक परिस्थिती लक्षणीयरीत्या सुधारेल. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती शक्य आहे. परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित कामात यश महत्त्वपूर्ण असेल. नातेसंबंध मजबूत होतील. धार्मिक कार्यांमध्ये आवड वाढेल.
6 / 9
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. २०२६ हे वर्ष खूप चांगले ठरू शकते. यश आणि प्रगती घेऊन येईल. व्यवसायात नशीब आजमावायचे आहे त्यांना हे वर्ष आशादायक वाटेल. स्वप्ने साकार करण्याची संधी मिळू शकते. फक्त धीर धरावा. काही उत्तम संधी मिळू शकतात.
7 / 9
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. २०२६ हे वर्ष खूप चांगले ठरेल. पदोन्नती शक्य आहे. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. करिअरमधील बदल सकारात्मक ठरू शकतील. २०२६ हे वर्ष मीडिया, डिजिटल व्यवसाय आणि प्रवास क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी विशेषतः फलदायी ठरू शकेल.
8 / 9
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. २०२६ मध्ये ओळखीचा फायदा होऊ शकतो. एक वेगळी ओळख मिळेल. कार किंवा घर खरेदी करण्याची संधी मिळू शकते. जीवनात आराम आणि विलासिता उपभोगू शकाल.
9 / 9
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. २०२६ हे वर्ष खूप चांगले राहील. बऱ्याच काळापासून असलेली इच्छा पूर्ण होईल. नोकरीपासून ते व्यवसायापर्यंत काळ चांगला जाईल. पदोन्नती शक्य आहे. दृढनिश्चय आणि धाडसी निर्णयांमुळे कामाच्या ठिकाणी फायदा होईल. संरक्षण, कायदा आणि क्रीडा क्षेत्रातील लोकांना नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिषspiritualअध्यात्मिक