शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२५ची पहिली पौर्णिमा: ७ राशींना शुभ-सौभाग्य-लाभ, मोठे यश मिळेल; नफा-फायदा, इच्छापूर्ती काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 09:52 IST

1 / 10
पौष पौर्णिमा किंवा शाकंभरी पौर्णिमा हा देवीच्या उपासनेचा एक दिवस मानला जातो. भारतीय संस्कृतीत हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. सोमवार, १३ जानेवारी रोजी २०२५ मधील पहिली पौर्णिमा, पौष महिन्यातील पौर्णिमा आहे.
2 / 10
सोमवार, १३ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ०५ वाजून ०२ मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होत असून, याच दिवशी उत्तर रात्रौ ०३ वाजून ५६ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होत आहे. म्हणजेच १३ जानेवारी रोजी दिवसभर पौर्णिमा आहे.
3 / 10
वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमा विविध दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात. २०२५ची पहिली पौर्णिमा कोणत्या राशींना शाकंभरी देवीचे शुभाशिर्वाद, विविध लाभ, सुख-समाधान आणि समस्यातून दिलासा देणारी ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 10
मेष: सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून मोठे फायदे मिळू शकतात. अनेक समस्यांतून दिलासा मिळू शकतो. घरगुती परिस्थिती आणि वातावरण सुधारण्यासाठी पूर्णपणे काम कराल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मिळणाऱ्या संधींचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. विवाहित लोकांचे जीवन आनंदी राहू शकेल.
5 / 10
वृषभ: शुभ, सौभाग्य लाभून भाग्यवान ठरू शकाल. कामाशी संबंधित शुभ परिणाम दिसू लागतील. घरातील आणि बाहेरील सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी संपत्ती आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये नवीन स्रोत निर्माण होतील. काही मोठे यश मिळवू शकता. वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता.
6 / 10
कर्क: नवीन मित्र भेटू शकतात. एखाद्या जुन्या मित्राची भेट संस्मरणीय ठरू शकते. करिअरच्या क्षेत्रात फायदे मिळण्याची शक्यता आहे. मेहनत आणि समर्पणाबद्दल सर्व जण कौतुक करतील. वरिष्ठ अधिकारीही आनंदी होतील. व्यवसायात नफा मिळण्याच्या सर्व शक्यता आहेत. यश मिळवू शकता. पुरेसे पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता.
7 / 10
सिंह: कारकिर्दीत यश मिळू शकेल. नोकरी करणाऱ्यांना या आठवड्यात काही मोठी जबाबदारी मिळू शकते. या काळात राजकारणाशी संबंधित लोकांना यश मिळू शकेल. समाजात आदर वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असू शकेल. दीर्घकाळ मेहनतीचे किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांचे सुखद परिणाम मिळण्याची शक्यता आहे. काही विशेष यश किंवा संधी मिळू शकते.
8 / 10
तूळ: सुख सोयींमध्ये वाढ होऊ शकते. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतात. करिअरच्या क्षेत्रात फायदे मिळू शकतात. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना नफा मिळू शकतो. रणनीती यशस्वी होऊ शकतात. पैसे कमविण्याचे अनेक मार्ग सापडू शकतात. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता.
9 / 10
वृश्चिक: भाग्य उजळू शकते. भावंडांसोबत वेळ चांगला जाऊ शकेल. करिअरच्या क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात. अनेक समस्या संपुष्टात येण्याचा मार्ग सापडू शकतो. समाजात आदर आणि सन्मान वाढू शकतो. कुटुंब आणि जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. यामुळे जीवनात आनंद, समाधान लाभू शकेल.
10 / 10
मीन: जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. भविष्यासाठी सकारात्मक योजना बनवू शकता. करिअरबद्दल बोलायचे झाले तर, हा काळ खूप छान जाणार आहे. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. नेतृत्व कौशल्याच्या बळावर सकारात्मक परिणाम मिळवू शकता. व्यवसायात नफा कमावण्याची संधी मिळू शकेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत नाते अधिक घट्ट होऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक